03 May 2017

पिनव्हील सँडविच (Pinwheel Sandwich)

No comments :

""पिनव्हील सँडविच" हे चवीला,आपल्याला माहीत असणार्या नेहमीच्या सँडविच प्रमाणेच असते परंतु याचा वेगळा आकार आकर्षक दिसतो. यामुळेच लहान मुलांना खूप आवडते. मुलांना शाळेच्या डब्यात द्यायला किंवा बर्थडे पार्टीसाठी एकदम सोयीचे आहे. कसे करायचे साहित्य  व कृती-👇

साहित्य :-
* सँडविच ब्रेड स्लाईस ४
* हिरवी चटणी
* टोमँटो साँस
* बटर
* गाजर किसून
* कोबी किसून
* शिमला मिरची किसून
* चाट मसाला
* मीठ

कृती :-
प्रथम ब्रेडच्या कडा काढून घ्याव्यात व लाटण्याने साधारण लाटून पातळ करून घ्यावेत.

नंतर दोन ब्रेड एकाखाली एक व थोडेसे काठ एकमेकावर ठेेवून पाण्याने चिकटवून घ्यावे. परत एकदा अलगद हाताने जोडावरून लाटणे फिरवावे.

आता संपूर्ण ब्रेड स्लाईसला बटर लावावे. नंतर अंतरा अंतराने हिरवी चटणी एकदा व एकदा टोमँटो साँस लावावे.

नंतर हिरवी चटणी लावलेल्या पट्यावर हिरवा कोबी व शिमल्याचा किस पसरावा व साँस लावलेल्या पट्यावर गाजराचा किस पसरावा.

शेवटी त्यावर चाट मसाला व मीठ भुरभुरावे.

आता अलगद हाताने, घट्ट अशी ब्रेडची सुरळी करावी व अँल्यूमीनियम फाँइलमधे गुंडाळून,फ्रिजमधे १५ मिनिट ठेवावे.

१५ मिनिटानंतर रोल फ्रिजमधून बाहेर काढून अर्धा ते पाऊण इंचाचे स्लाईस करावेत व खायला द्यावेत.

टिप्स :-
* ब्रेड ताजा व शक्यतो रूंद मोठ्या स्लाईसचा असावा.
* भाज्या आपल्या आवडीनुसार घ्याव्यात परंतु लाल, हिरवा असे रंग असावेत. दिसायला आकर्षक दिसते.
*भाज्या खूप जास्त भरू नयेत. स्लाईसची गुंडाळी करणे अवघड होते.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

No comments :

Post a Comment