25 July 2016

डाळ ढोकळी(Dal Dhokali)

No comments :
'डाळ ढोकळी' हा प्रामुख्याने गुजरात प्रांतातील पदार्थ आहे. राजस्थान, महाराष्ट्रातही केला जातो. महाराष्ट्रामधे याला 'वरणफळे' 'चकोल्या' असे सुध्दा म्हणतात. सकाळचा पोटभरीचा नाष्टा किंवा वन डिश मिल म्हणूनही खाता येतो. कसे करायचे साहीत्य व कृती,

साहित्य :-
डाळ
* तूर डाळ १ वाटी
* धना-जीरा पावडर १ टीस्पून
*,गरम मसाला १ टीस्पून
* चिंचेचा कोळ २ टीस्पून
* लाल मिरचीपूड २ टीस्पून
* मीठ चवीनुसार
* गूळ सुपारी एवढा
* हळद,  हींग, मोहरी, जीरे
* कढीपत्ता
* कोथंबिर, ओलं खोबरं
* तूप वरून घालण्यासाठी
* तेल फोडणी साठी
* पाणी
ढोकळी
* गव्हाचे पीठ २ वाट्या
* चणाडाळ पीठ १ टेस्पून
* हळद
* लाल मिरचीपूड १ टीस्पून
* ओवा चिमूटभर
* मीठ चवीनुसार
* धना-जिरा पावडर १ टीस्पून
* मोहन तेल २ टीस्पून
* पाणी

कृती :-
प्रथम डाळ कुकरला शिजायला लावा. नंतर एका पसरट भांड्यात गव्हाचे व डाळीचे पीठ घेऊन त्यामधे गार तेलाचे मोहन व वर ढोकळीसाठी दिलेलेे सर्व साहीत्य घालून कणिक मळून घ्या. फार घट्ट अथवा सैल नको नेहमीच्या पोळीच्या कणिके सारखेच असावे.

आता शिजलेली डाळ रविने अथवा डावानेच छान घोटून घ्या. गँसवर पातेले गरम करून त्यात तेल घाला व कढीपत्ता, हींग, हळद, जीरे-मोहरीची फोडणी करा.

नंतर डाळ घाला व दिलेले सर्व साहीत्य घाला. आपल्याला कितपत पातळ हवे त्यानुसार पाणी घाला. थोडे जास्तच घातले तरी चालेल. कारण नंतर ढोकळी सोडली की डाळ घट्ट होते. व पाच मिनिट चांगले उकळू द्यावे. शेवटी खोबरं, कोथिंबिर घाला.

आता डाळ उकळेपर्यंत भिजलेल्या कणिकेची पोळी लाटा व सुरीने शंकरपाळी सारखे चौकोनी तुकडे कापावेत. पोळी खूप जाड किंवा पातळ नसावी.

आता उकळत्या डाळीमध्ये कापलेलै तुकडे सोडा. गरज वाटली तर परत थोडे पाणी घाला व ५-७ मिनिट  उकळी काढा. अथवा कणकेचे काप, वेगळ्या भांड्यात गरम पाणी घेऊन ते उकळू लागल्यावर त्यात सोडावेत व पाच मिनिटांनी शिजले की वर तरंगू लागतात. मग तयार डाळीत सोडावेत  डाळ ढोकळी तयार!

आता तयार डाळ ढोकळी बाउलमधे काढा, वरून तूप घाला व गरम -गरम खाऊन घ्या किंवा खायला द्या. थंडीच्या दिवसांत अथवा पावसाळी दिवसांत गरमा -गरम अशी डाळ ढोकळी खाल्ली कि मस्त एकवेळचे जेवणच होते. 

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

20 July 2016

आलू काँर्न पराठा (Aloo Corn Paratha)

No comments :

सकाळच्या नाष्ट्याला किंवा मुलांना शाळेच्या डब्यात देण्तासाठी अत्यंत उत्कृष्ट,पोटभरीचे व पौष्टीक असे हे पराठे आहेत. कसे करायचे साहीत्य व कृती,

साहीत्य :-

* गव्हाचे पीठ १/२ वाटी
* ज्वारीचे पीठ १/२ वाटी
* उकडलेला बटाटा किसून १/२ वाटी
* ओले मका दाणे वाटून १ वाटी
* मिरची, आलं, लसूण पेस्ट
* पूदीना पेस्ट १ टीस्पून
* कोथंबिर
* काळीमिरी भरड चिमूटभर
* मीठ चविनूसार
* तेल किंवा तूप भाजण्यासाठी

कृती :-

प्रथम सर्व साहीत्य एकत्रित करून मळा. पाणी न वापरताच मळा गरज वाटली तर किंचित घ्या. मळून तेल लावून दहा मिनिट झाकून ठेवा.

नंतर भाकरी प्रमाण हातानेच  जाडसर थापून ल सोडून खरपूस भाजा व गरम गरम, पराठे लोणी,लोणचे किवा साँस सोबत खायला द्या.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

09 July 2016

गुलकंद बर्फी (Gulakand Burfi)

No comments :

गुलकंदाचे,गुलकंद लस्सी, गुलकंद फालुदा असे बरेच प्रकार करतात. शरिरात उष्णता वाढली असेल तर गुलकंद व दूध घेतले जाते. अशा गुणी गुलकंदाची मी बर्फी केली, साहित्य व कृती,

साहित्य :-
* गुलकंद १/२ वाटी
* साखर १ १/२ वाटी
* ओले खोबरे खवून २ वाट्या
* मिल्क पावडर १/४ वाटी
* तूप १ टीस्पून ग्रीसिंगसाठी

कृति :-

प्रथम एक जाड बुडाची कढई किंवा पातेले घ्या व साखर, खोबरं एकत्र करून शिजत ठेवा. तळाला लागणार नाही याची काळजी घेउन सतत हलवत रहा.

नंतर मध्यावर आले की,गुलकंद मिसळा व हलवत रहा.

आता मिश्रण कडेने सुटायला लागले व  गोळा झाले की मिल्क पावडर घालून हलवा व तूप लावलेल्या ताटात गोळा काढा.

वाटीने किंवा प्लास्टिक कागद वर घालून हाताने मिश्रण थापून सारखे करा. वर सुरीने आडव्या -उभ्या रेषा मारून ठेवा.

गार झाल्यावर वड्या काढा. गुलकंद बर्फी खूप सुंदर चवीची  लागते. तूम्हीही करून बघा.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

08 July 2016

पडवळाची भजी ( Snakegourd Pakoda)

No comments :

साधारणपणे भजी म्हटले की, सर्वात आधि कांदाभजीच आपल्या डोळ्यासमोर येतात. पण इतर बर्याच भाजांची पण भजी होतात व तितकी च  सुंदर लागतात. जसे कोथंबिर मेथी,अळू, पालक, शिमला मिरची, घोसाळी भजी करतात. तसेच आज पडवळाची भजी केली. खूपच छान लागतात. कशी केली साहीत्य व कृती :-

साहीत्य :-
* पडवळ २०० ग्रँम
* डाळीचे पीठ आवश्यकते नुसार
* तांदुळाचे पीठ १ टेस्पून
* लाल मिरची पूड आवडीनुसार
* मीठ चविनूसार
* हींग, हळद
* तेल तळण्यासाठी

कृती :-

प्रथम पडवळ स्वच्छ धुवून, आतल्या बिया,गर काढून टाका. नंतर त्याचे गोल काप करा. आता कापांवर पाण्याचा हबका मारा व हाय टेम्परेचरला ओवनला दीड मिनिट वाफवून किंचित मऊ करून घ्या. फार मऊ शिजवायचे नाही.

आता बाऊलमधे डाळीचे व तांदुळाचे पीठ एकत्र करा. त्यामधे तिखट, मीठ,  हळद, हींग घाला व एकत्र करा. आवश्यक तितके पाणी घाला व दाटसर घोळ तयार करा.

आता आधि तयार पडवळाचे काप पीठाच्या घोळात बुडवून गरम तेलात तळून काढा. गरमा-गरम कुरकुरीत भजी गरम असेपर्यंत खायला द्या. आवडीनुसार सोबत साँस, हिरवी चटणी घ्यावी. अथवा नुसतेसुध्दा छान लागतात.
तूम्हीही करून बघा.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

04 July 2016

दडपे पोहे (Dadpe Pohe)

No comments :

दडपे पोहे हा एक महाराष्ट्रीयन नाष्ट्याचा पदार्थ आहे. कांदा पोहे, उपमा हे पदार्थ कसे गरमा-गरम खावे लागतात तर अधिक चवदार लागतात. तसे याचे नसते हे थंडच खातात. त्यामुळे जास्त सोईचे होते.छोटेसे पिकनिक असेल तरी डब्यात नेणे सोईचे आहे. तर कसे करायचे साहीत्य व कृती :-

साहीत्य :-
* पातळ पोहे २ वाट्या
* ओलं खोबरं १/२ वाटी
* मीठ चविनूसार
* साखर १/२ लहान चमचा
* मेतकूट २ टीस्पून
* भाजलेले/तळलेले शेंगदाणे
* तळणीची मिरची १ किंवा हिरवी मिरची तुकडे
* कांदा बारीक चिरून १
* कोथंबिर, लिंबू
* फोडणी साहीत्य मोहरी, जीरे, हींग,हळद
* तेल २ टेस्पून

कृती :-

प्रथम पोहे चाळून, निवडून एका पसरट भांड्यात घ्या. त्यावर मीठ, साखर, मेतकूट  घाला.

आता तेल गरम करून फोडणी करून घ्या. फोडणीमधे निम्मा कांदा, कढीपत्ता, मिरची घालून भाजा व तयार फोडणी थंड होऊ द्या.

आता थंड केलेली फोडणी पोह्यावर घाला व हाताने व्यवस्थित पोह्याना चोळा.

शेवटी शिल्लक अर्धा कांदा, ओलं खोबरं, लिंबू, कोथिंबिर व भाजलेले/ तळलेले शेंगदाणे घाला परत एकदा हातानेच एकत्र करा. पोहे तयार!

तयार पोहे वरून शोभेला खोबरं, कोथिंबिर घालून खायला द्या.

टीप: या पोह्यामधे आवडीनुसार कांद्याऐवजी किंवा सोबत काकडी कोचून, कोबी बारीक चिरून सुध्दा घातले तरी चवदार लागते.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

01 July 2016

मेदूवडा (Meduvada)

No comments :

आजकाल सर्वच प्रांतातील लोक आवडीने दुसर्या प्रांतातील एकमेकांचे पदार्थ करतात.  तसेच हा मेदूवडा मुख्यतः साउथ इंडियन पदार्थ आहे. पण सगळीकडे केला जातो. कसा करायचा साहीत्य व कृती :-
साहीत्य :-
* उडीद डाळ २ वाट्या
* ओल्या खोबर्याचे पातळ काप आवडीनुसार
* मिरपूड भरड ७-८ मिर्याची
* मीठ चविनूसार
* कढीपत्ता ७-८ पाने चिरून
* हिरवी मिरची बारीक चिरून
* आलं किसून
* तेल तळण्यासाठी

कृती -

प्रथम डाळ तीन-चार वेळा धुवून घ्या. नंतर ५-६ तास भिजत घाला. नंतर त्यातील पाणी काढून टाकावे आणि मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटावे. वाटताना पाणी अजिबात घालू नये.

मिक्सरमधून मिश्रण एका खोलगट बाऊलमधे काढावे. हे मिश्रण शक्यतो हातानेच फेसावे, म्हणजे हाताने थापटी देउन बोटांनी मिश्रण वर उचलावे. असे जलद गतीने मिश्रण वर खाली करावे. काही मिनिटातच मिश्रण हातालाच हलके झालेले जाणवेल. मिश्रण हॅण्ड मिकसरने, एग बिटरने किंवा चमच्याने ३ ते ४ मिनीटे घोटल तरी चालते . यामुळे उडीद डाळीचे वाटण हलके होते, नंतर मिरे, खोबर्‍याचे काप, हिरव्या मिरच्या, आले, कढीपत्ता पाने आणि चवीपुरते मिठ असे घालून मिक्स करावे.

आता आधी हात ओला करावा, म्हणजे हाताला मिश्रण  चिकटत नाही. व  लिंबाएवढे मिश्रण हातात धेऊन वड्याला मध्यभागी भोक पाडून तेलात सोडावे. खरपूस तळावे.

टीप :- तळणीसाठी तेल गरम करावे आणि गॅस हायवरच,मोठा ठेवावा. अन्यथा वडे तेलकट होतात.

मिश्रण भरपूर फेटावे. वडे हलके होतात.

मिश्रण फार घट्ट वाटले तर थोडे पाणी घाला. नाहीतर वडे पोटात घट्ट होतात.

फार पातळ झाले तर तांदुळाचे पीठ घाला. कुरकुरीत पण होतात.

डाळ तिचे पांढरे चिकट पाणी जाईपर्यत 3-4 वेळा अवश्य धुवा. त्याने वडे हलके होण्यास मदत होते.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.