05 February 2015

मिक्स डाळ डोसा/अडई डोसा (Adai Dosa)

No comments :

अडई डोसा हा एक साउथ इंडीयन डोसा प्रकार आहे.विशेष करून तामिळनाडू मधे जास्त केला जातो.तर तसा सोपा व पौष्टीक असा हा डोसा कसा केला जातो ते बघा.

साहीत्य :-
1) मोठा तांदूळ 1 वाटी
2) उडद डाळ 1/2 वाटी
3) चना डाळ
4) तुर डाळ
5) मूगडाळ
6) मसूर डाळ
सर्व डाळी 1/4 वाटी
7) सुक्या लाल मिरच्या चार
8) मेथी दाणे 10-12
9) बारीक चिरून कांदा कोथंबिर
10) आले एक इंच बारीक चिरून
11) कडीपत्ता चिरून
12) मिठ
13) तेल
14) पाणी

कृती :-

     प्रथम तांदुळ व सर्व डाळी स्वच्छ निवडून धुवून चार ते पाच तास भिजत घाला.डाळीमधे भिजतानाच लाल मिरच्या व मेथी घाला.फक्त तांदुळ वेगळ्या भांड्यात भिजत टाका बाकी सर्व डाळी एकत्रच टाका.

चार-पाच तास भिजवून झाल्यानंतर डाळ व तांदळामधील पाणी निथळून काढा व मिक्सरवर वाटा .वाटताना गरज वाटली तर काढलेलेच पाणी थोडे थोडे वापरा.
मिश्रण फार घट्ट अथवा पातळ असू नये.

नंतर हे मिश्रण एका भांड्यात काढावे व सर्व मसाला व मिठ घालून हलवावे.

आता तव्याला तेलाचे ब्रशिंग करून गरम तव्यावर पळीने डोसा घालून थोडा पसरून घ्या वर झाकण ठेवून वाफ आणा व परत थोडे तेल सोडून उलट बाजूने जरा भाजा.हे डोसे तसे जाडसरच असतात.

तयार डोसा नारळाची चटणी ,सांबार किवा पुदीना चटणी आवडीनुसार कशा बरोबरही सर्व्ह करा छान लागतो.गरम डोसा नुसताही छान लागतो.

टीप:- या डोश्याला पीठ अंबवण्याची किंवा फुगण्याची गरज नसते.

आपल्या आवडीनुसार डाळी व डाळींचे प्रमाण आपण कमी-जास्त घेऊ शकतो.

No comments :

Post a Comment