28 February 2015

बीट रूट हार्ट ( Crispy Beet Root Heart)

No comments :

संध्याकाळचे वेळी मुलांना काहीतरी चटपटीत खायला हवे असते.सहाजिकच आहे सकाळी उठले की दूध मग गडबडीत नेहमीचाच पोटभरीचा नाष्टा व पोळीभाजीचा टीफीन !मग संध्याकाळी मात्र काहीतरी नविन पाहीजे असते. तर मग हे बीटरूट हार्ट ट्राय करा.कसे करायचे पहा

साहीत्य :-

1) पातळ पोहे 2 वाट्या
2) बीटाचा किस 1वाटी
3) मिठ चविनूसार
4) हिरवी मिरची,आले,लसूण पेस्ट एक टीस्पून
5) आमचूर पावडर  ऐच्छीक
6) गरम मसाला 1चमचा
7) ब्रेडक्रम्स किंवा काॅर्नफ्लोअर दोन टेबलस्पून
8) तेल

कृती :-

        प्रथम पातळ पोहे धुवून चाळणीत पाणी निथळण्यास ठेवावे.

बीट साल काढून बारीक किसणीवर किसून घ्यावे.

नंतर वर आधि भिजवून ठेवलेले पोहे चांगले मळून घ्यावेत.

आता त्यामधे किसलेले बीट,मीठ,गरम मसाला,मिरची आले लसूण पेस्ट काॅर्नफ्लोअर घालून परत एकदा नीट मळून मिक्स करून गोळा तयार करावा.

आता तयार पीठाचे लहान गोळे करून घ्यावेत व पोळी लाटावी.साच्याने लहान-लहान बदामाचे आकार कापून घ्यावेत.गरम तेलात तळावे.

थोडे थंड झाले की एकदम खुसखूषीत होतात लगेच साॅस सोबत सर्व्ह करा.अथवा नूसतेही चहा बरोबर देता येतात.

टीप :- फार गार होऊ देऊ नयेत.भजीप्रमाणे गार झाले की मऊ पडतात.म्हणून लगेचच संपवावेत.

26 February 2015

काॅर्न सूप (Corn Soup)

No comments :

आजकाल स्वीटकाॅर्न ( गोड मक्याची कणसे) बाजारात भरपूर प्रमाणात येतात.मक्याचा अनेक प्रकारानी आहारात वापर करता येतो.तसेच मका पौष्टीक पण असतो व पोटभरीचा पण! मक्याचे सूप जर एक बाऊल प्यायले तर एखादे रात्रीचे जेवण नाही घेतले तरी चालते.पोट भरते.तर हे सूप कसे करायचे ते पहा.

साहीत्य :-

1) मक्याचे दाणे वाफवलेले 2 वाट्या
2) गाजर जाड किसून एक
3) सिमला मिरची बारीक चिरून
4) कांदापात बारीक चिरून
5) बिन्स (सर्व भाज्या मिळून एक वाटी)
6) आले-लसूण बारीक चिरून ऐच्छिक
7) मिठ,मिरपूड चवीनुसार
8) बटर एक टेस्पून
9) काॅर्न फ्लोअर 2 टेबलस्पून
10) पाणी 4 वाट्या

कृती :-

प्रथम पॅनमधे बटर गरम करावे व आले,लसूण परतावे. त्यावर भाज्या टाकून थोडे परतून पाणी घाला.

पाण्याला ऊकळी येईपर्यंत मका अर्धी वाटी तसाचा बाजूला ठेउन बाकीचा मिक्सरवर भरड वाटून घ्या.

आता उकळलेल्या पाण्यात वाटलेली पेस्ट व काॅर्नफ्लोअर थोड्या पाण्यात मिक्स करून आणि अख्खा बाजूला ठेवलेला मका सर्व  मिसळावे.मिरपूड, मिठ घालावे व एक उकळी येऊ द्यावे.

गरभा-गरम सर्व्ह करावे.

25 February 2015

चपाती चिप्स (Chapati Chips )

No comments :

आदले दिवशीचे काही अन्न शिल्लक राहीले की दुसरे दिवशी काय करावे समजत नाही.वाया घालविणे पटत नाही व एकट्या स्वताला काही सर्व संपविता येत नाही.मग काहीतरी नवीन आयडीया शोधावी लागते.शिळ्या चपात्या उरल्या होत्या. तर आज मला असेच एका डिशचा शोध लागला.'चपाती चिप्स' कसे ते पहा.

साहीत्य :-
1) गव्हाच्या चपात्या शिळ्या किंवा ताज्यापण चालतात
2) मिठ,चाट मसाला
3) मिरची पावडर आवडीनुसार
4) तेल तळणीसाठी
5) पाणी

कृती :-

प्रथम एका वाटीत मिठ चवीनुसार घ्यावे व त्यात थोडेसे पाणी घालून विरघळून घ्यावे.

हे पाणी चपाती शिळी असेल तर त्यावर थोडे -थोडे शिंपडावे व तसेच राहू द्या पाच मिनिट.

नंतर चपातीचे कापून शंकरपाळीप्रमाणे लहान -लहान चौकोनी तुकडे करून घ्यावेत व गरम तेलात खरपूस तळावेत व टीश्यू पेपर वर काढावेत.

नंतर त्यावर आवडीनुसार चाटमसाला व मिरची पावडर भुरभूरावी.थंड झाले की मस्त कुरकूरीत चिप्स तयार ! हवाबंद डब्यात भरून ठेवा व संध्याकाळच्या चहा सोबत सर्वाना खायला द्या.पट्कन संपून जातात.अजून पाहीजे म्हणून मागणी येते. बघा तुम्हीपण करून.

टीप :- चपात्या करताना जर मिठ घातले असेल कणिकेत तर साधेच पाणी वापरा.नाहीतर खारटपणा येईल.

19 February 2015

काही करून पहाण्यासारखे

No comments :

*भरपूर प्रमाणात लिंबे घेतल्यास लिंबांना खोबरेल तेलाचा हात लावून फ्रिजमध्ये ठेवावीत. महिनाभर चांगली राहतात .

* पेढय़ाच्या रिकाम्या बॉक्समधून लिंबे ठेवावीत. त्यामुळे लिंबे फ्रिजमध्ये वाळत नाहीत.

* बिस्कीटे मऊ होऊ नयेत म्हणून डब्यात मिठाची पुरचुंडी ठेवावी.

* धनेपूड खराब होऊ नये म्हणून त्यात हिंगाचा खडा घालावा.

* भात,खीर किंवा कोणताही उकळणारा पदार्थ ऊतू जाऊ नये म्हणून भांड्यावर लाकडी पळी आडवी ठेवा . मिश्रण कितीही वेळ उकळत ठेवा ऊतू जात नाही.

* उकळून गार केलेल्या पाण्याचा बर्फ लावला तर स्पटीका स्वच्छ पारदर्शक होतो

* दूधाचे विथजण लावताना त्यात थोडी मिल्क पावडर घालावी दही घट्ट लागते.

* मटार शिजवताना त्यामधे चमचाभर साखर घालावी।.रंग हिरवागार आहे तसा रहातो व मटार आकसत नाहीत.

* केळाचे किंवा बटाट्याचे वेफर्स तळतानाच त्यात मिठाचे पाणी शिपडावे.

* वडे,भजी तळताना एकावेळी जास्त प्रमाणात तेलात सोडू नयेत.तेल जास्त ओढतात व तेलकट होते.

14 February 2015

पालक सूप (Spinach soup )

No comments :

पालक एक अशी सहज व स्वस्त मिळणारी भाजी आहे की ज्यात लोह ,'अ'जीवनसत्व भरपूर असते. पालक आपण खूप प्रकारानी आपल्या आहारात वापरू  शकतो.
उदा.भाजी,सूप,सलाड वेगवेगळे स्नॅक्स इत्यादी तर अशा या बहुउपयोगी पालकाचे आपण सूप बनवूया ! कसे पहा

साहीत्य :-

1) एक मध्यम जुडी ताजे पालक
2) लवंगा 4
3) दालचिनी एक इंच
4) मिरे 4-5
5) आले अर्धा इंच
6) लसूण 3-4 पाकळ्या
7) काॅर्न फ्लोअर 2 टेस्पून
8) दूध काॅर्न फ्लोअर मिक्स करण्यापुरते
9) साखर 1 लहान चमचा
10) मीठ चवीला
11) पाणी

कृती :-

       प्रथम पालकाची पाने निवडून स्वच्छ धुवून घ्यावीत.

नंतर ही पाने व लवंग,दालचिनी,मिरे,आले-लसूण गरम पाण्यात पाच-सात मिनिट वाफविण्यास टाकावीत. वाफून थंड होऊ द्यावे.

आता हे सर्व ब्लेडरने घुसळावे व मोठ्या गाळणीतून गाळून घ्यावे.आवशक्यतेनुसार पाणी घाला.थोडे दाटसरच असावे.

काॅर्नफ्लोअर थंड दूधात कालवून त्यात मिक्स करा. चवीला मीठ व साखर घालून एक उक्ळी आणण्यास गॅसवर ठेवा. सतत हलवत रहा.म्हणजे काॅर्नफ्लोअरच्या गुठळ्या होणार नाहीत.

उकळले की गरमा-गरम सर्व्ह करा.आवडत असेल तर वरून फ्रेश क्रीम घालावे.

टीप :- पालक फार वेळ शिजवू नये.सूपचा रंग पिवळसर येतो.तसेच चिमूटभर साखर जरूर घालावी म्हणजे हिरवा रंग टिकतो.

12 February 2015

काॅर्न कबाब (Corn Kabab)

No comments :

झटपट आणि  सोपा असा हा मक्याचा चटपटीत प्रकार आज बनविला .त्याचे साहीत्य काय आणि कसा बनविला पहा.

साहीत्य :-

1) वाफविलेले मक्याचे दाणे 2 वाट्या
2) उकडलेला 1 बटाटा
3) सिमला मिरची 2 बारीक चिरून
4) हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार
5) तांदुळाची पिठी दोन टेस्पून बाइंडींगसाठी
    (गरजेनुसार कमी-अधिक होऊ शकते)
6) मिठ
7) तेल तळणीकरता

कृती :-

       प्रथम मक्याचे दाणे  मिक्सरमधून काढून घ्यावेत.भरडच असावेत मधे-मधे मक्याचे दाणे राहू द्यावेत.खाताना दाताखाली आलेले चांगले लागतात.

नंतर त्यामध्ये उकडलेला बटाटा मॅश करून घालावा.तसेच सिमला मिरची, हिरवी मिरची, मिठ चवीला घालून नीट मिक्स करावे.

आता त्यामध्ये तांदुळाची पिठी घालावी व गोळा करावा.

तयार मिश्रणाचे हातावर लहान-लहान गोळे करून हलकेच दाबावे व तेलात तांबूस गुलाबी तळावेत.

पुदीन्याच्या हिरव्या चटणी सोबत खावेत.

टीप :-कबाब आपण शॅलोफ्राय पण करू शकतो.डाएट काॅनशिअस असणार्यानी शॅलो फ्राय करावेत.पण तळून खाण्याची मजा औरच !

07 February 2015

स्ट्राॅबेरी शेक (Strawberry shake )

No comments :

बर्याच वेळा मुले दूध प्यायचा कंटाळा करतात. त्याना रोज-रोज एकाच चवीचे दूध नको असते.तर त्याना अशा वेळी निरनिराळे फळांचे शेक करून द्यावेत.जसे की अॅपल शेक,मॅगो शेक,चिकू शेक तसेच आज मी करणार आहे स्ट्राबेरी मिल्क शेक !म्हणजे दूध ही पोटात जाते व फळे पण ! कसा करायचा पहा...

साहीत्य :-

1) स्ट्राॅबेरी 15-20
2) स्ट्राॅबेरी क्रश दोन टे.स्पून
3) स्ट्राबेरी इसेंन्स पाव टीस्पून
4) गायीचे अथवा टोन्ड मिल्क अर्धा लिटर
5) साखर 2 टेस्पून (गरज वाटली तर वापरावी)

कृती:-

       प्रथम स्ट्राॅबेरी स्वच्छ धुवून काप करून घ्याव्यात.

नंतर हे काप,साखर, क्रश सर्व एकत्र करून अर्धा कप दूध घालून ब्लेंड करावे. चांगले एकजीव झाले की राहीलेले दूध व इसेंन्स घालून परत थोडे ब्लेडरने घुसळावे.मस्त गुलाबी लालसर शेक तयार !

थंडगार सर्व्ह करा.

टीप :- स्ट्राॅबेरी छान पिकलेल्या व गोड असतील तर साखर वापरण्याची गरज नाही.

दूध कच्चे व थंड वापरावे.

06 February 2015

मटार कचोरी (Matar Kachori)

No comments :

कचोरी हा एक नाष्ट्याचा मसालेदार पदार्थ आहे.विशेषत: उत्तर भारतात दील्ली, गुजरात राजस्थान कडे लोकप्रिय आहे.कचोरीचे आतले सारण विविध प्रकारानी बनविले जाते.मूगडाळ, उडीद डाळ, बटाटा इ.मी आज मटार वापरून कचोरी बनवणार आहे.

साहीत्य :-

1) मैदा 2 वाटी
2) रवा 1/4 वाटी
3) मटार 2 वाटी
4) मिठ चवीनुसार , सोडा चिमूटभर
5) आले मिरची पेस्ट
6) जिरे
7) धना जिरा पावडर
8) आमचूर पावडर 1/4  टीस्पून
9) तेल
10)पाणी

कृती :-

     प्रथम मटार कुकरमधे शिजवून घ्यावेत. तोपर्यंत मैदा व रवा एकत्र करून त्यामधे मिठ सोडा व गरम तेल दोन टेबलस्पून घालावे.थोडे पाणी घेऊन पीठ मळावे आणी अर्धा तास झाकून ठेवून द्या.

आता  तोपर्यंत आतले सारण करूया. शिजलेले मटार घेऊन ते मॅश करावेत.

नंतर गॅसवर पॅनमधे अगदी थोडे तेल घालून त्यात जिरे टाका. मिरची आले पेस्ट टाका.आता मॅश केलेले मटर घाला.त्यावर मिठ,धना-जिरा पावडर,आमचूर पावडर घालून मिश्रण कोरडे होइपर्यत परतावे. गॅस बंद करून सारण थंड होउ द्यावे.

आता भिजलेल्या पिठाचा एक लहान गोळा घ्यावा व त्यात वरील सारण थोडे भरावे व नीट बंद करून जाडसरच पूरी लाटावी. गरम तेलात मंद तळावी.तांबूस रंग आला की काढावी.

थोडी गार झाली की खुसखूषीत होते.लाल किवा हिरव्या चटणी सोबत खायला द्यावी.


05 February 2015

मिक्स डाळ डोसा/अडई डोसा (Adai Dosa)

No comments :

अडई डोसा हा एक साउथ इंडीयन डोसा प्रकार आहे.विशेष करून तामिळनाडू मधे जास्त केला जातो.तर तसा सोपा व पौष्टीक असा हा डोसा कसा केला जातो ते बघा.

साहीत्य :-
1) मोठा तांदूळ 1 वाटी
2) उडद डाळ 1/2 वाटी
3) चना डाळ
4) तुर डाळ
5) मूगडाळ
6) मसूर डाळ
सर्व डाळी 1/4 वाटी
7) सुक्या लाल मिरच्या चार
8) मेथी दाणे 10-12
9) बारीक चिरून कांदा कोथंबिर
10) आले एक इंच बारीक चिरून
11) कडीपत्ता चिरून
12) मिठ
13) तेल
14) पाणी

कृती :-

     प्रथम तांदुळ व सर्व डाळी स्वच्छ निवडून धुवून चार ते पाच तास भिजत घाला.डाळीमधे भिजतानाच लाल मिरच्या व मेथी घाला.फक्त तांदुळ वेगळ्या भांड्यात भिजत टाका बाकी सर्व डाळी एकत्रच टाका.

चार-पाच तास भिजवून झाल्यानंतर डाळ व तांदळामधील पाणी निथळून काढा व मिक्सरवर वाटा .वाटताना गरज वाटली तर काढलेलेच पाणी थोडे थोडे वापरा.
मिश्रण फार घट्ट अथवा पातळ असू नये.

नंतर हे मिश्रण एका भांड्यात काढावे व सर्व मसाला व मिठ घालून हलवावे.

आता तव्याला तेलाचे ब्रशिंग करून गरम तव्यावर पळीने डोसा घालून थोडा पसरून घ्या वर झाकण ठेवून वाफ आणा व परत थोडे तेल सोडून उलट बाजूने जरा भाजा.हे डोसे तसे जाडसरच असतात.

तयार डोसा नारळाची चटणी ,सांबार किवा पुदीना चटणी आवडीनुसार कशा बरोबरही सर्व्ह करा छान लागतो.गरम डोसा नुसताही छान लागतो.

टीप:- या डोश्याला पीठ अंबवण्याची किंवा फुगण्याची गरज नसते.

आपल्या आवडीनुसार डाळी व डाळींचे प्रमाण आपण कमी-जास्त घेऊ शकतो.