28 January 2015

तिरंगा सलाड (Tiranga Salad )

No comments :

सलाड किंवा कच्या कोशिंबरी, रायते नेहमीच जेवणात असावेत असे सर्वच आहारतज्ञ व घरातील अनुभवी लोक म्हणत असतात.बरेच वेळा आपण वेळ नाही म्हणून पट्कन नुसती पोळी-भाजीच खाऊन घेतो.तसेच जर रोजचा डबा असेल तरी दुपारचे जेवण तितके व्यवस्थित घेतले जात नाही.आज 26 जानेवारी ची सुट्टी असलेने व सर्वजण घरातच असलेने सर्व व्यवथितच लागते.फ्रिज उघडला तर सलाड साठी कोणतीच एक भाजी पुरेशा प्रमाणात नव्हती,मग त्यातून हे सलाड सुचले व नामकरण 'तिरंगा सलाड' असे झाले.ते कसे केले पहा !

साहीत्य :-

1) लाल टोमॅटो 2
2) लाल गाजर 2
3) पांढरा मुळा अर्धा किंवा लहान एक
4) काकडी 1
5) पांढरा कांदा 1
6) हिरवी कांदापात,हिरवी मिरची एक
7) कोथिंबिर मूठभर
8) लिंबू अर्धा
9) काळे मिठ
10) चाट मसाला

कृती :-

  प्रथम सर्व भाज्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्याव्यात.

नंतर सर्व बारीक चिरून घ्यावे.गरज वाटली तर काकडी,गाजर,मुळा याच्या साली काढा.अन्यथा तसेच घ्या.

आता हे चिरलेले साहीत्य सर्व एका बाऊल मधे मिक्स करा व झाकून ठेवून द्या.अगदी ऐत्यावेळी मिठ व चाट मसाला  घालून वर लिंबू पिळून हलवा व पानात वाढा.

रंग-बिरंगी झाल्याने दिसायला खूपच छान दिसते व लहान मुले पण आवडीने खातात.

No comments :

Post a Comment