कोबीची भाजी म्हटले की बरेचवेळा नाक मुरडले जाते. पण मंडईत उपलब्ध असणार्या भाज्या व्यतिरीक्त वेगळ्या भाज्या तरी काय आणणार? तरी त्याची वेगवेगळ्या प्रकारांनी भाजी तर कधी पराठे, कोशिंबिर असे प्रकार केले जातात. आज कोबीचे पकोड़े काढले. मस्त झाले. कसे केले साहीत्य व कृती :-
साहीत्य :-
* लांब व बारीक चिरून कोबी २ वाट्या
* चणाडाळ पीठ गरजे नुसार. अंदाजे १/२ वाटी
* आलं-लसूण, हिरवी मिरची पेस्ट
* कोथंबिर
* मीठ, हळद, हींग
* धना-जिरा पावडर
* तळणीसाठी तेल
कृती :-
प्रथम चिरलेला कोबी एका बाऊलमधे घेऊन त्यावर मीठ व हळद घालून चोळा. तसेच १० मिनिट झाकून ठेवा.
आता १० मिनिटानंतर त्याला पाणी सुटलेले असेल, त्यात मावेल इतकेच डाळीचे पीठ घाला.आंल -लसूण,मिरची पेस्ट, चिरून कोथंबिर, धना-जीरा पावडर, हींग सर्व घाला. हलक्याच हाताने नीट मिक्स करा.
गरम तेलात कांदाभजी प्रमाणे तळून काढा. मस्त कुरकुरीत पकोडे गरम-गरम सर्व्ह करा.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment