18 January 2015

झट-पट मसाला इडली ( Zat-pat Masala Idly)

No comments :
सकाळी नाष्टा  बनवायचे म्हणजे गृहिणीसमोरचा मोठा यक्ष प्रश्न! आज काय बनवायचे? आणि तेही सकाळच्या गडबडीत पटकन झाले पाहिजे,नवे ,चवदार व पौष्टिक असले पाहिजे. रोजचे तेच तेच पोहे ,उपमा नको. मग अशावेळी खाली दिल्याप्रमाणे इडली करून बघा. मला खात्री आहे नक्की तुम्हाला व घरच्या मंडळींना आवडतील....

साहित्य ;-

१) बारीक रवा १वाटी
२) दही १/४ वाटी
३) पाणी १वाटी
४) इनो fruit salt 3/४ टीस्पून
५) मीठ चवीप्रमाणे
फोडणी साठी
६) तेल १ टेबलस्पून
७) जिरे,मोहरी,हिंग
८) उदड डाळ १ टीस्पून
९) मिरची ,कडीपत्ता
१०) कोथम्बिर

कृती :-:-

     प्रथम रवा एका बाउल मध्ये घ्यावा व त्यामध्ये दही,मीठ आणि पाणी घालून गुठळया न होऊ देता सारखे करावे. दहा मिनिट झाकून ठेवावे ,

नंतर एका पळीमध्ये तेल तापवून त्यामध्ये हिंग,जिरे,मोहरी,घालून फोडणी करावी .फोडणी मध्ये उदड डाळ मिरची व कडीपत्ता टाकून परतावा.

आता ही तयार फोडणी भिजलेल्या रव्यावर ओतावी, आताच बारीक चिरलेली कोथम्बिर पण घालावी  व सगळे  मिश्रण नीट हलवावे. शेवटी इनो पावडर घालून वर थोडे पाणी शिंपडावे , म्हणजे इनो activate होते  आणि मिश्रण एकाच दिशेने हलवावे .

नंतर इडली पात्राला तेलाचा हात लावून मिश्रण घालावे व ७ -८ मिनिट शिट्टी न लावता कुकरला वाफवावे .

तयार गरमा -गरम इडली नारळाच्या चटणी बरोबर खाण्यास द्यावी . चटणी नसेल तरी नुसत्या सुद्धा छान लागतात .

टीप : या इडल्या मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये पण करता येतात . अजून कमी वेळात होतात .
         ओव्हन मायक्रोव्हेव मोडला , हाय टेंपरेचरला ३-४ मिनिट ठेवावा .
         ओव्हन सेफ इडली स्टँड वेगळे मिळते ते वापरावे .   


No comments :

Post a Comment