18 February 2017

ब्रेड पिझ्झा (Bread Pizza)

No comments :

नव्या पिढीला पिझ्झा, बर्गर, चायनीज फूड अतिशय प्रिय! नेहमी नेहमी हे पदार्थ खाणे शरीराला हानिकारकच. परंतु कधीतरी घरीच मुलांना बदल म्हणून करून द्यायला हरकत नाही. आणि घरीच असे खायला मिळाले तर बाहेर खायची इच्छाच होत नाही.  "ब्रेड पिझ्झा " साहित्य व कृती-👇
साहित्य :-
* ब्रेड स्लाईस गरजेनुसार (साहित्य ८ स्लाईसचे)
* शिमला मिरची मोठ्या २
* टोमँटो २
* कांदा मोठा १
* बटर ४ टेस्पून
* चीज २-३लहान क्यूब्स
* पिझ्झा साँस
* टोमँटो साँस
* चिली फ्लेक्स
* मिक्स हर्ब्स
*.मिरपूड
* मीठ

कृती,-
प्रथम भाज्या बारीक चिरून घ्याव्यात. नंतर एकत्र करून त्यावर किंचित मीठ भुरभुरावे.

आता ब्रेड स्लाईसला एका बाजूला बटर लावून २ मिनिट प्रीहिट ओवनला २०० ° सेल्सियसला भाजावे.

नंतर भाजलेल्या बाजूवर पिझ्झा साँस लावावे व त्यावर मिक्स भाज्यांचा थर लावावा. त्यावर मिरचीपूड भुरभुरावी. नंतर वर चीज किसून घालावे.

आता २०० ° सेल्सियस प्रीहिट ओवनला ८-१० मिनिट भाजावे. वरचे चीज वितळून ब्रेड मस्त क्रिस्पी होतो.

नंतर ओवनमधून काढावे वरून टोमँटो साँस, चिली फ्लेक्स व मिक्स हर्ब्स भुरभुरावी. आवडत असेल तर अजून वर चीज किसून टाकावे.

लगेच मस्त क्रिस्पी, गरम, चटपटीत ब्रेड पिझ्झा खायला द्या.

टिप्स :- भाज्या आवडीनुसार व उपललब्धतेनुसार घ्याव्यात.

बटर चीज आवडीनुसार कमी-जास्त करावे.

ब्रेड, गोल स्लाईस असेल तर अधिक छान दिसते. ब्राउन ब्रेडही चालेल.

ओवन शिवाय घरात असलेल्या फ्रयपँन वर पण करता येते. फक्त वर झाकण ठेवावे. म्हणजे चीज वितळते व मधून मधून चेक करावे. नाहीतर एकच बाजू करपेल.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

No comments :

Post a Comment