सकाळच्या घाईमधे रोज नाष्टा काय करावा हा प्रश्न नेहमीच पडतो. बरं, नाष्टा पौष्टीक हवे, झटपट होणारा हवे व सर्वाना आवडणारा पाहीजे. तर या सर्व मापात बसणारा ढोकळा हा उत्तम पदार्थ आहे. याचे प्रीमिक्स तयार करून ठेवले तर सकाळी किंवा संध्याकाळी चहासोबत आपण पट्कन ढोकळा बनवू शकतो.तसैच मुलांना डब्यात ही देता येतो. तर प्रीमिक्स कसे करायचे साहित्य व कृती-👇
साहित्य :-
* तांदुळ १ कप
* चणा डाळ १/२ कप
* उडीद डाळ १/४ कप
* साखर १/ ४ कप
* मीठ १ टेस्पून
* सोडा १ टेस्पून
* सायट्रीक अँसिड १ टेस्पून
ढोकळ्यासाठी साहित्य
* प्रीमिक्स १ कप
* पाणी १ कप
* चिमुटभर हळद
* हिरवी मिरची,आलं पेस्ट १ टीस्पून
* फोडणीसाठी तेल,हिंग,मोहरी,तिळ, कङीपत्ता
* सजावटीसाठी कोथिंबीर
कृती :-
प्रथम तांदुळ व दोन्ही डाळी एकत्र करून मिक्सरमधे पावडर करून घ्यावे.
नंतर मीठ, साखर, सोडा व सायट्रीक अँसिड एकत्र करून मिक्सरमधे पावडर करा.
आता वरील दोन्ही पावडरी एकत्र करून हलकेच एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यावे.
तयार झालेले प्रीमिक्स हवाबंद डब्यात भरून ठेवावे. एक महीन्यापर्यंत टिकते. गरजेनुसार प्रीमिक्स घेऊन ढोकळा बनवावा.
प्रीमिक्स ढोकळा कृती :-
प्रथम ढोकळा कुकरमधे तळाशी गरजेइतके पाणी घालून गरम करण्यास ठेवावे. ढोकळा पात्राला तेलाचा हात लावून घ्यावा.
आता प्रीमिक्स एका बाऊलमधे घेऊन त्यामधे हळद व मिरची, आलं पेस्ट घालावी व गुठळ्या होणार नाहीत याची दक्षता घेत पाणी घालून ढवळावे. तयार मिश्रण झटपट ढोकळा पात्रात ओतून, ढोकळा स्टँड कुकरमधे ठेवावे. पंधरा मिनिट वाफवावे.
आता ढोकळा वाफेपर्यंत फोडणी तयार करून ठेवावी. ढोकळा वाफून तयार झाला की, थोडा थंड झाल्यावर एका थाळीत काढावा, त्यावर फोडणी चमच्याने पसररावी व वरून कोथिंबीर घालून कापून ढोकळा चटणीसोबत खायला द्या.
टिप्स :
* प्रेशर कुकर मधे करणार असाल तर रींग व शिट्टी काढावी.
* डाळी व सोडा, साखर वगेरे सांगितल्याप्रमाणे वेगवेगळेच बारीक करावे, अन्यथा पीठात गुठळ्या होऊ शकतात.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.
No comments :
Post a Comment