15 April 2018

बटाटा पुरी ( Potato Puri)

No comments :

सर्वसामान्यपणे बटाटा लहान थोर सर्वांना आवडतो.  मुलांना तर बटाटा कोणत्याही स्वरूपात द्या.  भाजी, भजी, पराठे, चिवडा किंवा नुसताच उकडून सुध्दा.  बटाटा अनेक प्रकाराने वापरला जातो. स्वयंपाक घरात तर ऐनवेळचा मदतनीसच असतो. कोणत्याही भाजीत मिसळता येतो. अशा बटाट्याच्या नाष्ट्याला ऐनवेळी काय करावे?  हा प्रश्न पडल्याने, मी पुर्या केल्या. कशा करायच्या साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* बटाटे मध्यम आकाराचे ४ नग
* जाड पोहे १ वाटी
* काँर्नफ्लोअर २ टेस्पून
* कसूरी मेथी चिमूटभर
* कोथिंबीर बारीक चिरून
* धना-जीरा पावडर १ टीस्पून
* मीठ चवीनुसार
* तेल तळण्यासाठी

कृती :-
प्रथम बटाटे उकडावेत. थंड झाल्यावर सोलून, किसून घ्यावेत.

आता किसलेल्या बटाट्यामधे पोहे मिक्सरमधे पावडर करून,  काँर्नफ्लोअर व राहीलेले सर्व साहित्य घालावे व एकत्र मळून गोळा तयार करावा.  पाणी अजिबात घालू नये. तयार पीठाचा गोळा फ्रिजमधे १५ मिनिट सेट होण्यासाठी ठेवा.

पंधरा मिनिटानी गरम तेलात तयार पीठाच्या लहान-लहान पुर्या लाटून तळून घ्या व गरमा-गरम पुर्या साँस सोबत खायला द्या.

सहज सोपा सर्वांच्या आवडीचा नाष्टा तयार! घरी अचानक पाहुणे आले व उकडलेले बटाटे फ्रिजमधे असतील तर चहासोबत द्यायलाही मस्त पदार्थ आहे.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

No comments :

Post a Comment