विविध चाट प्रकारापैकी हा एक चाटचा प्रकार आहे. चटपटीत खायला सर्वानाच आवडते. या चाटच्या कटोरी आकारामुळे मुलांना जास्त आकर्षक वाटतो. यातील कटोर्या आपण आधीच करून हवाबंद डब्यात ठेऊ शकतो. ऐनवेळी फटाफट चटण्या व सर्व साहित्य घालून सर्व्ह करायचे. तर हे कटोरी चाट कसे करायचे साहित्य व कृती-👇
साहित्य :-
* भिजवलेले छोले हरभरे १ वाटी
* बटाटे २ नग
* बारीक चिरलेला कांदा
* टोमँटो चिरून
* कोथिंबीर
* गोड व तिखट चटणी
* दही
* नायलाँन शेव
* भाजलेल्या जिर्याची पावडर
* चाट मसाला
* लाल मिरचीपूड
* मैद्याची तयार कटोरी
कटोरी कशी करायची? पुढील लिंकवर पहा 👇
http://swadanna.blogspot.in/2018/04/chaat-katori.html?m=1
कृती :-
प्रथम छोले व बटाटे मीठ, हळद घालून कुकरला उकडून घ्यावेत. तोपर्यंत बाकीचे साहित्य म्हणजे कांदा, कोथिंबीर चिरून, चटण्या तयार करून घ्याव्यात.
आता एका डिशमधे तयार कटोरी घ्या. त्यामधे सर्वात आधी उकडलेला बटाट्याच्या फोडी, छोले घालावेत. त्यावर चाटमसाला, जिरेपूड भुरभुरावी. दोन्ही चटण्या व दही घालावे. त्यावर चिरलेला कांदा, टोमँटो घालावे. परत त्यावर चाटमसाला, जिरेपूड भुरभुरावी दोन्ही चटण्या, दही घालावे. शेवटी वरून भरपूर शेव व कोथिंबीर घालावी व खायला द्यावे. यात आपल्या आवडीनुसार साहित्य कमी-जास्त भरावे.
टिप :-
* छोले, बटाच्याऐवजी मोड आलेले मूग किंवा गाजर, कोबी सारख्या भाज्या घेतल्या तरी चालतात. अधिक पौष्टीक होते.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.
No comments :
Post a Comment