19 June 2016

कच्चे केळ कटलेट (Banana Cutlet)

No comments :

उपवास आहे म्हटले की, हमखास त्यादिवशी काहीतरी चटपटीत खावे वाटते. पण असे चटपटीत पदार्थ खाताना तब्येतीचीही काळजी घ्यावी लागते. उपवासा दिवशी जास्त तेलकट, तिखट पदार्थ घशाशी येतात. तेव्हा तब्येत सांभाळून, चटपटीत पण पौष्टीक कटलेट करू.साहीत्य व कृती -

साहीत्य :-
* कच्ची केळी ४ नग
* बटाटे २
* शिंगाडा पीठ २ टेस्पून
* जीरेपूड १ टीस्पून
* मीठ चविनूसार
* हिरवी मिरची पेस्ट आवडीनुसार
* तेल

कृती :-

प्रथम केळी व बटाटे उकडून घ्या. थंड झाल्यावर  दोन्ही साल काढून मँश करून घ्या.

आता मँश केलेल्या लगद्यामधे शिंगाडा पीठ व मीठ, मिरची, जीरेपूड घाला व चांगले मळा.

आता तयार मिश्रणाचा लिंबा एवढा गोळा घ्या व हाताने साधारण चपटा आकार द्या. फ्रायपँनमधे थोडे -थोड़े तेल घालून शॅलोफ्राय करा.डीपफ्राय केले तरी चालते.

भाजलेल्या दाण्याच्या कुटामधे चिमूटभर मीठ,  लाल मिरचीपूड व दही घालून चटणी तयार करा व तयार कटलेट सोबत द्या.

टीप: जर उपवास नसेल तर, शिंगाडा पीठाऐवजी काॅर्नफ्लोअर घातले तरी चालते.
तसेच आवडत असेल तर लसूण,आलं पेस्टही घालावे. सोबत टोमँटो साँस द्यावे.

केळी व बटाटे एकत्र उकडू नये. कारण केळी उकडायला बटाट्यापेक्षा कमी वेळ लागतो. व केळी एकदम मऊ होण्याची भिती असते. तसेच दोन्हीही २ तास आधी वाफवलेले असले किंवा आदले दिवशी उकडून फ्रिज मधे ठेवलेले असले तर जास्तच चांगले. म्हणजे मिश्रण चिकट होत नाही व कटलेट खुसखूषीत होतात.

मी ओवनला हाय टेम्परेचर वर केळी दीड मिनट व बटाटा 3 मिनट उकडला.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

No comments :

Post a Comment