15 May 2017

उकडीचे आंबा मोदक (Mango Modak)

No comments :
गणपती बाप्पाला आवडणारे मोदक हा एक पारंपरिक पक्वान्नाचा प्रकार आहे. मोदकात असंख्य वेगवेगळे नमुने करता येतात. जसे खव्याचे,रव्याचे कणिकेचे तळून, वाफवून,पीठीचे उकडीचे, चाँकलेट,आंबा... इत्यादी! तसे आज मी आंब्याचीच उकड व आतील सारण पण आंब्याचेच भरून उकडीचे आंबा मोदक बनवले. कसे ते पहा  साहित्य व कृती-

साहित्य :-
सारणासाठी
* खवलेलं ओलं खोबरं २ वाट्या
* साखर १ वाटी
* मँगो पल्प १ वाटी
वरील आवरणासाठी
* तांदुळाचे पीठ २ वाट्या
* पाणी २ वाट्या
* मँगो पल्प ३/४ (पाऊण) वाटी
* मँगो इसेन्स ४-५ थेंब
* मीठ चिमुटभर
* तेल/तूप २ टीस्पून

कृती :-
प्रथम खोबरं, साखर व मँगो पल्प एकत्र करून सारण साधारण कोरडे होईपर्यंत शिजवून तयार करावे. थंड होण्यासाठी ठेवून द्यावे.

आता दोन वाट्या पाणी गरम करण्यास ठेवावे. त्यामध्ये आधी चिमुटभर मीठ व दोन चमचे तेल /तूप घालावे. उकळी आली की मँगो पल्प व इसेन्स घालावे व सर्व एकत्र उकळू लागले की लगेच तांदुळ पीठी घालावी व रवीच्या टोकाने व्यवस्थित गुठळी होणार नाही याची काळजी घेऊन ढवळावे. व गँस बंद करून झाकणी घालून १५ मिनिटे ठेवून द्यावे.

पंधरा मिनिटानंतर तयार उकड तेल पाण्याच्या हाताने चांगली मळून,  एका भांङ्यामधे झाकून ठेवावी.
आता त्यातील थोडी-थोडी उकड घेऊन हाताने किंवा साच्याने आधीच तयार केलेले सारण भरून मोदक तयार करावेत व चाळणीवर किंवा मोदक पात्रात १५ मिनिट वाफवून घ्यावेत.

गरमा-गरम गोड लुसलू़शित मोदक साजूक तुपाची धार सोडून खायला द्या.

या मोदकांचा रंग अतिशय सुंदर व मोहक दिसतो की बघताच क्षणी खावे वाटतात. व चवही अप्रतिम लागते. तुम्हीही करून बघा नक्की आवडतील.

टीप्स :- आंबा सीजन नसेल तेव्हा पँक टीनचा मँगो पल्प वापरला तरी चालतो. 

आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

08 May 2017

कोकम सरबत(Kokum Sharbat)

No comments :

आमसुल किंवा कोकम किंवा यालाच कोकणात रातांबा असेही म्हणतात. कोकम कोकण, गोव्याची खासियत आहे. ही आंबट -गोड चविची रसाळ फळे असतात. कच्ची असताना रंग हिरवा असतो. पिकल्यावर लाल रंग येतो. या पिकलेल्या लाल फळांच्या रसापासून "कोकम सरबत" केले जाते. या सरबतापासून प्रकृतिला थंडावा मिळतो. उन्हाळी उष्णतेच्या अनेक विकारांवर अत्यंत गुणकारी आहे. तसेच ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी रोज एक ग्लास हे सरबत प्यावे. पित्तशामक आहे. उन्हाळ्यात बाजारी रंग-बिरंगी कृत्रिम सरबत पिण्यापेक्षा हे आयुर्वेदीक सरबत उत्तम आहे. कोकम सरबताला फ्रिजमधे ठेवायची आवश्यकता नहीं. बाहेरही वर्षभर टिकते. कोकमची फळे उन्हाळी सिझनमधे येतात. याच्या रसापासून सरबत (किंवा याला "आगळ " ही म्हणतात) तयार केले जाते. शक्य असेल तर फळे विकत आणून घरीच करून ठेवावे. अथवा आजकाल बाजारात तयार आगळ मिळते. घरी आणून गरजेनुसार साखर, मीठ,पाणी घालून सरबत तयार करावे. कोकम सरबत कसे करायचे साहित्य व कृती-👇

साहित्य :-
अर्क तयार करण्यासाठी,
* कोकम फळे १ किलो
* साखर फळे बुडतील इतकी. अंदाजे २ ते २.५ किलो
सरबतासाठी,
* मीठ चिमूटभर (ऐच्छीक)
* जिरेपूड
* लिंबू स्वादासाठी (ऐच्छीक) 
* अर्क १भाग +पाणी ३ भाग

कृती :-
प्रथम कोकमची लाल पिकलेली फळे आणून स्वच्छ धुवून घ्यावीत. नंतर चाकूने चिरा माराव्यात.

नंतर त्यामधे साखर मिसळून बरणीत भरून ४ -६ दिवस ठेवावे. मधून मधून बरणी हलवत रहावी.

चार-सहा दिवसांनी भरपूर रस सुटतो.हा रस गाळणीने गाळून बाटलीमधे भरून ठेवावा. हा झाला अर्क किंवा आगळ. हे वर्षभर टिकते.

आता गरजेनुसार जेव्हा प्यायचे तेव्हा एका भांङ्यामधे एक भाग आगळ व तीन भाग थंड पाणी घालावे.

त्यामधे आवडीनुसार जिरेपूड, मीठ व लिंबू घालून ढवळावे व थंडगार प्यायला द्यावे.

आंबट -गोड चवीचे कोकम सरबत खूप सुंदर लागते व तहान भागते. रंगही आकर्षक लाल दिसतो.

टिप :
* तयार करून ठेवलेले आगळ सोलकढी साठी किंवा आमटी, भाजीत स्वयंपाकातही वापरता येते .

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

05 May 2017

छिलका मुगडाळ -व्हेज वडी ( Dal vadi)

No comments :

मधल्या वेळचे खाणं किंवा जेवणात साईड डिश म्हणून या वड्या खूप चविष्ट लागतात. पौष्टीक व करायला सहज सोप्या आहेत. कशा करायचा साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* छिलका मुगडाळ २ वाट्या (२ तास भिजवलेली)
* खिसलेला कोबी अर्धी वाटी
* पालक चिरून अर्धी वाटी
* खिसलेले गाजर अर्धी वाटी
* हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट २ टीस्पून
* मीठ चवीनुसार
* लाल मिरचीपूड १ टीस्पून
* हळद १/२ टीस्पून
* हींग चिमूटभर
*आमचूर पावडर १ टीस्पून
* धना-जिरा पावडर २ टीस्पून
* तिळ २ टीस्पून
* तेल तळण्यासाठी

कृती :-
प्रथम डाळ मिक्सरमधे मोटसर वाटून घ्यावी. नंतर त्यामधे वरील सर्व मसाला मिसळावा.

नंतर ढोकळा पात्राला तेलाचा हात लावून ताटलीमधे तयार मिश्रण ओतावे व १५-२० मिनिट कुकरमधे शिट्टी काढून वाफवावे.

वाफवून झाल्यानंतर कुकरमधून बाहेर काढून ठेवावे व थंड झाल्यावर चाकूने चौकोनी वड्या कापाव्यात.

शेवटी गरम तेलामधे खरपूस तळाव्यात व गरमा-गरम खायला द्याव्यात.

टीप :-
* आपल्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या घ्याव्यात.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

आटा हलवा (Aata Halawa)

No comments :

'आटा हलवा' पौष्टीक व करायला एकदम सोपा आहे. खायलाही रूचकर लागतो. हा हलवा पंजाबी लंगरमधे,गुरूद्वारामधे प्रसाद म्हणून दिला जातो. याला 'कडा प्रसाद' असे न्हणतात. कसा करायचा साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* गव्हाचे पीठ १ वाटी
* साखर १ वाटी
* तूप १ वाटी
* पाणी किंवा दूध ३ वाट्या
* वेलचीपूड, ड्रायफ्रूट्स

कृती :-
प्रथम गव्हाचे पीठ तूपावर तांबूस, गुलाबी रंगावर भाजून घ्यावे.

आता पाणी गरम करून साखर घालावी. विरघळेपर्यंत हलवावे व हे गरम पाणी भाजलेल्या पीठामधे घालावे. पाणी आटेपर्यत एकसारखे हलवावे. गुठळ्या राहू देऊ नयेत.

शेवटी वेलचीपूड घालावी व वरून ड्रायफ्रूट्स घालून खायला द्यावे. आवडत असल्यास अजून चमचाभर घरचे तूप वरून घालावे व गरमा-गरम द्यावे.

टिप्स :-
*तुपामध्ये काटकसर अजिबात करू नये.
*साखर आवडीनुसार कमी-जास्त करावी.
*शक्यतो गव्हाचे पीठ थोडे जाडसर दळलेले घ्यावे.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

04 May 2017

मँगो लस्सी (Mango Lassi)

No comments :

उन्हाळा म्हटले की थंडगार काही प्यायला मिळाले तर सर्वानाच आवडते. त्यातही आंब्याचा सिझन चालू असतो. मग काय आंब्यापासूून बनणारी विविध थंड पेय, आईस्क्रिम, कुल्फी... मजा असते. आमच्याकडे उन्हाळा आंबामय असतो. आंब्याचेच विविध पदार्थ चालू असतात. त्यापैकीच एक "मँगो लस्सी " साहित्य व कृती-👇
साहित्य :-
* ताजे गोड दही २ वाट्या
* पिकलेला हापूस आंबा मोठा १
* साखर आवडीनुसार
* मीठ चिमूटभर
* फ्रेश क्रिम २ टेस्पून (ऐच्छीक)

कृती :-
प्रथम आंबा साल काढून चौकोनी फोडी करून घ्यावा.

आता मिक्सरमधे दही, आंब्याच्या फोडी, साखर २ चमचे व चिमुूटभर मीठ घालून घुसळावे. फारच घट्ट वाटले तर बर्फाचे खडे किवा गार पाणी घालून घुसळावे.

फ्रेश क्रिम वापरणार असाल तर मिश्रण घुसळून झाल्यावर घालावे व परत एकदा हलकेच घुसळावे. क्रिममुळे लस्सी मलईदार लागते व ग्लासमधे ओतल्यावर वर फेस (फोम) येतो. दिसायला आकर्षक दिसते.

आता तयार थंडगार लस्सी काचेच्या मोठ्या ग्लासमधे घालून प्यायला द्यावी.

टिप्स :-
* आंबा शक्यतो हापूसच घ्यावा. केशर नसतो. इतर कोणता वापरायचा असेल तर आधी मँगो पल्प तयार करून गाळून घ्यावा.
.* दही ताजे व गोड असावे.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

03 May 2017

पिनव्हील सँडविच (Pinwheel Sandwich)

No comments :

""पिनव्हील सँडविच" हे चवीला,आपल्याला माहीत असणार्या नेहमीच्या सँडविच प्रमाणेच असते परंतु याचा वेगळा आकार आकर्षक दिसतो. यामुळेच लहान मुलांना खूप आवडते. मुलांना शाळेच्या डब्यात द्यायला किंवा बर्थडे पार्टीसाठी एकदम सोयीचे आहे. कसे करायचे साहित्य  व कृती-👇

साहित्य :-
* सँडविच ब्रेड स्लाईस ४
* हिरवी चटणी
* टोमँटो साँस
* बटर
* गाजर किसून
* कोबी किसून
* शिमला मिरची किसून
* चाट मसाला
* मीठ

कृती :-
प्रथम ब्रेडच्या कडा काढून घ्याव्यात व लाटण्याने साधारण लाटून पातळ करून घ्यावेत.

नंतर दोन ब्रेड एकाखाली एक व थोडेसे काठ एकमेकावर ठेेवून पाण्याने चिकटवून घ्यावे. परत एकदा अलगद हाताने जोडावरून लाटणे फिरवावे.

आता संपूर्ण ब्रेड स्लाईसला बटर लावावे. नंतर अंतरा अंतराने हिरवी चटणी एकदा व एकदा टोमँटो साँस लावावे.

नंतर हिरवी चटणी लावलेल्या पट्यावर हिरवा कोबी व शिमल्याचा किस पसरावा व साँस लावलेल्या पट्यावर गाजराचा किस पसरावा.

शेवटी त्यावर चाट मसाला व मीठ भुरभुरावे.

आता अलगद हाताने, घट्ट अशी ब्रेडची सुरळी करावी व अँल्यूमीनियम फाँइलमधे गुंडाळून,फ्रिजमधे १५ मिनिट ठेवावे.

१५ मिनिटानंतर रोल फ्रिजमधून बाहेर काढून अर्धा ते पाऊण इंचाचे स्लाईस करावेत व खायला द्यावेत.

टिप्स :-
* ब्रेड ताजा व शक्यतो रूंद मोठ्या स्लाईसचा असावा.
* भाज्या आपल्या आवडीनुसार घ्याव्यात परंतु लाल, हिरवा असे रंग असावेत. दिसायला आकर्षक दिसते.
*भाज्या खूप जास्त भरू नयेत. स्लाईसची गुंडाळी करणे अवघड होते.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.