![]() |
| पनीर मसाला |
पनीर खूप पौष्टिक असते. शाकाहारी लोकांच्या तर आहारात जरूर असावे असे म्हणतात. पनीर अनेक प्रकारांनी खाता येते. अगदी कच्चे सुध्दा खाता येते. पण बर्याच जणांना पनीरची चव आवडत नाही. तर कधी पनीर भुर्जी, कटलेट, पकोडे असे पदार्थातून पनीर पोटात घालावे. आज मी पनीर मसाला केला. खूपच छान चव आली. तुम्हीही करून बघा अगदी सोपे आहे. कसे करायचे साहित्य व कृती-
साहित्य :-
* पनीर २०० ग्रँम
* टोमँटो २
* कांदा १
* काजू ७ -८
* आलं-लसूण, हिरवी मिरची पेस्ट
* मीठ चवीनुसार
* गरम मसाला १ टीस्पून
* धना-जिरा पावडर १ टीस्पून
* दही २ टेस्पून
* साखर चिमूटभर
* जीरे, हिंग, हळद
* लाल मिरचीपूड
* तेल २ टेस्पून
* कोथिंबिर
कृती :-
प्रथम कांदा, टोमँटो व काजूची वेगवेगळी पेस्ट करून घ्यावी. पनीर शॅलो फ्राय करून घ्यावे.
नंतर पँनमधे तेल गरम करून त्यामधे जीरे, हिंग व हळद घालून फोडणी करून घ्यावी. फोडणीमधे आलं-लसूण, हिरवी मिरची पेस्ट घालून थोडे परतावे. नंतर कांद्याची पेस्ट घालून परतावे. अगदी तेल सुटेपर्यंत गुलाबी रंगावर परतावे. शेवटी टोमँटो व काजूची पेस्ट घालावी.
तयार ग्रेवीमधे गरम मसाला,मीठ, साखर, लाल मिरचीपूड, दही, धना-जिरा पावडर सर्व मसाला घालून परतावे. गरज वाटली तर थोडेसे पाणी घालावे व ग्रेवी थोडी शिजू द्यावी.
शेवटी तयार ग्रेवीमधे शॅलो फ्राय केलेले पनीर घालावे. सर्व व्यवस्थित हलवून पांच मिनिट झाकून शिजवावे.
आता तयार "पनीर मसाला " बाऊलमधे काढून वरून कोथिंबिर पेरावी व वाढण्यास घ्यावी.विशेष करून गरम फुलक्यासोबत ही भाजी खूप चवदार लागते.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

No comments :
Post a Comment