हा एक नाष्ट्यासाठी पोटभरीचा,पौष्टीक व झटपट होणारा पदार्थ आहे. काही वेगळे खाण्याची इच्छा झाली तर,किंवा ऐनवेळी पाहुणे घरी आले असता वेगळा पदार्थ म्हणून करायला सोईचा व उत्तम पदार्थ आहे. साहीत्य व कृती -
साहीत्य :-
* बारीक रवा २ वाट्या
* चणाडाळ पीठ २ टेस्पून
* तांदुळाचे पीठ १ टेस्पून
* आंबट दही अर्धी वाटी
* बारीक चिरून कांदा १
* बारीक चिरून टोमँटो १
* कोथंबिर, कढीपत्ता
* बारीक चिरून हिरवी मिरची आवडीनुसार
* मीठ चविनूसार
* तेल
* पाणी गरजेनुसार
* बारीक रवा २ वाट्या
* चणाडाळ पीठ २ टेस्पून
* तांदुळाचे पीठ १ टेस्पून
* आंबट दही अर्धी वाटी
* बारीक चिरून कांदा १
* बारीक चिरून टोमँटो १
* कोथंबिर, कढीपत्ता
* बारीक चिरून हिरवी मिरची आवडीनुसार
* मीठ चविनूसार
* तेल
* पाणी गरजेनुसार
कृती :-
प्रथम रवा एका बाउल मधे घेऊन त्यामधे डाळीचे व तांदुळाचे पीठ मिसळावे.
नंतर त्यामधे चिरलेला कांदा, टोमँटो, मिरची, कोथंबिर व मीठ घालावे. आता दही व आवश्यकतेनुसार पाणी घालून दाटसर पीठ तयार करावे. फार पातळ अथवा घट्ट असू नये. डावाने तव्यावर घालता येईल इतपत पातळ ठेवावे. १०-१५ मिनिट झाकून ठेवा.
आता तवा गरम करून त्यावर तेल सोडा व डावाने जाडसरच असे आम्लेट पसरवा. एकाच बाजूने तेल सोडून, छान भाजून घ्यावे.
गरमा-गरम तयार आम्लेट आवडीनुसार हिरवी चटणी /साँस सोबत खायला द्यावे. नुसतेसुध्दा खाल्ले तरी छानच लागते.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment