सर्वसामान्यपणे मुलांना कोणत्याही पदार्थाचा चाँकलेट फ्लेवर प्रचंड आवडतो. बिस्कीट असो किंवा मिल्कशेक, आईस्क्रिम असो मुले चाँकलेट स्वादाला प्राधान्य देतात. तर मुलांच्या आवडीचा चाँकलेट फ्लेवरचा मिल्कशेक कसा केला पहा. साहीत्य व कृती -
साहीत्य :-
* थंड दूध अर्धा लिटर
* चाँकलेट क्रिम ओरीओ बिस्कीट्स 5 नग
* कोको पावडर 1टेस्पून
* चाँकलेट इसेंन्स 4-5 थेंब
* पिठीसाखर 2 टीस्पून
* व्हँनिला आईसक्रीम 2 स्कूप
* चाँकलेट चिप्स किंवा शेव गार्निशिंग साठी
कृती :-
प्रथम मिक्सरमधे बिस्कीट्स तूकडे करून टाका. पावडर करून घ्या. नंतर कोको पावडर, साखर, इसेंन्स व दूध घालून परत एकदा हलकेच फिरवा.
आता दोन मोठे ग्लास घ्या. त्यामधे आधि तयार केलेले दूध घाला. नंतर आईसक्रीम घाला. शेवटी वरून चोको चिप्स किंवा शेव भुरभूरा.
थंडगार प्यायला द्या. मुलांना खूप आवडतो.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment