उन्हाळा म्हटले की, बाहेर उन्हें रणरणत असतात सहाजिकच काहीतरी थंडगार खावे वाटते. तर सकाळीच कुल्फी लावून फ्रिज मधे ठेवली तर, जेवण झाले की, मस्त मलाईदार कुल्फी चा आस्वाद घेता येईल. या दिवसात आंबे ही येतात. तर चला आपण घरच्या-घरी पौष्टीक, शुध्द सात्विक अंब्याच्या स्वादाची कुल्फी तयार करू.
साहीत्य ;-
* होलमिल्क 1/2 लिटर
* खवा 50 ग्राम / मिल्क पावडर 4 टेस्पून
* साखर 1/2 वाटी
* मँगो पल्प 2 वाट्या
* काॅर्नफ्लोअर /तांदुळ पीठी 2 टेस्पून
* वेलचीपूड
* ड्रायफ्रूट्स
कृती :-
प्रथम दूध उकळवायला ठेवावे. थोडे उकळले की,खवा किवा मिल्क पावडर थोड्या दूधामधे मिक्स करून मग उकळत्या दूघात घाला. नंतर काॅर्नफ्लोअर पण थोड्या दूधामधे मिक्स करून दूघ हलवत-हलवत त्यात घाला. गुठळी होऊ देऊ नका. मिश्रण सतत ढवळत रहा. दूध दहा मिनिटानी घट्ट होण्यास सुरवात होईल. पूरेसे घट्ट झाले की,गँस बंद करा. मिश्रण थंड होऊ द्या.
आता आंबे सोलून, चिरून त्याच्या फोडी करून घ्या व साखर मिसळून मिक्सरमधे फिरवा.
आता थंड झालेल्या दूधामधे आब्यांचा रस, वेलची पूड,ड्रायफ्रूट्स सर्व घाला. परत एकदा सर्व एकत्र करून मिक्सरमधे फिरवा.
नंतर तयार दूधाचे मिश्रण कुल्फी मोल्डमधे किवा कोणत्याही प्लास्टिक बाऊलमधे ओता व फ्रिजर मधे 2-3 तास ठेउन द्या.
खायला देताना वरून ड्रायफ्रूट्स चा चूरा भुरभूरा व थंडगार 'मँगो कुल्फी' सर्व्ह करा. तूम्हीही करून बघा व कशी झाली ते सांगायला विसरू नका.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment