01 July 2016

मेदूवडा (Meduvada)

No comments :

आजकाल सर्वच प्रांतातील लोक आवडीने दुसर्या प्रांतातील एकमेकांचे पदार्थ करतात.  तसेच हा मेदूवडा मुख्यतः साउथ इंडियन पदार्थ आहे. पण सगळीकडे केला जातो. कसा करायचा साहीत्य व कृती :-
साहीत्य :-
* उडीद डाळ २ वाट्या
* ओल्या खोबर्याचे पातळ काप आवडीनुसार
* मिरपूड भरड ७-८ मिर्याची
* मीठ चविनूसार
* कढीपत्ता ७-८ पाने चिरून
* हिरवी मिरची बारीक चिरून
* आलं किसून
* तेल तळण्यासाठी

कृती -

प्रथम डाळ तीन-चार वेळा धुवून घ्या. नंतर ५-६ तास भिजत घाला. नंतर त्यातील पाणी काढून टाकावे आणि मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटावे. वाटताना पाणी अजिबात घालू नये.

मिक्सरमधून मिश्रण एका खोलगट बाऊलमधे काढावे. हे मिश्रण शक्यतो हातानेच फेसावे, म्हणजे हाताने थापटी देउन बोटांनी मिश्रण वर उचलावे. असे जलद गतीने मिश्रण वर खाली करावे. काही मिनिटातच मिश्रण हातालाच हलके झालेले जाणवेल. मिश्रण हॅण्ड मिकसरने, एग बिटरने किंवा चमच्याने ३ ते ४ मिनीटे घोटल तरी चालते . यामुळे उडीद डाळीचे वाटण हलके होते, नंतर मिरे, खोबर्‍याचे काप, हिरव्या मिरच्या, आले, कढीपत्ता पाने आणि चवीपुरते मिठ असे घालून मिक्स करावे.

आता आधी हात ओला करावा, म्हणजे हाताला मिश्रण  चिकटत नाही. व  लिंबाएवढे मिश्रण हातात धेऊन वड्याला मध्यभागी भोक पाडून तेलात सोडावे. खरपूस तळावे.

टीप :- तळणीसाठी तेल गरम करावे आणि गॅस हायवरच,मोठा ठेवावा. अन्यथा वडे तेलकट होतात.

मिश्रण भरपूर फेटावे. वडे हलके होतात.

मिश्रण फार घट्ट वाटले तर थोडे पाणी घाला. नाहीतर वडे पोटात घट्ट होतात.

फार पातळ झाले तर तांदुळाचे पीठ घाला. कुरकुरीत पण होतात.

डाळ तिचे पांढरे चिकट पाणी जाईपर्यत 3-4 वेळा अवश्य धुवा. त्याने वडे हलके होण्यास मदत होते.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

No comments :

Post a Comment