22 June 2016

रवा आम्लेट( Rawa Omelette)

No comments :
हा एक नाष्ट्यासाठी पोटभरीचा,पौष्टीक व झटपट होणारा पदार्थ आहे. काही वेगळे खाण्याची इच्छा झाली तर,किंवा ऐनवेळी पाहुणे घरी आले असता वेगळा पदार्थ म्हणून करायला सोईचा व उत्तम पदार्थ आहे. साहीत्य व कृती -
साहीत्य :-
* बारीक रवा २ वाट्या
* चणाडाळ पीठ २ टेस्पून
* तांदुळाचे पीठ १ टेस्पून
* आंबट दही अर्धी वाटी
* बारीक चिरून कांदा १
* बारीक चिरून टोमँटो १
* कोथंबिर, कढीपत्ता
* बारीक चिरून हिरवी मिरची आवडीनुसार
* मीठ चविनूसार
* तेल
* पाणी गरजेनुसार
कृती :-
प्रथम रवा एका बाउल मधे घेऊन त्यामधे डाळीचे व तांदुळाचे पीठ मिसळावे.
नंतर त्यामधे चिरलेला कांदा, टोमँटो, मिरची, कोथंबिर व मीठ घालावे. आता दही व आवश्यकतेनुसार पाणी घालून दाटसर पीठ तयार करावे. फार पातळ अथवा घट्ट असू नये. डावाने तव्यावर घालता येईल इतपत पातळ ठेवावे.  १०-१५ मिनिट झाकून ठेवा.
आता तवा गरम करून त्यावर तेल सोडा व डावाने जाडसरच असे आम्लेट पसरवा. एकाच बाजूने तेल सोडून, छान भाजून घ्यावे.
गरमा-गरम तयार आम्लेट आवडीनुसार हिरवी चटणी /साँस सोबत खायला द्यावे. नुसतेसुध्दा खाल्ले तरी छानच लागते.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

19 June 2016

कच्चे केळ कटलेट (Banana Cutlet)

No comments :

उपवास आहे म्हटले की, हमखास त्यादिवशी काहीतरी चटपटीत खावे वाटते. पण असे चटपटीत पदार्थ खाताना तब्येतीचीही काळजी घ्यावी लागते. उपवासा दिवशी जास्त तेलकट, तिखट पदार्थ घशाशी येतात. तेव्हा तब्येत सांभाळून, चटपटीत पण पौष्टीक कटलेट करू.साहीत्य व कृती -

साहीत्य :-
* कच्ची केळी ४ नग
* बटाटे २
* शिंगाडा पीठ २ टेस्पून
* जीरेपूड १ टीस्पून
* मीठ चविनूसार
* हिरवी मिरची पेस्ट आवडीनुसार
* तेल

कृती :-

प्रथम केळी व बटाटे उकडून घ्या. थंड झाल्यावर  दोन्ही साल काढून मँश करून घ्या.

आता मँश केलेल्या लगद्यामधे शिंगाडा पीठ व मीठ, मिरची, जीरेपूड घाला व चांगले मळा.

आता तयार मिश्रणाचा लिंबा एवढा गोळा घ्या व हाताने साधारण चपटा आकार द्या. फ्रायपँनमधे थोडे -थोड़े तेल घालून शॅलोफ्राय करा.डीपफ्राय केले तरी चालते.

भाजलेल्या दाण्याच्या कुटामधे चिमूटभर मीठ,  लाल मिरचीपूड व दही घालून चटणी तयार करा व तयार कटलेट सोबत द्या.

टीप: जर उपवास नसेल तर, शिंगाडा पीठाऐवजी काॅर्नफ्लोअर घातले तरी चालते.
तसेच आवडत असेल तर लसूण,आलं पेस्टही घालावे. सोबत टोमँटो साँस द्यावे.

केळी व बटाटे एकत्र उकडू नये. कारण केळी उकडायला बटाट्यापेक्षा कमी वेळ लागतो. व केळी एकदम मऊ होण्याची भिती असते. तसेच दोन्हीही २ तास आधी वाफवलेले असले किंवा आदले दिवशी उकडून फ्रिज मधे ठेवलेले असले तर जास्तच चांगले. म्हणजे मिश्रण चिकट होत नाही व कटलेट खुसखूषीत होतात.

मी ओवनला हाय टेम्परेचर वर केळी दीड मिनट व बटाटा 3 मिनट उकडला.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

13 June 2016

कोबी पकोडा (Cabbage Pakoda)

No comments :

कोबीची भाजी म्हटले की बरेचवेळा नाक मुरडले जाते. पण मंडईत उपलब्ध असणार्या भाज्या व्यतिरीक्त वेगळ्या भाज्या तरी काय आणणार? तरी त्याची वेगवेगळ्या प्रकारांनी भाजी तर कधी पराठे, कोशिंबिर असे प्रकार केले जातात. आज कोबीचे पकोड़े काढले. मस्त झाले. कसे केले साहीत्य व कृती :-

साहीत्य :-
* लांब व बारीक चिरून कोबी २ वाट्या
* चणाडाळ पीठ गरजे नुसार. अंदाजे १/२ वाटी
* आलं-लसूण, हिरवी मिरची पेस्ट
* कोथंबिर
* मीठ, हळद, हींग
* धना-जिरा पावडर
* तळणीसाठी तेल
कृती :-

प्रथम चिरलेला कोबी एका बाऊलमधे घेऊन त्यावर मीठ व हळद घालून चोळा. तसेच १० मिनिट झाकून ठेवा.

आता १० मिनिटानंतर त्याला पाणी सुटलेले असेल, त्यात मावेल इतकेच डाळीचे पीठ घाला.आंल -लसूण,मिरची पेस्ट, चिरून कोथंबिर, धना-जीरा पावडर, हींग सर्व घाला. हलक्याच हाताने नीट मिक्स करा.

गरम तेलात कांदाभजी प्रमाणे तळून काढा. मस्त कुरकुरीत पकोडे गरम-गरम सर्व्ह करा.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

06 June 2016

मँगो हलवा (Mango Halawa)

No comments :

अंबा फळांचा राजा!वर्षातून एकदाच येतो. त्यामुळे भाव पण जादा खातों.महीनाभर मनसोक्त खाल्ला जातो. तरीही त्याचे परतायचे दिवस आले की,थोडे वाईटच वाटते. मग वर्षभर चाखता यावा म्हणून मुरांबा, जाम, छुंदा करून ठेवला जातो. तसेच अंब्याची पोळी, साठा असेही केले जाते. मी तर शेवटी -शेवटी आम्रखंड, आंब्याच्या वड्या, आईस्क्रिम, फालुदा, मँगो शेक असे बरेच अंब्याचे पदार्थ एकदा एकदा करतेच. आज 'आंब्याचा शिरा' केला. कसा केला साहीत्य व कृती :-

साहीत्य :-
* रवा १ वाटी
* साखर १ वाटी
* तूप १/२ वाटी
* पाणी १ वाटी
* आंब्याचा रस १ वाटी
* वेलचीपूड
* काजू सजावटीला

कृती :-

प्रथम कढईत तूप गरम करावे व रवा छान गुलाबी भाजून घ्या.

आता गरम पाणी घाला. हलवत-हलवत च अंब्याचा रस घाला. मोकळे होईपर्यंत हलवत रहा.

शेवटी साखर घाला. गुठळी होणार नाही याची खबरदारी घेऊन साखर विरघळे पर्यंत हलवत रहा.

शेवटी गँस बंद करून वेलचीपूड घाला. खायला देताना वरून तूप एक चमचा सोडा व काजू घालून गरम खायला द्या.

त्याचा रंग व स्वाद इतका सुंदर आहे की बघताच क्षणी तोंडाला पाणी सुटते.  तूम्हीही  करून बघा. नक्की आवडेल.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.