एप्रिल,मे उन्हाळा म्हटले की, जोडीला आंबे आलेच. आणि आंबे कोणाला आवडत नाहीत? तो तर फळांचा राजा, सर्वानाच आवडतात. मग ओघानेे आंब्याचे विविध प्रकार करणे आलेच. त्यातसुध्दा खास उन्हाळ्यासाठी थंडगार व पौष्टीक कांही घरच्या-घरी मिळाले तर? मग काय मजाच!
तर आज खास पुण्याची प्रसिध्द अशी 'मँगो मस्तानी' करू. या पेयाचा शोध लावण्याचे सर्व श्रेय पुणेकरांचेच बरं का! पुण्यात सुध्दा खास करून 'सुजाताची मँगो मस्तानी' प्रसिध्द आहे. मी अलिकडे नाही पण बर्याच बर्षापूर्वी ही चव चाखली होती. आवडली मला. ताजे आंबे, दूध व आईसक्रीम वापरून करतात. बाकी बर्याच ठिकाणी कस्टर्ड पावडर, रंग इसेंन्स वापरतात. तसेच यात अजून इतरही स्वाद आहेत, जसे की, चाँकलेट, आँरेंज,केशर-पिस्ता, बदाम इत्यादी. तर आपण बघू, मँगो मस्तानीचे साहीत्य व कृती :-
* हापूस आंबे 3-4 (साईजवर कमी-जास्त)
* थंडगार फुल क्रीम दूध अर्धा लिटर
* साखर 2-3 टेस्पून ( आंब्याच्या गोडीवर कमी-जास्त)
* इसेंन्स 5-6 थेंब ( ऐच्छीक)
* ड्रायफ्रूट्स काप 2टेस्पून
* चेरी सजावटीला
* वँनिला आईसक्रीम 4 स्कूप
कृती :-
सर्वात आधि आंबे साल काढून लहान फोडी करून घ्या.
आता सजावटीला साठी थोड्या आंब्याच्या फोडी व ड्रायफ्रूट्स काप बाजूला शिल्लक ठेवा व बाकीचे साहीत्य, चिल्ड दूध,आंब्याच्या फोडी व साखर, इसेंन्स एकत्र करून मिक्सरमधे किवा ब्लेडरने घुसळा. शेवटी ड्रायफ्रूट्स मिसळा व हलकेच फिरवा. पावडर नको व्हायला.
आता ग्लासमधे आधि तयार आंब्याचे मिश्रण पाउण ग्लास भरेपर्यंत ओता, नंतर वर एक आईसक्रीम चा गोळा घाला. शेवटी वरून चेरी व आंब्याच्या फोडी, ड्रायफ्रूट्स काप लावून सजवा.
थंडगार, एकदम चिल्ड सर्व्ह करा. मस्त लागते.
एकदम सोपी कृती आहे. तूम्हीही करून बघा. नक्की आवडेल. मात्र कशी झाली सांगायला विसरू नका.
टिप :- तयार करून फ्रिज मधे ठेवू नका चव बिघडते. वेळेवर ताजेच तयार करा.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment