21 April 2018

मँगो फिरनी (Mango Firani)

No comments :

साधारण ख्रीरीसारखाच हा पदार्थ आहे. आजकालच्या पध्दतीनुसार डेजर्ट म्हणून थंड स्वरूपात खाल्ला जातो. मात्र आमच्याकडे गरम व खीर म्हणून जेवणात पोळीसोबत खायला आवडते. आपल्या आवडीनुसार कसेही खावे. आहे मात्र झकास पदार्थ. साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* बासमती तांदुळ १/४ कप
* दूध अर्धा लिटर
* मँगो पल्प २ आंब्याचा
* साखर अर्धा कप (आवडीनुसार कमी-जास्त)
* तूप १ टीस्पून
* वेलचीपूङ
* काजू, बदाम काप

कृती :-
प्रथम दूध एका पातेल्यात गरम करण्यास ठेवावे. दूध उकळू लागल्यावर मधे मधे ढवळत रहावे.

दूध उकळून थोडे घट्ट होईपर्यंत दोन आंब्याचा गर काढून ब्लेडरने घुसळून तयार करावा. तसेच तांदुळ धुवून, तूपावर थोडे परतून मिक्सरमधे  भरड वाटून घ्यावेत.

आता दूध चांगले उकळून दाट झालेले असेल त्यामधे वाटलेले भरड तांदुळ घालून पांच मिनिट उकळू द्यावे. शिजले की त्यामधे साखर, वेलचीपूङ घालून गँस बंद करावा.  पांच मिनिटानंतर तयार केलेला मँगो पल्प घालावा व एकत्र ढवळावे. शेवटी वरून काजू, बदाम चे काप घालावेत. मँगो फिरनी तयार!

आवडीनुसार थंड अथवा गरम खा.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

ढोकळा प्रीमिक्स (Dhokla Premix)

No comments :

सकाळच्या घाईमधे रोज नाष्टा काय करावा हा प्रश्न नेहमीच पडतो.  बरं, नाष्टा पौष्टीक हवे,  झटपट होणारा हवे व सर्वाना आवडणारा पाहीजे. तर या सर्व मापात बसणारा ढोकळा हा उत्तम पदार्थ आहे. याचे प्रीमिक्स तयार करून ठेवले तर सकाळी किंवा संध्याकाळी चहासोबत आपण पट्कन ढोकळा बनवू शकतो.तसैच मुलांना डब्यात ही देता येतो. तर प्रीमिक्स कसे करायचे साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* तांदुळ १ कप
* चणा डाळ १/२ कप
* उडीद डाळ १/४ कप
* साखर १/ ४ कप
* मीठ १ टेस्पून
* सोडा १ टेस्पून
* सायट्रीक अँसिड १ टेस्पून

ढोकळ्यासाठी साहित्य
* प्रीमिक्स १ कप
* पाणी १ कप
* चिमुटभर हळद
* हिरवी मिरची,आलं पेस्ट १ टीस्पून
* फोडणीसाठी तेल,हिंग,मोहरी,तिळ, कङीपत्ता
* सजावटीसाठी कोथिंबीर

कृती :-
प्रथम तांदुळ व दोन्ही डाळी एकत्र करून मिक्सरमधे पावडर करून घ्यावे.

नंतर मीठ, साखर, सोडा व सायट्रीक अँसिड एकत्र करून मिक्सरमधे पावडर करा.

आता वरील दोन्ही पावडरी एकत्र करून हलकेच एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यावे.

तयार झालेले प्रीमिक्स हवाबंद डब्यात भरून ठेवावे.  एक महीन्यापर्यंत टिकते.  गरजेनुसार प्रीमिक्स घेऊन ढोकळा बनवावा.

प्रीमिक्स ढोकळा कृती :-
प्रथम ढोकळा कुकरमधे तळाशी गरजेइतके पाणी घालून गरम करण्यास ठेवावे.  ढोकळा पात्राला तेलाचा हात लावून घ्यावा.

आता प्रीमिक्स एका बाऊलमधे घेऊन त्यामधे हळद व मिरची, आलं पेस्ट घालावी व गुठळ्या होणार नाहीत याची दक्षता घेत पाणी घालून ढवळावे.  तयार मिश्रण झटपट ढोकळा पात्रात ओतून, ढोकळा स्टँड कुकरमधे ठेवावे. पंधरा मिनिट वाफवावे.

आता ढोकळा वाफेपर्यंत फोडणी तयार करून ठेवावी.  ढोकळा वाफून तयार झाला की, थोडा थंड झाल्यावर एका थाळीत काढावा, त्यावर फोडणी चमच्याने पसररावी व वरून कोथिंबीर घालून कापून ढोकळा चटणीसोबत खायला द्या.

टिप्स :
* प्रेशर कुकर मधे करणार असाल तर रींग व शिट्टी काढावी.
* डाळी व सोडा, साखर वगेरे सांगितल्याप्रमाणे वेगवेगळेच बारीक करावे, अन्यथा पीठात गुठळ्या होऊ शकतात.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

मँगो फालुदा (Mango Falooda)

No comments :

उन्हाळ्याचे दिवसात थंडगार सरबत, लस्सी, निरनिराळे ज्यूस, फ्रूटशेक अशी पेयं प्यायला छान वाटतात. पण बाजारी पेये पिण्याऐवजी घरच्या घरी केली तर खूपच उत्तम. अन् थोडी पुर्वतयारी ठेवली तर घरी झटपट करणेही अवघड नसते. बर्याच निरनिराळ्या स्वादामधै फालुदा बनवला जातो. जसे केसर बदाम, कस्टर्ड फालुदा,  शाही फालुदा फ्रूट फालुदा इत्यादी..!तर आज मी मँगो फालुदा केला साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* तापवून गार केलेले दूध अर्धा लिटर
* पिकलेले आंबे २+२
* भिजवलेले सब्जा बी २ टेस्पून
* फालुदा शेवया किंवा साध्या शेवया अर्धा कप
* रोज सिरप अर्धा कप
* साखर २ टेस्पून
* व्हँनिला किंवा मँगो आईस्क्रीम
* टुटीफ्रूटी सजावटीसाठी
* ड्रायफ्रूट्स ऐच्छिक
इतक्या साहित्यामधे फोटो मधील साईजचे ५ ग्लास फालुदा होतो.

कृती :-
प्रथम दोन आंब्याचा पल्प तयार करून घ्यावा.  व राहीलेले दोन आंबे साल काढून लहान चौकोनी तुकडे करावेत.  यातील थोडे सजावटीसाठी बाजूला ठेवून बाकीचे तुकडे व साखर गार दूधामधे घालून ब्लेडर ने घुसळावे व मिल्कशेक तयार करून घ्यावा.

आता शेवया साध्या असतील तर गरम पाण्यात टाकून मऊ करून ध्याव्यात.  नंतर वरून गार पाणी घालून गाळून घ्याव्यात.

आता सर्व साहित्याची जमवा जमव झाली असेल तर छानपैकी एक मोठा काचेचा ग्लास घ्यावा.  त्यामधे सर्वात आधी तळाला एक चमचा रोज सिरप नंतर अनुक्रमे एकेक चमचा सब्जा बी,  शेवया, मँगो पल्प घालावे. परत असाच अजून एक लेयर तयार करून मग ड्रायफ्रूट्स व मिल्कशेक घालावा.  शेवटी आईस्क्रीम घालून वर टुटीफ्रूटी व आंब्याचे क्यूब सजावटीसाठी घालावे.

थंडगार सर्व्ह करावे.

टिप :-
* सर्व साहित्य आधीच तयार करून फ्रिजमधे थंड होण्यासाठी ठेवावे ऐनवेळी ग्लास मधे सर्व साहित्य एकत्र करून द्यावे.
* साखर आवडीनुसार कमी-जास्त करावी.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

15 April 2018

चाट कटोरी (Chaat Katori)

No comments :

चाट मधे पुरी नेहमीच वापरली जाते. तर थोडा वेगळा व आकर्षकपणा साठी ही चाटची कटोरी केली जाते. तसेच लहान मुलांची बर्थ-डे पार्टी किंवा घरी कोणी पाहुणे येणार असतील तर थोडा वेगळा म्हणून या कटोरी मधून चाट सर्व्ह करता येते. तसेच या कटोर्या आधीच करून हवाबंद डब्यात ठेवता येतात. त्यामुळे ऐनवेळी पटकन् हे चाट करता येते. तर कटोरीचे साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* मैदा १ कप
* मीठ चिमूटभर
* ओवा पाव टीस्पून
* मोहनसाठी गरम तेल २ टेस्पून
* तळणीसाठी आवश्यक तेवढे तेल
* पाणी
एवढ्या साहित्यात फोटोत दाखविलेल्या आकाराच्या पांच कटोर्या तयार होतात.

कृती :-
प्रथम मैदा चाळून एका पसरट भांड्यामधे घ्यावा  व त्यामधे मीठ, ओवा मिसळावा.

नंतर त्यामधे तेल गरम करून घालावे व पीठाला हाताने चोळावे.  आता अंदाज घेत पाणी घालून घट्ट पीठ मळावे.  दहा -पंधरा मिनिट झाकून ठेवावे. अंदाजे फक्त पाव कपच पाणी पुरते.

आता मंद आचेवर तेल गरम करावे. पीठाची लहान गोळी घ्यावी व मध्यम जाडीची पुरी लाटावी.  त्यावर काटेचमच्याने टोचावे व एक वाटी त्यावर ठेऊन तिला पुरी लपेटावी व वाटीसह गरम तेलात सोडावी व मंद आचेवरच तळावी.  तळताना हळू हळू झार्यान वाटीवर े तेल उडवावे वाटी सुटून येते ती चिमट्याने अलगद बाहेर काढा.  आता तेलातील पीठाची वाटी उलट-सुलट तांबूस रंगावर तळावी. (अधिक सविस्तर कृतीसाठी फोटो पहा)

तयार कटोर्या थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात. छान खुसखूषीत कडक रहातात. चाट करण्याचे वेळी पुरी घेऊन त्यामधे चाटचे सर्व साहित्य भरले की झाले कटोरी चाट!

टिप :-
* कटोरी अगदी मंद आचेवरच तळावी.
* पुरी फार पातळ अथवा जाड लाटू नये. फार पातळ लाटली तर हाताळणीमधे  कटोरी मोडते व लगेच चाट मऊ पडते. व फार जाड ठेवली तर कटकटीत होते व खाताना चाट चांगले लागत नाही. चाटची कटोरी नेहमी खुसखूषीतच असावी.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

कटोरी चाट (Katori Chaat)

No comments :

विविध चाट प्रकारापैकी हा एक चाटचा प्रकार आहे.  चटपटीत खायला सर्वानाच आवडते. या चाटच्या कटोरी आकारामुळे मुलांना जास्त आकर्षक वाटतो. यातील कटोर्या आपण आधीच करून हवाबंद डब्यात ठेऊ शकतो. ऐनवेळी फटाफट चटण्या व सर्व साहित्य घालून सर्व्ह करायचे. तर हे कटोरी चाट कसे करायचे साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* भिजवलेले छोले हरभरे १ वाटी
* बटाटे २ नग
* बारीक चिरलेला कांदा
* टोमँटो चिरून
* कोथिंबीर
* गोड व तिखट चटणी
* दही
* नायलाँन शेव
* भाजलेल्या जिर्याची पावडर
* चाट मसाला
* लाल मिरचीपूड
* मैद्याची तयार कटोरी 

कटोरी कशी करायची? पुढील लिंकवर पहा 👇 

http://swadanna.blogspot.in/2018/04/chaat-katori.html?m=1

कृती :-
प्रथम छोले व बटाटे मीठ, हळद घालून कुकरला उकडून घ्यावेत. तोपर्यंत बाकीचे साहित्य म्हणजे कांदा, कोथिंबीर चिरून, चटण्या तयार करून घ्याव्यात.

आता एका डिशमधे तयार कटोरी घ्या. त्यामधे सर्वात आधी उकडलेला बटाट्याच्या फोडी, छोले घालावेत. त्यावर चाटमसाला, जिरेपूड भुरभुरावी. दोन्ही चटण्या व दही घालावे.  त्यावर चिरलेला कांदा, टोमँटो घालावे. परत त्यावर चाटमसाला, जिरेपूड भुरभुरावी दोन्ही चटण्या, दही घालावे. शेवटी वरून भरपूर शेव व कोथिंबीर घालावी व खायला द्यावे.  यात आपल्या आवडीनुसार साहित्य कमी-जास्त भरावे.

टिप :-
* छोले, बटाच्याऐवजी मोड आलेले मूग किंवा गाजर, कोबी सारख्या भाज्या घेतल्या तरी चालतात. अधिक पौष्टीक होते.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

बटाटा पुरी ( Potato Puri)

No comments :

सर्वसामान्यपणे बटाटा लहान थोर सर्वांना आवडतो.  मुलांना तर बटाटा कोणत्याही स्वरूपात द्या.  भाजी, भजी, पराठे, चिवडा किंवा नुसताच उकडून सुध्दा.  बटाटा अनेक प्रकाराने वापरला जातो. स्वयंपाक घरात तर ऐनवेळचा मदतनीसच असतो. कोणत्याही भाजीत मिसळता येतो. अशा बटाट्याच्या नाष्ट्याला ऐनवेळी काय करावे?  हा प्रश्न पडल्याने, मी पुर्या केल्या. कशा करायच्या साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* बटाटे मध्यम आकाराचे ४ नग
* जाड पोहे १ वाटी
* काँर्नफ्लोअर २ टेस्पून
* कसूरी मेथी चिमूटभर
* कोथिंबीर बारीक चिरून
* धना-जीरा पावडर १ टीस्पून
* मीठ चवीनुसार
* तेल तळण्यासाठी

कृती :-
प्रथम बटाटे उकडावेत. थंड झाल्यावर सोलून, किसून घ्यावेत.

आता किसलेल्या बटाट्यामधे पोहे मिक्सरमधे पावडर करून,  काँर्नफ्लोअर व राहीलेले सर्व साहित्य घालावे व एकत्र मळून गोळा तयार करावा.  पाणी अजिबात घालू नये. तयार पीठाचा गोळा फ्रिजमधे १५ मिनिट सेट होण्यासाठी ठेवा.

पंधरा मिनिटानी गरम तेलात तयार पीठाच्या लहान-लहान पुर्या लाटून तळून घ्या व गरमा-गरम पुर्या साँस सोबत खायला द्या.

सहज सोपा सर्वांच्या आवडीचा नाष्टा तयार! घरी अचानक पाहुणे आले व उकडलेले बटाटे फ्रिजमधे असतील तर चहासोबत द्यायलाही मस्त पदार्थ आहे.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

04 April 2018

खरबूज मिल्कशेक ( Musk Melon Milkshake)

No comments :

खरबूज हे फळ खास करून उन्हाळ्यात येते. रसाळ, गोड चवीचे व गुणधर्माने थंड असते. याचा मिल्कशेक अतिशय उत्तम चवीचा लागतो.  कसा करायचा साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* खरबूज लहान आकाराचे १ नग ( साधारण ५०० ग्रॅम)
* थंड दूध अर्धा लिटर
* साखर ४ टेस्पून
* वेलचीपूड १/४ टीस्पून
* बदामाचे काप सजावटीसाठी

कृती :-
प्रथम खरबूज मधून कापून दोन भाग करावेत व आतील बीया काढून स्वच्छ करावे. नंतर साल काढून लहान चौकोनी तुकडे करावेत.

आता मिक्सर जारमधे खरबूजाचे तुकडे, साखर, वेलचीपूङ घालून मऊ पेस्ट करावी. नंतर सर्व पेस्ट झालीय का, कुठे तुकडे राहीले नाहीत ना याची खात्री करून नंतर दूध घालावे व परत एकदा सर्व एकजीव करावे.

आता तयार खरबूज शेक ग्लास मधे घालून वरून बदामाचे काप घालून सर्व्ह करावा. थंड हवे असेल तर आधीच करून फ्रिजमधे ठेवावा.  बर्फ अजिबात वापरू नये. 

टिप :- वेलचीपूङ आवर्जून घालावी.  स्वाद खूप छान येतो व वेलची प्रकृतीला थंड असते.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.