कचोरी हा एक नाष्ट्याचा मसालेदार पदार्थ आहे.विशेषत: उत्तर भारतात दील्ली, गुजरात राजस्थान कडे लोकप्रिय आहे.कचोरीचे आतले सारण विविध प्रकारानी बनविले जाते.मूगडाळ, उडीद डाळ, बटाटा इ.मी आज मटार वापरून कचोरी बनवणार आहे.
साहीत्य :-
1) मैदा 2 वाटी
2) रवा 1/4 वाटी
3) मटार 2 वाटी
4) मिठ चवीनुसार , सोडा चिमूटभर
5) आले मिरची पेस्ट
6) जिरे
7) धना जिरा पावडर
8) आमचूर पावडर 1/4 टीस्पून
9) तेल
10)पाणी
कृती :-
प्रथम मटार कुकरमधे शिजवून घ्यावेत. तोपर्यंत मैदा व रवा एकत्र करून त्यामधे मिठ सोडा व गरम तेल दोन टेबलस्पून घालावे.थोडे पाणी घेऊन पीठ मळावे आणी अर्धा तास झाकून ठेवून द्या.
आता तोपर्यंत आतले सारण करूया. शिजलेले मटार घेऊन ते मॅश करावेत.
नंतर गॅसवर पॅनमधे अगदी थोडे तेल घालून त्यात जिरे टाका. मिरची आले पेस्ट टाका.आता मॅश केलेले मटर घाला.त्यावर मिठ,धना-जिरा पावडर,आमचूर पावडर घालून मिश्रण कोरडे होइपर्यत परतावे. गॅस बंद करून सारण थंड होउ द्यावे.
आता भिजलेल्या पिठाचा एक लहान गोळा घ्यावा व त्यात वरील सारण थोडे भरावे व नीट बंद करून जाडसरच पूरी लाटावी. गरम तेलात मंद तळावी.तांबूस रंग आला की काढावी.
थोडी गार झाली की खुसखूषीत होते.लाल किवा हिरव्या चटणी सोबत खायला द्यावी.
No comments :
Post a Comment