गणपती बाप्पाला आवडणारे मोदक हा एक पारंपरिक पक्वान्नाचा प्रकार आहे. मोदकात असंख्य वेगवेगळे नमुने करता येतात. जसे खव्याचे,रव्याचे कणिकेचे तळून, वाफवून,पीठीचे उकडीचे, चाँकलेट,आंबा... इत्यादी! तसे आज मी आंब्याचीच उकड व आतील सारण पण आंब्याचेच भरून उकडीचे आंबा मोदक बनवले. कसे ते पहा साहित्य व कृती-
साहित्य :-
सारणासाठी
* खवलेलं ओलं खोबरं २ वाट्या
* साखर १ वाटी
* मँगो पल्प १ वाटी
वरील आवरणासाठी
* तांदुळाचे पीठ २ वाट्या
* पाणी २ वाट्या
* मँगो पल्प ३/४ (पाऊण) वाटी
* मँगो इसेन्स ४-५ थेंब
* मीठ चिमुटभर
* तेल/तूप २ टीस्पून
सारणासाठी
* खवलेलं ओलं खोबरं २ वाट्या
* साखर १ वाटी
* मँगो पल्प १ वाटी
वरील आवरणासाठी
* तांदुळाचे पीठ २ वाट्या
* पाणी २ वाट्या
* मँगो पल्प ३/४ (पाऊण) वाटी
* मँगो इसेन्स ४-५ थेंब
* मीठ चिमुटभर
* तेल/तूप २ टीस्पून
कृती :-
प्रथम खोबरं, साखर व मँगो पल्प एकत्र करून सारण साधारण कोरडे होईपर्यंत शिजवून तयार करावे. थंड होण्यासाठी ठेवून द्यावे.
प्रथम खोबरं, साखर व मँगो पल्प एकत्र करून सारण साधारण कोरडे होईपर्यंत शिजवून तयार करावे. थंड होण्यासाठी ठेवून द्यावे.
आता दोन वाट्या पाणी गरम करण्यास ठेवावे. त्यामध्ये आधी चिमुटभर मीठ व दोन चमचे तेल /तूप घालावे. उकळी आली की मँगो पल्प व इसेन्स घालावे व सर्व एकत्र उकळू लागले की लगेच तांदुळ पीठी घालावी व रवीच्या टोकाने व्यवस्थित गुठळी होणार नाही याची काळजी घेऊन ढवळावे. व गँस बंद करून झाकणी घालून १५ मिनिटे ठेवून द्यावे.
पंधरा मिनिटानंतर तयार उकड तेल पाण्याच्या हाताने चांगली मळून, एका भांङ्यामधे झाकून ठेवावी.
आता त्यातील थोडी-थोडी उकड घेऊन हाताने किंवा साच्याने आधीच तयार केलेले सारण भरून मोदक तयार करावेत व चाळणीवर किंवा मोदक पात्रात १५ मिनिट वाफवून घ्यावेत.
गरमा-गरम गोड लुसलू़शित मोदक साजूक तुपाची धार सोडून खायला द्या.
या मोदकांचा रंग अतिशय सुंदर व मोहक दिसतो की बघताच क्षणी खावे वाटतात. व चवही अप्रतिम लागते. तुम्हीही करून बघा नक्की आवडतील.
टीप्स :- आंबा सीजन नसेल तेव्हा पँक टीनचा मँगो पल्प वापरला तरी चालतो.
आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment