झटपट आणि सोपा असा हा मक्याचा चटपटीत प्रकार आज बनविला .त्याचे साहीत्य काय आणि कसा बनविला पहा.
साहीत्य :-
1) वाफविलेले मक्याचे दाणे 2 वाट्या
2) उकडलेला 1 बटाटा
3) सिमला मिरची 2 बारीक चिरून
4) हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार
5) तांदुळाची पिठी दोन टेस्पून बाइंडींगसाठी
(गरजेनुसार कमी-अधिक होऊ शकते)
6) मिठ
7) तेल तळणीकरता
कृती :-
प्रथम मक्याचे दाणे मिक्सरमधून काढून घ्यावेत.भरडच असावेत मधे-मधे मक्याचे दाणे राहू द्यावेत.खाताना दाताखाली आलेले चांगले लागतात.
नंतर त्यामध्ये उकडलेला बटाटा मॅश करून घालावा.तसेच सिमला मिरची, हिरवी मिरची, मिठ चवीला घालून नीट मिक्स करावे.
आता त्यामध्ये तांदुळाची पिठी घालावी व गोळा करावा.
तयार मिश्रणाचे हातावर लहान-लहान गोळे करून हलकेच दाबावे व तेलात तांबूस गुलाबी तळावेत.
पुदीन्याच्या हिरव्या चटणी सोबत खावेत.
टीप :-कबाब आपण शॅलोफ्राय पण करू शकतो.डाएट काॅनशिअस असणार्यानी शॅलो फ्राय करावेत.पण तळून खाण्याची मजा औरच !
No comments :
Post a Comment