आजकाल स्वीटकाॅर्न ( गोड मक्याची कणसे) बाजारात भरपूर प्रमाणात येतात.मक्याचा अनेक प्रकारानी आहारात वापर करता येतो.तसेच मका पौष्टीक पण असतो व पोटभरीचा पण! मक्याचे सूप जर एक बाऊल प्यायले तर एखादे रात्रीचे जेवण नाही घेतले तरी चालते.पोट भरते.तर हे सूप कसे करायचे ते पहा.
साहीत्य :-
1) मक्याचे दाणे वाफवलेले 2 वाट्या
2) गाजर जाड किसून एक
3) सिमला मिरची बारीक चिरून
4) कांदापात बारीक चिरून
5) बिन्स (सर्व भाज्या मिळून एक वाटी)
6) आले-लसूण बारीक चिरून ऐच्छिक
7) मिठ,मिरपूड चवीनुसार
8) बटर एक टेस्पून
9) काॅर्न फ्लोअर 2 टेबलस्पून
10) पाणी 4 वाट्या
कृती :-
प्रथम पॅनमधे बटर गरम करावे व आले,लसूण परतावे. त्यावर भाज्या टाकून थोडे परतून पाणी घाला.
पाण्याला ऊकळी येईपर्यंत मका अर्धी वाटी तसाचा बाजूला ठेउन बाकीचा मिक्सरवर भरड वाटून घ्या.
आता उकळलेल्या पाण्यात वाटलेली पेस्ट व काॅर्नफ्लोअर थोड्या पाण्यात मिक्स करून आणि अख्खा बाजूला ठेवलेला मका सर्व मिसळावे.मिरपूड, मिठ घालावे व एक उकळी येऊ द्यावे.
गरभा-गरम सर्व्ह करावे.
No comments :
Post a Comment