गुलकंदाचे,गुलकंद लस्सी, गुलकंद फालुदा असे बरेच प्रकार करतात. शरिरात उष्णता वाढली असेल तर गुलकंद व दूध घेतले जाते. अशा गुणी गुलकंदाची मी बर्फी केली, साहित्य व कृती,
साहित्य :-
* गुलकंद १/२ वाटी
* साखर १ १/२ वाटी
* ओले खोबरे खवून २ वाट्या
* मिल्क पावडर १/४ वाटी
* तूप १ टीस्पून ग्रीसिंगसाठी
कृति :-
प्रथम एक जाड बुडाची कढई किंवा पातेले घ्या व साखर, खोबरं एकत्र करून शिजत ठेवा. तळाला लागणार नाही याची काळजी घेउन सतत हलवत रहा.
नंतर मध्यावर आले की,गुलकंद मिसळा व हलवत रहा.
आता मिश्रण कडेने सुटायला लागले व गोळा झाले की मिल्क पावडर घालून हलवा व तूप लावलेल्या ताटात गोळा काढा.
वाटीने किंवा प्लास्टिक कागद वर घालून हाताने मिश्रण थापून सारखे करा. वर सुरीने आडव्या -उभ्या रेषा मारून ठेवा.
गार झाल्यावर वड्या काढा. गुलकंद बर्फी खूप सुंदर चवीची लागते. तूम्हीही करून बघा.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment