Showing posts with label Cutlet. Show all posts
Showing posts with label Cutlet. Show all posts

24 July 2017

रवा टोस्ट (Rava Toast)

No comments :

"रवा टोस्ट " यालाच "एगलेस फ्रेंच टोस्ट" ही म्हणतात. रवा टोस्ट झटपट होणारा रोडसाईड स्नँक्स चा प्रकार आहे. तसेच सकाळचा नाष्टा किंवा संध्याकाळचे स्नँक्स अथवा मुलांना डब्यात देण्यासाठी पण उपयुक्त पदार्थ आहे. कसा करायचा साहित्य व कृती-👇

साहित्य :-
* ब्रेड स्लाइस ६
* बारीक रवा १ वाटी
* दही १/२ वाटी
* कांदा लहान १ बारीक चिरून
* शिमला मिरची लहान १ बारीक चिरून
* टोमँटो १ बारीक चिरून
* कोथिंबिर चिरून
* आलं, चिरून
* हिरवी मिरची बी काढून बारीक च्रिरलेली १
* मीठ चविनुसार
* चिमुटभर साखर
* शेजवान चटणी किंवा हिरवी चटणी
* बटर

कृती :-
प्रथम रवा एका बाऊलमधे घेऊन त्यामधे दही घालावे व एकत्र ढवळावे. आता  मिश्रण भिजेपर्यंत कांदा, टोमँटो, मिरची, कोथिंबिर, आलं सर्व बारीक चिरून घ्यावे. आधीच चिरून ठेवलेले असेल तरी चालते.

एव्हाना रवा भिजला असेल. आता त्यामधे चिरलेल्या भाज्या,कांदा, कोथिंबीर, मीठ, साखर सर्व साहित्य मिसळावे व मिश्रण तयार करावे.

आता गँसवर तवा गरम करायला ठेवावा व गरम होंईपर्यंत ब्रेड चा एक स्लाईस घ्यावा. त्यावर शेजवान चटणी लावावी व रव्याचे तयार मिश्रण त्यावर व्यवस्थित पसरावे. असे एकावेळी दोन स्लाईस तयार करायचे.

आता गरम तव्यावर थोडे बटर पसरून ब्रेडची मिश्रण लावलेली बाजू तव्याला चिकटेल अशा पध्दतीने ब्रेड स्लाईस तव्यावर ठेवावे. ब्रेडला वरच्या बाजूने पण बटर लावावे. व मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी खरपूस भाजावे. मधेच उलटे-पालटे करावे. करपू देऊ नये. भाजेपर्यंत दुसरे स्लाईस मिश्रण लावून तयार करावेत.

आता तयार टोस्ट कटरने मधून तिरके कापावा व  साँस किंवा हिरव्या चटणी सोबत खायला द्यावे.

खुसखूषीत गरम टोस्ट नाष्ट्याला एकदम चविष्ट लागतो व झटपट होतो. तुम्हीही करून बघा. नक्की आवडेल.

टिप्स :-
* आपल्या आवडीनुसार बारीक चिरून पालक,कांदापात गाजर, बीट काकडी रव्याच्या मिश्रणात घातले तरी चालते.
* मिश्रण फार पातळ करू नका. घट्टच असावे.
* दही खूप आंबट असू नये. ताजे असावे.

आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

12 June 2017

सूजी पकोडे (Sooji Pakode)

No comments :

भजी, पकोडे म्हटले की,आपल्या डोळ्यासमोर लगेच कांदा किंवा मिरची भजीच येतात. पण याशिवायही भजीचे बरेच विविध प्रकार आहेत. जसे की, पालकभजी , बटाटाभजी , मिक्स वेज भजी तसेच मुगडाळ, चणाडाळ भजी, भाताची भजी. अहो एक का दोन.. आपल्या कल्पना शक्तिचा वापर केला तर, घरात उपलब्ध साहीत्यात भजीचे विविध प्रकार बनवतात येतात. पाऊस पडयला लागला की आधी भजीचीच आठवण येते. तर नेहमी नेहमी एकाच प्रकारची भजी बनवण्यापेक्षा आज थोडी हटके व मस्त खमंग कुरकुरीत रव्याची भजी म्हणजेच "सूजी पकोडे" बनवले. कसे ते पहा साहित्य व कृती 👇

साहित्य :-
* रवा (जाडसर) २ वाट्या
* पातळ दही १ वाटी
* कांदा १ बारीक चिरून
* कच्चा बटाटा १ किसून
* कोथंबिर , कढीपत्ता चिरून
* हिरवी मिरची व आलं चिरून आवडीनुसार
* मीठ चवीनुसार
* लाल मिरचीपूड अर्धा चमचा
* धना-जिरा पावडर १ टीस्पून
* बेकिंग सोडा पाव टीस्पून किंवा इनो पावडर १ टीस्पून
* तेल तळण्यासाठी
* पाणी गरजेनुसार

कृती :-
प्रथम एका बाऊलमधे रवा घ्यावा. त्यामधे बेकींग सोडा सोडून वर दिलेले सर्व साहित्य घालावे व एकत्र ढवळून १५ मिनिट झाकून ठेवा.

पंधरा मिनिटानंतर मिश्रण परत एकदा व्यवस्थित ढवळावे व गरज वाटली तर थोडे पाणी घालावे. कारण रवा फुलतो. नेहमीच्या भजी पीठा इतपतच घट्ट ठेवावे.

आता तयार मिश्रणात सोडा घालावा व ढवळून गरम तेलात मध्यम आकाराची भजी तळून काढावी. तेलात भजी सोडताना तेल एकदम गरम असावे. नंतर गँस कमी करावा व मध्यम आचेवर सोनेरी रंगावर भजी तळावीत.

मस्त गरमा-गरम व कुरकुरीत भजी साँस सोबत किंवा नुसतीच मिरची सोबत खायला द्या.

अशी खमंग, कुरकुरीत भजी खायला स्वादिष्टच लागतात परंतु करायलाही सहज, सोपी व झटपट होतात. तुम्हीही करून बघा. तुम्हालाही नक्की आवडतील.

टिप :- आपल्या आवडीनुसार शिमला मिरची, गाजर, पालक, कोबी अशा भाज्यासुध्दा चिरून यात घालता येतात. चविला छान लागतात.

आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

18 February 2017

ब्रेड पिझ्झा (Bread Pizza)

No comments :

नव्या पिढीला पिझ्झा, बर्गर, चायनीज फूड अतिशय प्रिय! नेहमी नेहमी हे पदार्थ खाणे शरीराला हानिकारकच. परंतु कधीतरी घरीच मुलांना बदल म्हणून करून द्यायला हरकत नाही. आणि घरीच असे खायला मिळाले तर बाहेर खायची इच्छाच होत नाही.  "ब्रेड पिझ्झा " साहित्य व कृती-👇
साहित्य :-
* ब्रेड स्लाईस गरजेनुसार (साहित्य ८ स्लाईसचे)
* शिमला मिरची मोठ्या २
* टोमँटो २
* कांदा मोठा १
* बटर ४ टेस्पून
* चीज २-३लहान क्यूब्स
* पिझ्झा साँस
* टोमँटो साँस
* चिली फ्लेक्स
* मिक्स हर्ब्स
*.मिरपूड
* मीठ

कृती,-
प्रथम भाज्या बारीक चिरून घ्याव्यात. नंतर एकत्र करून त्यावर किंचित मीठ भुरभुरावे.

आता ब्रेड स्लाईसला एका बाजूला बटर लावून २ मिनिट प्रीहिट ओवनला २०० ° सेल्सियसला भाजावे.

नंतर भाजलेल्या बाजूवर पिझ्झा साँस लावावे व त्यावर मिक्स भाज्यांचा थर लावावा. त्यावर मिरचीपूड भुरभुरावी. नंतर वर चीज किसून घालावे.

आता २०० ° सेल्सियस प्रीहिट ओवनला ८-१० मिनिट भाजावे. वरचे चीज वितळून ब्रेड मस्त क्रिस्पी होतो.

नंतर ओवनमधून काढावे वरून टोमँटो साँस, चिली फ्लेक्स व मिक्स हर्ब्स भुरभुरावी. आवडत असेल तर अजून वर चीज किसून टाकावे.

लगेच मस्त क्रिस्पी, गरम, चटपटीत ब्रेड पिझ्झा खायला द्या.

टिप्स :- भाज्या आवडीनुसार व उपललब्धतेनुसार घ्याव्यात.

बटर चीज आवडीनुसार कमी-जास्त करावे.

ब्रेड, गोल स्लाईस असेल तर अधिक छान दिसते. ब्राउन ब्रेडही चालेल.

ओवन शिवाय घरात असलेल्या फ्रयपँन वर पण करता येते. फक्त वर झाकण ठेवावे. म्हणजे चीज वितळते व मधून मधून चेक करावे. नाहीतर एकच बाजू करपेल.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

22 January 2017

गाजर-मटार कटलेट (Carrot -Matar Cutlet)

No comments :

कटलेट,टिक्की, पँटीस असे चटपटीत प्रकार संध्याकाळच्या हलक्या नाष्ट्याला नेहमीच पसंद केले जातात. करायला तसे सुटसुटीत व कमी साहित्य असते. तर आज "गाजर-मटार कटलेट" कसे केले साहित्य व कृती-👇

साहित्य :-
° ताजे मटार २ वाट्या
° बटाटे २
° गाजर २
° पातळ पोहे अर्धी वाटी
“ रवा किंवा ब्रेडक्रम्स गरजेनुसार
° आलं-लसूण, हिरवी मिरची पेस्ट २ टीस्पून
° कोथिंबिर
° धना-जीरा पावडर १ टीस्पून
° चाट मसाला १ टीस्पून
° आमचूर पावडर अर्धा टीस्पून
° हळद पूड
° मीठ चविनूसार
° तेल

कृती :-

प्रथम बटाटे उकडून, मँश करून घ्यावेत. गाजर साल काढून किसून घ्यावेत.

नंतर त्यामधे वरील सर्व मसाला व पातळ पोहे मिसळावे व हाताने चांगले एकजीव करावे.

आता तयार मिश्रणाचे आपल्याला आवडतील त्या आकारात लहान -लहान चपटे गोळे करावेत व रव्यामधे घोळवून तेलामध्ये तळावेत.

तयार कटलेट साँस किंवा चटणीसोबत खा!

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

29 March 2016

मूग टिक्की (Moong Tikki)

No comments :

चटपटीत पदार्थ सगळ्यानाच खायला आवडतात.पण चटपटीत म्हणले की तेल आलेच. व आपण जर डाएट काॅन्शिस असू तर मग असे पदार्थ खाताना मनात अपराधीपणाची भावना येते.म्हणून चटपटीत पण पौष्टीक हिरव्या मुगाची टिक्की बनवली.

साहीत्य :-

1) मोड आलेले हिरवे मूग 2 वाट्या
2) उकडलेला बटाटा मोठ्ठा एक
3) मिरची, आले, लसूण पेस्ट आवडीनुसार
4) मीठ चवीला
5) गरम मसाला
6) तेल
7) कोथंबिर

कृती :-

प्रथम हिरवे मूग थोडे वाफवावेत .थंड झाल्यावर थोडे भरडच मिक्सरमधून काढावेत.

आता या मिश्रणात उकडलेला बटाटा मॅश करून घाला. नंतर त्यात मीठ, मसाला व आलं लसूण , मिरची पेस्ट, कोथंबिर घालावी व चांगले एकजीव करावे.

आता तयार मिश्रणाचे आपल्या आवडीच्या आकारमानाचे साधारण चपटे गोळे करा व पॅनमधे तेल सोडून उलटे-पालटे भाजावे.

मस्त खमंग व पौष्टीक टिक्की तयार. साॅस किवा चटणीसोबत सर्व्ह करा.

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

02 September 2015

फराळी रोल (Fasting Roll)

No comments :

 याचे नांव "फराळी रोल" असे असले तरी हे फक्त उपवास असेल तरच करावे व खावे असे नाही. आपण इतर वेळी सुध्दा करू शकतो .. संध्याकाळचे वेळी खाण्यासाठी किंवा कोणी येणार असेल तर चहा सोबत देण्यासाठी. उपवास आहे म्हणले की नेहमीचीच तीच ती  खिचडी खाउन कंटाळा येतो . काही नवीन चटपटीत बरे वाटते जिभेला . तर असे हे खमंग व झट्पट रोल कसे करायचे बघू !

साहित्य :-

१ ) कच्चे बटाटे साल काढून किसून  २ नग
२ ) राजगिरा पीठ ४ टेस्पून
३ ) शिंगाडा पीठ २ टेस्पून
४ ) भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट २ टेस्पून
५ ) मीठ व लाल तिखट / ही. मिरची चवीनुसार ६ ) जिर पूड १ टिस्पून
७ ) तेल तळणी साठी

कृति 
      प्रथम किसलेला बटाटा एका  बाऊल मधे घ्यावा .

नंतर त्या मधे वरील सर्व साहित्य घालावे व हाताने नीट एकजीव करावे . दहा मि. ठेवा ..

आत मिश्रणाचे लहान लहान गोळे घ्यावेत व हाताने त्याचे साधारण लांबट गोल रोल तयार करून राजगिरा पिठात घोळवा .

नंतर गरम तेलात तांबूस रंगावर तळून टीश्यु पेपर वर काढा .

हिरव्या चटणी सोबत किंवा दह्यात थोडे शेंगदाण्याचे कूट ,लाल तिखट व मीठ घालून एकत्र करा . उपवासाची चटणी तयार करा . रोल सोबत द्या .
आणी  जर उपवास नसेल तर टोमॅटो सॉस पण देऊ शकतो .

टिप्स :- बटाट्याच्या ऐवजी साबूदाणा जर भिजलेला तयार असेल तरी तोही वापरू शकतो .




26 July 2015

व्हेज ओट्स कटलेट ( Veg Oats Cutlet)

No comments :

पोळी-भाजी खायचे म्हणले की, मुलांच्या अगदी जीवावर येते. कशी बशी थोडीशी भाजी खाल्ली जाते. त्यातून आवडीची भाजी म्हणजे बटाटा, फ्लाॅवर किंवा मटकीची उसळ असेल तर जरा ठिक. पण शेंगवर्गीय भाज्या किवा भोपळा वगेरा तर अजिबातच नको. परंतू याच भाज्या वापरून पावभाजी केली तर खाल्ली जाते. म्हणून तोच विचार करून व सर्वच भाज्या थोड्या-थोड्या होत्या तर, मी थोडे पौष्टीक पण चटपटीत व्हेज ओट्स कटलेट केले. कसे पहा.

साहीत्य

1) कोबी किसून 1 वाटी
2) सिमला मिरची मध्यम 2-3
3) बिन्स बारीक चिरून 1 वाटी
4) दुधी फोडी चिरून 1 वाटी
5) गाजर किसून 2नग
6) मध्यम आकाराचे बटाटे उकडून दोन
7) हिरवी मिरचो, आले-लसूण पेस्ट
8) कांदा बारीक चिरून
9) तेल एक टेस्पून
10) मीठ चवीला
11) पावभाजी मसाला 2 टीस्पून
12) चाट मसाला अर्धा टीस्पून
13) हळदपूड अर्धा टीस्पून
14) प्लेन ओट्स एक वाटी
15) शॅलो फ्राय करण्यासाठी बटर किवा तेल आवडीनुसार

कृती :-

      प्रथम सर्व भाज्या व बटाटे वाफवून घ्यावे.
वाफवलेल्या भाज्या एका चाळणीवर ओतून त्यातील जादाचे पाणी काढून टाकावे.

आता एक टेस्पून तेल गरम करा व आलं-लसूण पेस्ट हळद घाला मग त्यात कांदा टाकून मऊ होईपरेंत परतावा.

नंतर उकडून घेतलेल्या सर्व भाज्या व बटाटा हातानेच किवा मॅशरने मॅश करून त्यावर घाला. नंतर त्यामधे मीठ, चाट मसाला, पावभाजी मसाला सर्व घालून एक-दोन परतण्या देऊन गॅस बंद करा.

थंड झाले की त्यात ओट्स घालून हाताने चांगले एकजीव करावे.ओट्समुळे पौष्टीक तसेच चिकटपणा येतो व सर्व भाज्या नीट एकत्र गोळा होण्यासपण मदत होते. ओट्स नसतील तर पातळ पोहे वापरले तरी चालतात. मळून दहा मिनीट झाकून ठेवा. मिश्रण आळून घट्टसर होते.

आता वरील मिश्रणाचे लिंबाएवढे लहान गोळे करून कटलेटचे साचे मिळतात. हव्या त्या आकारात थापून घ्या. किवा हातानेच लहान साधारण चपटे गोळे केले तरी चालते.

नंतर तयार गोळे पॅनमधे थोडे-थोडे बटर सोडून उलटे-पालटे तांबूस रंगावर शॅलोफ्राय करा.

असे गरमा-गरम तयार कटलेट हिरवी-लाल चटणी किवा साॅस सोबत सर्व्ह करा

टीप :- भाज्या आपल्या आवडीने व उपलब्द असतील त्या घ्याव्यात.

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या. 

29 June 2015

मेथी-पोहा टिक्की ( Methi-Poha Tikki)

No comments :

संध्याकाळचे वेळी चहा सोबत आपल्याला काहीतरी चटपटीत पण हेल्दी असे खाण्याची इच्छा होते.तेव्हा ही टिक्की नक्की ट्राय करा एकदम सोपी, झटपट व पौष्टीकपण ! कशी करायची पहा..

साहीत्य :-
1) मेथी धुवून बारीक चिरून 2 वाट्या
2) पातळ पोहे 1 वाटी
3) उकडलेला बटाटा 2
4) कांदा 1 बारीक चिरून
5) कसूरी मेथी 2 टीस्पून
6) आल,लसूण हिरवी मिरची पेस्ट आवडीनुसार
7) गरम मसाला 1/2 टीस्पून
8) आमचूर पावडर 1 टीस्पून
9) धना-जिरा पावडर 1 टीस्पून
10) मीठ चवीनुसार
11) हींग,हळद व जिरे-मोहरी फोडणीसाठी
12) तेल 1टेस्पून फोडणीसाठी
13) तळणीसाठी गरजे इतके
14) मैदा 1 टेस्पून

कृती :-

       प्रथम पॅनमधे फोडणीसाठी तेल घालून जिरे ,मोहरी व हींग, हळद घालून फोडणी करून घ्यावी. फोडणीत कांदा व आल-लसूण,मिरची घालून परतावे.मऊ झाला कांदा की नंतर त्यात चिरलेली मेथी , कसूरी मेथी व उकडलेला बटाटा घालून परता.

आता त्यात गरम मसाला, मीठ, आमचूर पावडर,धना-जिरा पावडर सर्व साहीत्य घालून नीट हलवा व एकजीव करा. गॅस बंद करा.नंतर
त्यात पोहे थोडे(पाव वाटी) शिल्लक राखून बाकीचे घाला व एकजीव करा.आता थंड होऊ दे.

थंड झाल्या नंतर आपल्या आवडीप्रमाणे साधारण मोठ्या लिंबा एवढे चपटे गोल गोळे करावेत. व मैदा घेऊन त्यात पाणी घालून पातळ पेस्ट बनवून घ्या.त्यात एक-एक गोळे बुडवून काढा व शिल्लक पोहे डिशमधे पसरा व त्यात घोळवा.

गरम तेलात मंद तांबूस रंगावर तळून काढावेत.
मस्त क्रिस्पि टिक्की तयार! चहा सोबत किवा हिरव्या चटणी सोबत,साॅससोबत कशासोबत पण आपल्या आवडीप्रमाणे खावे.

टीप :- तळण्याऐवजी शॅलोफ्राय केले तरी चालते. पण शॅलोफ्राय करायचे असेल तर पोह्यामधे घोळवण्याऐवजी ब्रेडक्रम्स किवा रव्यात घोळवावे व मग शॅलोफ्राय करावे.

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

12 February 2015

काॅर्न कबाब (Corn Kabab)

No comments :

झटपट आणि  सोपा असा हा मक्याचा चटपटीत प्रकार आज बनविला .त्याचे साहीत्य काय आणि कसा बनविला पहा.

साहीत्य :-

1) वाफविलेले मक्याचे दाणे 2 वाट्या
2) उकडलेला 1 बटाटा
3) सिमला मिरची 2 बारीक चिरून
4) हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार
5) तांदुळाची पिठी दोन टेस्पून बाइंडींगसाठी
    (गरजेनुसार कमी-अधिक होऊ शकते)
6) मिठ
7) तेल तळणीकरता

कृती :-

       प्रथम मक्याचे दाणे  मिक्सरमधून काढून घ्यावेत.भरडच असावेत मधे-मधे मक्याचे दाणे राहू द्यावेत.खाताना दाताखाली आलेले चांगले लागतात.

नंतर त्यामध्ये उकडलेला बटाटा मॅश करून घालावा.तसेच सिमला मिरची, हिरवी मिरची, मिठ चवीला घालून नीट मिक्स करावे.

आता त्यामध्ये तांदुळाची पिठी घालावी व गोळा करावा.

तयार मिश्रणाचे हातावर लहान-लहान गोळे करून हलकेच दाबावे व तेलात तांबूस गुलाबी तळावेत.

पुदीन्याच्या हिरव्या चटणी सोबत खावेत.

टीप :-कबाब आपण शॅलोफ्राय पण करू शकतो.डाएट काॅनशिअस असणार्यानी शॅलो फ्राय करावेत.पण तळून खाण्याची मजा औरच !

13 November 2014

हेल्दी स्टार्टर (Healthy Starter )

No comments :
मुलांना नेहमीच काहीतरी चटपटीत खायला हवे असते.आपल्याला वाटत असते सकस काहीतरी जावे त्यांच्या पोटामध्ये मग काय करावे ? तर अशावेली मधला मार्ग म्हणून घरच्या घरी लापशी रव्यापासून पौष्टीक व चटपटीत असे स्टारटर तयार करून बघा.झटपट तयार पण होतात ! कसे करायचे बघा...
साहित्य:-
* लापशी रवा १ वाटी
* उकडलेला बटाटा मोठा एक
* बारीक चिरलेला कांदा एक
* मिरची, कोथंबीर
* काॅर्नफ्लोअर दोन टेस्पून
* ब्रेडक्रम्स अर्धी वाटी
* कसूरीमेथी चिमूटभर व धना पावडर
* मीठ चवीनुसार
* तळण्यासाठी तेल

कृती:-
प्रथम लापशी रवा व बटाटा उकडून घ्यावा. नंतर उकडलेल्या रव्यामधे,मॅश केलेला बटाटा, 
चिरलेला कांदा,कोथंबीर,मिरची,निम्मे काॅर्नफ्लोअर्धे, ब्रेडक्रम्स,कसूरी मेथी,धना पावडर व मीठ घालून सर्व व्यवस्थित एकत्र करून मळावे व गोळा बनवावा.

एका बाऊलमध्ये शिल्लक ठेवलेले एक चमचा काॅर्नफ्लोअर घेऊन त्यात पाणी घालावे व पातळ पेस्ट बनवावी.

आता वरील तयार मिश्रणाचे लहान-लहान लांबट गोळे करून काॅर्नफ्लोअरच्या पातळ मिश्रणामध्ये बुडवून ब्रेडक्रम्समधे घोळवावेत व तेलात सोनेरी रंग येईपर्यंत तळावेत. गरम असतानाच टूथपीक खोचावी. खायला सोपे पडते. 

आपले हेल्दी स्टारटर्स तयार !!! साॅस सोबत अथवा नुसतेपण खाण्यास चांगले लागतात.

आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

19 September 2014

मका टिक्की(Corn Tikki )

No comments :

साहित्य-
* मक्कयाचे कणिस
* उकडलेला बटाटा
* काॅर्नफ्लोअर
* आल ,लसूण मिरची पेस्ट
* हळद,हींग,मिठ,आमचूरपावडर
* तेल

कृती:-
प्रथम कणिस किसून घ्यावे.त्यामधे,आले,
लसूण, मिरची पेस्ट घालावी. किसलेला गोळा थोड्या तेलावर परतावा व त्यात हळद,हींग,मिठ आमचूर पावङर घालावे आणि चांगली वाफ आणावी.

दुसरीकङे वरील आवरणासाठी, उकडलेला बटाटा किसून घेऊन,त्यामधे काॅर्नफ्लोअर  व मिठ घालून गोळा मळून तयार करावा.

आता मळलेल्या पिठाची लहान गोळी घेऊन त्याची खोलगट पारी बनवावी व वर तयार केलेले मक्याचे सारण त्यात भरावे व नीट बंद करून , हातानेच थोडे दाबून चपटे करावे आणि आवडीप्रमाणे डीप अथवा शॅलो फ्राय करावे.

गरमा-गरम क्रिस्पी टिक्की साॅस बरोबर किंवा गोड चटणी बरोबर सर्व्ह करावी.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

18 September 2014

व्हेज लाॅलीपाॅप (Veg. Lolipop )

No comments :
साहित्य :-
* भिजवलेले सोयाबिन
* उकडलेला बटाटा
* ब्रेडक्रम्स
* किसलेले गाजर,कोबी,बारीक चिरलेला पालक आवडीनुसार
* मीठ,मिरची-आले लसूण पेस्ट
* ब्रेडस्टीक्स / आइसक्रीम स्टीक्स ( शक्यतो ब्रेडस्टीक्सच घ्याव्यात )
* तेल तळण्यासाठी

कृती:-
प्रथम सोयाबीन व मिरची आले लसूण वाटून घ्यावे.
वाटलेल्या मिश्रणामधे उकडलेला बटाटा मॅश करून व किसलेले गाजर ,कोबी, मीठ ब्रेडक्रम्स घालून, मळून गोळा तयार करावा.

तयार मिश्रणाचे लहान लहान लांबट गोळे करून ब्रेडक्रम्समधे थोडे घोळवा (आधि मिश्रणात पण घातले आहे.नाही घोळवले तरी चालते )व ब्रेडस्टीक ला लावून तळून काढावे.

टोमॅटो साॅसबरोबर सर्व्ह करावे.

टिप्स:-
        ब्रेडस्टीकला मिश्रणाचे गोळे लावून ,तयार करून पाच मिनीट ठेवावे.नंतर तळावे. मिश्रणाचा ओलावा स्टीक ओढून घेतात व मिश्रण घट्ट बसते .तेलात अजिबात सुटत नाही.
सोयाबिनच्या ऐवजी मक्याचे दाणे वापरूनपण काॅर्न लाॅलीपाॅप करू शकतो.


आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

       

07 September 2014

पनीर रोल(Paneer Roll )

No comments :


साहीत्य:-

1) पनीर
2) बारीक चिरलेला कांदा,कोथंबिर,आले लसूण मिरची पेस्ट
3) मीठ ,तेल
4) उकङलेला बटाटा
5) काॅर्नफ्लाॅवर
6) ब्रेङक्रम्स

कृती:-

      प्रथम पनीर खिसून घ्यावे त्यामधे चवीला मीठ ,मिरची लसूण आले पेस्ट सर्व  घालून सारण तयार करावे.

वरील आवरणासाठी उकङलेला बटाटा मॅश करून घ्यावा त्यामधे किंचित मीठ व गोळा होण्यासाठी (बाॅङींगसाठी) थोङे काॅर्नफ्लाॅवर घालावे व चागले मळून घ्यावे.

मळलेल्या पिठाच्या लहान लहान पुर्या लाटून त्यामधे वरील सारण भरावे व रोल करावेत. ब्रेङक्रम्स मधे घोळवून शॅलो फ्राय करावे.

तयार रोल साॅस सोबत सर्व्ह करावेत. छान लागतात व पट्कन होतात.

       

05 September 2014

पोहा-बटाटा कटलेट(Poha-Batata Cutlet)

No comments :

साहीत्य:-
१) उकङलेले मध्यम बटाटे दोन
२) भिजवलले पोहे दोन वाट्या
३) बारीक चिरलेला कांदा,आले-लसूण,मिरची पेस्ट, कोथंबिर
४) बाईंडींग पुरते डाळीचे पिठ
५) चवीसाठी मिठ व तेल

कृती;-
प्रथम बटाटा खिसून घ्यावा व त्यामधे पोहे आणि वरील सर्व साहीत्य घालून चांगले मळावे.नंतर गोळा बनण्याइतपत डाळीचे  पीठ घालावे घालून हातानेच चपटे गोळे करून शॅलोफ्राय करावेत.

आवङीनुसार चटणी अथवा साॅस सोबत खावे.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

01 September 2014

मूग,मटकी मेथी कटलेट(Moong,Mataki,Methi Cutlet)

No comments :

साहीत्य:-
* मोङ आलेले हिरवे मूग १ वाटी
* मोड आलेली मटकी १ वाटी
* बारीक चिरून हिरवी मेथी/पालक आवडीप्रमाणे
* लिंबूरस
* उकङून मॅश केलेला बटाटा २नग
* गरम मसाला,मीठ,तिखट
* काॅर्नफ्लाॅवर/तांदळाचे पिठ
* तेल

कृती;-

प्रथम मूग व मटकी थोडे वाफवून मोटसर भरडच वाटावे .त्यामधे बटाटा ,तिखट मिठ मसाला घालून लिंबू पिळावे. मिळून येण्यापुरते काॅर्नफ्लाॅवर घालून नीट एकत्र करावे. 

नंतर हातावरच लहान चपटे गोळे करून काॅर्नफ्लाॅवरमधे घोळवून शॅलोफ्राय करावे.व गरमच खावेत.साॅस बरोबर अथवा नुसतेपण छान लागतात.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.