09 February 2017

तिळाचे लाडू ( Til Laddu)

No comments :

"तिळ लाडू "संक्रांतिला करतात.. कारण या दिवसात थंडी असते व थंडीत शरीराला तिळ व गुळ अतिशय लाभदायक असते. तिळातून शरीराला स्निग्धांश मिळतात. तसेच हाडे मजबूत होतात. यात कँल्शियम असते. गुळापासून शरीराला उष्णता व लोह मिळते. तर असे बहूगुणी लाडू करण्यासाठी लागणारे साहित्य व कृती-👇

साहित्य :-
°  तिळ २  वाट्या
° गुळ १ वाटी
° भाजून सोललेले शेंगदाणे अर्धा वाटी
° वेलचीपूड

कृती :-

प्रथम तिळ खमंग गुलाबी भाजून घ्याव्येत. गुळ चिरून घ्यावा.

नंतर भाजलेल्यापैकी निम्मेच तिळ भरड कुटावेत.

आता गँसवर जाड बुडाच्या भांड्यात गुळ घालावा व चमच्याने हलवत गुळ फक्त विरघळून एक चटका आणून घ्यावा. पाक करू नये.

आता झटपट, वितळलेल्या गुळात तिळ,कुटलेले तिळ, शेंगदाणे व वेलचीपूड घालून एकत्र करावे. हाताला सोसवेल इतपत गरम असतानाच गरम गरम, सुपारीच्या  आकाराचे लाडू वळावेत.

थंड झाले की डब्यात भरून ठेवावे.

टिप :- मी यासाठी नेहमीचाच मऊ गुळ वापरला आहे. त्यामुळे लाडू छान मऊ होतात. अन्यथा चिक्की गुळ वापरला तर कडक व चिवट होतात.

नुसत्या तिळाऐवजी निम्मे तिळ व निम्मे शेंगदाणे कूट वापरले तरी चालते.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

No comments :

Post a Comment