25 February 2015

चपाती चिप्स (Chapati Chips )

No comments :

आदले दिवशीचे काही अन्न शिल्लक राहीले की दुसरे दिवशी काय करावे समजत नाही.वाया घालविणे पटत नाही व एकट्या स्वताला काही सर्व संपविता येत नाही.मग काहीतरी नवीन आयडीया शोधावी लागते.शिळ्या चपात्या उरल्या होत्या. तर आज मला असेच एका डिशचा शोध लागला.'चपाती चिप्स' कसे ते पहा.

साहीत्य :-
1) गव्हाच्या चपात्या शिळ्या किंवा ताज्यापण चालतात
2) मिठ,चाट मसाला
3) मिरची पावडर आवडीनुसार
4) तेल तळणीसाठी
5) पाणी

कृती :-

प्रथम एका वाटीत मिठ चवीनुसार घ्यावे व त्यात थोडेसे पाणी घालून विरघळून घ्यावे.

हे पाणी चपाती शिळी असेल तर त्यावर थोडे -थोडे शिंपडावे व तसेच राहू द्या पाच मिनिट.

नंतर चपातीचे कापून शंकरपाळीप्रमाणे लहान -लहान चौकोनी तुकडे करून घ्यावेत व गरम तेलात खरपूस तळावेत व टीश्यू पेपर वर काढावेत.

नंतर त्यावर आवडीनुसार चाटमसाला व मिरची पावडर भुरभूरावी.थंड झाले की मस्त कुरकूरीत चिप्स तयार ! हवाबंद डब्यात भरून ठेवा व संध्याकाळच्या चहा सोबत सर्वाना खायला द्या.पट्कन संपून जातात.अजून पाहीजे म्हणून मागणी येते. बघा तुम्हीपण करून.

टीप :- चपात्या करताना जर मिठ घातले असेल कणिकेत तर साधेच पाणी वापरा.नाहीतर खारटपणा येईल.

No comments :

Post a Comment