31 May 2016

पालक राईस (Palak Rice)

No comments :

नेहमी नेहमी डाळ-भात खाऊन कंटाळा येतो. किंवा रात्रीच्या जेवणात फारशी भूक नसते पण थोडेफार खाण्याची इच्छा असते. अशावेळी भाजी,भात एकच डिश करून वन डिश मील म्हणून हा भात करावा.  साहीत्य व कृती :-

साहीत्य :-

* चिरलेले पालक मोठ्या २ वाट्या
* तांदुळ २ वाटी
* आलं-लसूण, मिरची पेस्ट १ टीस्पून
* लवंगा ४,दालचिनी ३-४ तूकडे
* तमालपत्रं,  जीरे
* गरम मसाला १ टीस्पून*मटार /शिमला मिरची /ड्रायफ्रूट्स (ऐच्छीक)

* मीठ चविनूसार

* तेल किवा बटर

कृती :-

प्रथम पालक गरम पाण्यात ब्लांच करून घ्यावे. थंड होऊ द्या. नंतर मिक्सरमधे पेस्ट करा.

तोपर्यत भात कुकरला मोकळा शिजवून घ्या. शिजवतानाच मीठ चविनूसार घाला. थंड होऊ द्या.

आता पॅनमधे तेल गरम करा व त्यामधे जीरे व लवंग, दालचिनी, तमालपत्रं घाला.मिरची,आलं-लसूण पेस्ट घाला. आताच मटार किंवा ड्रायफ्रूट्स जे असेल घेतलेले ते घाला. त्यावर तयार पालक पेस्ट घालून थोडे परता. आताच गरम मसालाही घाला.

शेवटी शिजवून थंड केलेला भात घाला. व्यवस्थित सर्व हलवून एक  वाफ येऊ द्या.

गरम भात आवडत असेल तर,पापड, लोणचे किया दही घेऊन खा.

टीप - आपल्या आवडीनुसार गाजर, मटार, बटाटा यातील एखादी भाजी घातली तरी छान लागती. मी मटार घातले. 

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

18 May 2016

कोबी-काकडी रायता (Raita)

No comments :

रोजच्या जेवणात नुसती पोळी-भाजी खाण्यपेक्षा जोडीला लोणचे, कोशिंबिर, रायते असे पदार्थ ताटात डाव्या बाजूला असले की,जेवणाची लज्जत आणखी वाढते. तसेच हे पदार्थ रोज जेवणात असावेतच. म्हणून मी आज फ्रिजमधे शिल्लक होते त्या भाज्या घेऊन झटपट रायते केले. कसे पहा साहीत्य व कृती :-

साहीत्य :-
* काकडी एक बारीक कोचून
* कोबी चिरून 1वाटी
* एक लाल टोमँटो चिरून
* कांदा 1 बारीक चिरून
* डाळींबाचे दाणे मूठभर
* कोथंबिर चिरून
* हिरवी मिरची बारीक चिरून 1
* मीठ व साखर चविनुसार
* ताजे घट्ट दही 4 टेस्पून

कृति:-

एक बाउल घ्या. त्यामधे वरील चिरलेले सर्व साहीत्य घाला.

चविला मीठ व साखर घाला.

शेवटी ऐत्यावेळी दही घाला.

सर्व व्यवस्थित हलवा.
जेवताना ताटात डाव्या बाजूला वाढा. लाल, हिरवे, पांढरे अशी रंगसंगती खूप छान दिसते व लहान मुले सुध्दा आवडीने खातात. तूम्हीही करून बघा. 

टीप: आपल्या जवळ जे साहीत्य उपलब्ध असेल ते व आपल्या आवडीच्या प्रमाणात घ्या

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

15 May 2016

ओरीओ मिल्कशेक (Oreo Milkshake)

No comments :

सर्वसामान्यपणे मुलांना कोणत्याही पदार्थाचा चाँकलेट फ्लेवर प्रचंड आवडतो. बिस्कीट असो किंवा मिल्कशेक, आईस्क्रिम असो मुले चाँकलेट स्वादाला प्राधान्य देतात. तर मुलांच्या आवडीचा चाँकलेट फ्लेवरचा मिल्कशेक कसा केला पहा. साहीत्य व कृती -

साहीत्य :-
* थंड दूध अर्धा लिटर
* चाँकलेट क्रिम ओरीओ बिस्कीट्स 5 नग
* कोको पावडर 1टेस्पून
* चाँकलेट इसेंन्स 4-5 थेंब
* पिठीसाखर 2 टीस्पून
* व्हँनिला आईसक्रीम 2 स्कूप
* चाँकलेट चिप्स किंवा शेव गार्निशिंग साठी

कृती :-

प्रथम मिक्सरमधे बिस्कीट्स तूकडे करून टाका. पावडर करून घ्या. नंतर  कोको पावडर, साखर, इसेंन्स व दूध घालून परत एकदा हलकेच फिरवा.

आता दोन मोठे ग्लास घ्या. त्यामधे आधि तयार केलेले दूध घाला. नंतर आईसक्रीम घाला. शेवटी वरून चोको चिप्स किंवा शेव भुरभूरा.

थंडगार प्यायला द्या. मुलांना खूप आवडतो.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.