मेथीची भाजी फोडणीला टाकली की, घरभर खमंग स्वाद दरवळतो व भूक एकदम प्रज्वलित होते. मेथी आरोग्याला ही चांगली असते. माझ्या घरी तर मेथी सर्वानाच खूप आवडते. पीठवाली, डाळवाली, गरगट भाजी तसेच मेथी पुरी, मुठीया असे सर्व पदार्थ आलटून पालटून होतात. अगदी मेथीची पचडीसुध्दा आवडीने खातात. आज मी, एका हाँटेलमधे खाल्लेली व मला आवडली म्हणून "मेथी मसाला" सब्जी ट्राय केली व मस्त झाली. कशी केली साहित्य व कृती-👇
साहित्य :-
* मेथी भाजी १ जुडी
* मोठा कांदा १
* टोमँटो १
* आलं-लसूण,हिरवी मिरची पेस्ट १ टीस्पून
* चणाडाळ पीठ १ टेस्पून
* मीठ चविनूसार
* धना-जिरा पावडर २ टीस्पून
* तेल न फोडणी साहित्य हिंग,मोहरी
कृती :-
प्रथम मेथी निवडून धुवून बारीक चिरावी. कांदा,टोमँटो बारीक चिरावे.
आता तेल गरम करून फोडणी करून त्यामधे कांदा, टोमँटो व आलं लसूण पेस्ट परतावी. शेवटी चिरलेली मेथी टाकावी व एक वाफ काढावी भाजी खाली बसते.
नंतर मीठ व डाळीचे पीठ अर्धी वाटी पाण्यात कालवून भाजीमधे घालावे. गरजेनुसार अजून थोडे पाणी घालावे व थोडे शिजू द्यावे. जास्त पाणी घालू नये. ही भाजी घटसरच असते.
आता ही तयार गरमा-गरम भजी भाकरी अथवा चपाती सोबत वाढा. अतिशय रूचकर लागते.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.