29 April 2016

व्हेज बर्गर (Veg Burger)

No comments :

आजकालच्या मुलांना नेहमीच पिझ्झा, बर्गर, वडा-पाव अशा प्रकारचे बाहेरचे जिभेला चटपटीत पदार्थ खुणावत असतात. बरं घरीच करून द्यावेत तर बराच खटाटोप करावा लागतो. अशा पदार्थाना लागणारे निरनिराळे साँसेस्,चीज नेहमीच घरात उपलब्ध असतीलच असे नाही. तर मग घरातच उपलब्ध साहीत्यात पण त्या चविचा पदार्थ कसा बनवावा ? ते पहा. मी व्हेज बर्गर बनवलाय पण त्यामधे मेयाेनिज साँस नाही. त्याऐवजी घरचेच बटर व टोमँटो साँस वापरलाय. तसेच लेट्यूस ची पाने नाहीत तर,कोबीची पाने ब्लांच करून वापरली. तसेच चविसाठी चाट मसाला, पुदीना असे वापरले. पण काय सांगू, अफलातून टेस्टी बर्गर बनला. विकतचा सुध्दा इतका चवदार लागत नाही. तर बघा कसा केला, साहित्य व कृती :-

साहीत्य :-
* तिळ लावलेले बर्गर बन 2 नग
* व्हेज ओट्स कटलेट 2 *
* कोबीची पाने 2
* कांदा गोल काप 4
* टोमँटो गोल काप 2
* शिमला मिरची गोल काप 2
* चीज क्यूब 1
* चाट मसाला पाव चमचा
* पुदीना चार-पांच पाने
* टोमँटो साँस
* बटर

* http://swadanna.blogspot.in/2015/07/veg-oats-cutlet.html?m=1

कृती :-

प्रथम कटलेट्स तयार करून घ्या. कृती साठी वर लिंक दिली आहे. कटलेट आपल्या आवडीचे म्हणजे, आलू कटलेट, बीटरूट कटलेट,व्हेज कटलेट असे कोणत्याही प्रकारचे वापरले तरी चालते. मी व्हेज ओट्स कटलेट वापरले. फक्त कटलेटचा आकार नेहमीच्या कटलेटपेक्षा मोठा म्हणजे बनच्या आकाराचा मोठा ठेवा.

आता बर्गर बन घ्या. उघडा व त्याच्या एका भागावर बटर लावा. व दुसर्या भागावर टोमँटो साँस लावा. नंतर बटर लावलेल्या भागावर कोबीचे ब्लांच केलेले पान वाटीने गोल कापून ठेवा. आता त्यावर तयार कटलेट ठेवा. नंतर त्यावर कांदा, टोमँटो, शिमला मिरचीचे काप,पुदीना पान ठेवा. चाट मसाला भुरभूरा. शेवटी वरून चीज किसून टाका व बनचा आधिच साँस लावून ठेवलेला दुसरा भाग वर ठेवा.

यम्मी यम्मी बर्गर तयार! मुलांना खायला द्या. मुले एकदम खुष होतील. व मुले खुष तर आपण खुष. तूम्हीही नक्की करून बघा.व कसे झाले ते सांगायला विसरू नका.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

No comments :

Post a Comment