Showing posts with label kachori. Show all posts
Showing posts with label kachori. Show all posts

10 March 2016

व्हेजी कचोरी (Vegi. Kachori)

No comments :

कचोरी ही सामान्यपणे उत्तर भारतीयांची खासियत. वरून मैद्याचे आवरण (पुरी) व आत बटाटा, वाटाण्याचे सारण असते. पण मी थोडा बदल केलाय. मैदा टाळण्यासाठी हा प्रयोग केला व छान जमले. टिपिकल कचोरी पेक्षाही वरचे आवरण खुसखूषीत होते.व भाज्याही पोटात जातात. कसे केले साहीत्य व कृती :-

साहीत्य :-
सारणासाठी --
* कोबी किसान/बारीक चिरून 2 वाट्या
* मटार 1वाटी
* शिमला मिर्च बारीक चिरून 1
* आलं-लसूण हिरवी मिरची पेस्ट 2टीस्पून
* कोथंबिर चिरून
* धना-जिरा पावडर 2 टीस्पून
* चाट मसाला पाव टीस्पून
* साखर चिमूटभर
* मीठ चविनूसार
* हळद.,हींग मोहरी
* तेल 1टेस्पून
वरच्या पारीसाठी
* उकडलेले बटाटे मध्यम आकाराचे 2-3
* जाड पोहे भाजून 2वाट्या
* मीठ चविला

कृती :-

    प्रथम बटाटे सोलून जाड खिसणाीने किसून घ्या. त्यामधे पोहे भाजून घाला. चविला मीठ घाला व एकत्र मळून घ्या. बाजूला ठेवून द्या.

आता सारणासाठी पँन मधे तेल गरम करा. हळद, हींग, मोहरी घालून फोडणी करा.  त्यामधे आलं-लसूण, हिरवी मिरची पेस्ट घाला. नंतर कोबी, शिमला, मटार घाला. थोडे परतून घ्या. नंतर मीठ,गरम मसाला, धना-जीरा पावडर, साखर, चाट मसाला घालून एक वाफ आणून घ्या. फार मऊ शिजवू नका. क्रंची पणा राहू दे. शेवटी वरून कोथंबिर घालून हलवा.

आता आधि करून ठेवलेल्या कणिकेचा मोठ्या लिंबाइतका गोळा घ्या व वाटीचा आकार करून तयार सारण भरा.  अलगद हाताने तोंड बंद करून एकसारखा गोळा करा. अशा सर्व कचेार्या  करून घ्या.

गरम तेलात मध्यम आचेवर खरपूस तांबूस रंगावर तळा.

गरमा-गरमच खायला द्या. आवडत असेल तर हिरवी चटणी, साँस द्या. पण नुसत्याही छान लागतात. पोह्यामुळे खूप खुसखूषीत होतात. तूम्हीही करून बंघा. नक्की आवडतील.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

06 February 2015

मटार कचोरी (Matar Kachori)

No comments :

कचोरी हा एक नाष्ट्याचा मसालेदार पदार्थ आहे.विशेषत: उत्तर भारतात दील्ली, गुजरात राजस्थान कडे लोकप्रिय आहे.कचोरीचे आतले सारण विविध प्रकारानी बनविले जाते.मूगडाळ, उडीद डाळ, बटाटा इ.मी आज मटार वापरून कचोरी बनवणार आहे.

साहीत्य :-

1) मैदा 2 वाटी
2) रवा 1/4 वाटी
3) मटार 2 वाटी
4) मिठ चवीनुसार , सोडा चिमूटभर
5) आले मिरची पेस्ट
6) जिरे
7) धना जिरा पावडर
8) आमचूर पावडर 1/4  टीस्पून
9) तेल
10)पाणी

कृती :-

     प्रथम मटार कुकरमधे शिजवून घ्यावेत. तोपर्यंत मैदा व रवा एकत्र करून त्यामधे मिठ सोडा व गरम तेल दोन टेबलस्पून घालावे.थोडे पाणी घेऊन पीठ मळावे आणी अर्धा तास झाकून ठेवून द्या.

आता  तोपर्यंत आतले सारण करूया. शिजलेले मटार घेऊन ते मॅश करावेत.

नंतर गॅसवर पॅनमधे अगदी थोडे तेल घालून त्यात जिरे टाका. मिरची आले पेस्ट टाका.आता मॅश केलेले मटर घाला.त्यावर मिठ,धना-जिरा पावडर,आमचूर पावडर घालून मिश्रण कोरडे होइपर्यत परतावे. गॅस बंद करून सारण थंड होउ द्यावे.

आता भिजलेल्या पिठाचा एक लहान गोळा घ्यावा व त्यात वरील सारण थोडे भरावे व नीट बंद करून जाडसरच पूरी लाटावी. गरम तेलात मंद तळावी.तांबूस रंग आला की काढावी.

थोडी गार झाली की खुसखूषीत होते.लाल किवा हिरव्या चटणी सोबत खायला द्यावी.


06 September 2014

शेगाव कचोरी (Shegaon kachori )

No comments :


साहीत्य:-

1) दोन तास भिजवलेली मूगङाळ
2) गरम मसाला, मीठ ,मिरची लसूण आले पेस्ट कोथंबिर
3) रवा 1/2 वाटी
4) मैदा 1 वाटी
5) तेल

कृती:-

     प्रथम रवा,मैदा चिमूटभर मीठ व तेल घालून भिजवावा आणि अर्धा तास झाकून ठेवावे.

पिठ भिजेपर्यंत सारण तयार करावे.प्रथम मूगङाळ थोङीशी वाटून (म्हणजे कीचीत ठेचून) घ्यावी,त्यात वरील मसाला घालून थोङे कोरङे होईपर्यत  चमचाभर तेलावर परतावे.

आता मिजलेला रवा मैदा चांगला मळून किंवा चेचून घ्यावा.हातावरच जाङसर खोलगट पारी करून,त्यात वरील मिश्रण भरावे व तेलात खरपूस तळावे.

चिंचेच्या चटणी बरोबर सर्व्ह करावे.