27 January 2015

दूध,दूधाचे प्रकार,उपयुक्ततता

No comments :


गायीचे दूध,दूधाचे फायदे
********************
म्हशीच्या दुधापेक्षा गायीच्या दुधामध्ये चरबीचं प्रमाण पाच टक्के कमी असूनही त्यात शरीराचे पोषण करण्याची क्षमता असते. मानवी शरीराला सहज सात्म्य होणाऱ्या गायीच्या दुधाचे अनेक फायदे आहेत. माझे एक वैष्णव मित्र नेहमी परदेशात प्रवास करतात. कांदा-लसूण खात नाहीत. त्यामुळे परदेशात जेवणाची पंचाईत होते. काहीच मिळाले नाही तर ते गायीचे दूध पितात. गायीचे दूध हे जगभर कुठेही मिळू शकते, तसेच ते सर्वव्यापी, सहज उपलब्ध, तुलनेने स्वस्त आहे. या गोरसाला अमृताची उपमा दिली आहे. मानवी आरोग्याला, स्वास्थ्याला, रोगनिवारणाला गायीच्या दुधाची अपार मदत होते. आधुनिक शास्त्राप्रमाणे गायीच्या दुधात चरबीचे प्रमाण पाच टक्के आहे. म्हशीच्या दुधात आठ टक्के चरबी असते. कमी चरबी असून शरीराचे पोषण करण्याचा गायीच्या दुधाचा विलक्षण गुण आहे.

आयुर्वेदशास्त्राने गाय, म्हैस, बकरी, मेंढी, हत्ती, उंट, गाढव व स्त्री अशी आठ दुधांची वर्गवारी केली आहे. लहान बालकापासून आपल्या जीवनात गोदुग्ध प्रवेश करते. मातेचे दूध कमी पडते, त्यावेळेस सहजपणे गायीच्या दुधाकडे वळता येते. ते मानवी शरीराला सहज सात्म्य होते. मधुर रस, शीतवीर्य, मधुर विपाक असे शास्त्रातील गुण असलेले गायीचे दूध वातविकार व पित्तविकाराच्या रुग्णांना फार उपयुक्त आहे. कफग्रस्त विकाराच्या रुग्णांनी गायीचे दूध सकाळी आणि योग्य अनुपानाबरोबर घ्यावे. निरामय, दीर्घायुष्य जगू इच्छिणाऱ्यांनी सकाळी गायीचे दूध घ्यावे. कफ होत असेल तर किंचित मिरेपूड किंवा मध मिसळून घ्यावे. पोट खळबळत असेल तर सुंठ पूड मिसळून दूध प्यावे. कृश व्यक्तींचे वजन वाढते. गायीच्या दुधाचा खरा उपयोग कावीळ, जलोदर, यकृत व पांथरीची वाढ या विकारात होतो. पाणी पिण्यावर व आहारावर नियंत्रण असते या विकारात केवळ गोदुग्ध आहारावर राहून रोगी बरे होतात. एक-दीड लिटपर्यंत गायीचे दूध रोज प्यावे. कावीळ, जलोदर किंवा यकृतशोध विकारात पोट साफ होणे आवश्यक असते. दुग्धाहाराने प्रथम जुलाब होतात, पण रोगप्रतिकारकशक्ती वाढते. गायीच्या दुधाचा प्रमुख गुण रोगप्रतिकारकशक्ती वाढवणे हा आहे. हाच गुण एड्स या विकारात गायीचे दूध नियमित घेणाऱ्यांना येईल. एड्सच्या भयंकर विळख्यातून बाहेर पडावयास गायीच्या दुधासारखे सहजसोपे औषध नाही. याचप्रकारे उन्माद, अपस्मार, फेपरे या मानसिक विकारात, दीर्घकाळ मेंदू झोपवणारी औषधे घेणाऱ्यांनी नियमित गायीचे दूध घेतल्यास या मादक गोळय़ांपासून नक्कीच छुटकारा मिळतो. गायीचे दूध त्वचाविकार, आम्लपित्त, अंगाची आग, खाज, अल्सर, पित्तप्रधान पोटदुखी, झोप न लागणे, हातापायांची व डोळय़ांची आग, डोळय़ांची लाली, शीतपित्त, अंगावर गांधी उठणे, मलावरोध, आतडय़ांचा क्षय, टीबी, मूळव्याध, भगंदर, दारूचे व्यसन, तंबाखूचे दुष्परिणाम, तोंडातील व्रण, कोणत्याही जखमा, मधुमेह इत्यादी नाना विकारांत उपयुक्त आहे. फाजील कफ न वाढवता शरीरात ठिकठिकाणी साठलेली उष्णता, फाजील कडकी, गायीच्या दुधाने कमी होते. शरीराची दर क्षणी होणारी झीज भरून येते. अल्कोहोल किंवा निकोटीनमुळे शरीरात ठिकठिकाणी व्रण होतात. ते मुळापासून बरे होतात. गालाचा, घशाचा, आतडय़ांचा, यकृताचा कॅन्सर या विकारात निव्वळ गायीच्या दुधावर बरे होता येते. सोरायसिस या किचकट विकारात गायीचे दूध नवजीवन देते. सूर्याच्या शापाला ‘गोमातेचे पुण्य’ हे मोठे उत्तर आहे. दीर्घकालीन तापातून, विशेषत: टायफॉइड, मलेरिया, टीबी या तापातून बाहेर पडताना गोदुग्धाचा आश्रय घ्यावा. गायीचे दूध स्वच्छ आहे याची खात्री असावी. कारण कोणतेही दूध उकळले, नव्हे खूप आटले तरी त्यातील काविळीचा किंवा टायफॉइडचा जंतू मरत नाही. थोडे पाणी मिसळून, दूध पुन्हा आटवून घेणे सर्वात चांगले.

मुळव्याधीवर ताकाचा उपाय मूळव्याध हा भयंकर पीडा देणारा रोग केवळ ताक व ज्वारीची भाकरी खाऊन, औषधाशिवाय बरा होऊ शकतो. मोड मुळातून नाहीसे होतात.

ताक आंबट नको. पोटदुखी, अजीर्ण, अरुची, अपचन, उदरवात, जुलाब एवढेच काय पण पाश्चात्त्य वैद्यकाने असाध्य ठरविलेला ग्रहणी, संग्रहणी, आमांश हा विकार भरपूर ताक पिऊन बरा होऊ शकतो. ताक व तांदळाची भाकरी असा आहार ठेवला तर आमांश विकार नि:शेष बरा होईल. मलावरोधाची जुनाट खोड असणे, मूळव्याध, भगंदर या विकारांत रात्री गायीच्या दुधाबरोबर एक चमचा तूप घ्यावे. गायीच्या दुधाबरोबर रोगपरत्वे सुंठ, मिरी, पिंपळी, वावडिंग, शोपा, ओवा, मध, तुळशीची पाने, आले, लसूण अशी नाना अनुपाने वापरता येतील. दम्याच्या विकारात एक कप गोदुग्ध, दहा-पंधरा तुळशीची पाने आणि दोन लेंडी पिंपळी व एक कप पाणी असे उकळून, पाणी आटवून रोज सकाळी घ्यावे. यामुळे कफ बनण्याची प्रक्रिया थांबते. फुप्फुसाची रोगप्रतिकारशक्ती वाढते. ब्रॉन्कायटिस किंवा क्षय विकाराची धास्ती राहत नाही. पोटात वात धरणे, गुबारा धरणे या विकारात ज्यांना लसूण उष्ण पडते त्यांनी गायीचे दूध व पाणी प्रत्येकी एक कप घेऊन लसणीच्या पाच-सात कांडय़ा त्यात उकळाव्या. पाणी आटवून ते प्यावे. पोटात वायू धरण्याची खोड मोडते. सर्दी, घसा बसणे, पडसे या विकारात रात्री दूध घेतल्यास लगेच आराम पडतो. अल्सर, पोटदुखी, आम्लपित्त, काँग्रेस गवताची अॅलर्जी, शरीराची आग होणे, नागीण, तोंड येणे, क्षय या विकारांत मनुका उकळून ते दूध घेतल्यास लवकर बरे वाटते. विस्मरण, खूप तहान लागणे, शरीर निस्तेज होणे, खूप भूक लागणे, जुनाट या विकारांत दहा-वीस धने गायीच्या दुधात उकळून ते दूध प्यावे.

दूध व दुग्धजन्य पदार्थ म्हशीचे दूध वजन वाढवण्यास उपयुक्त आहे. कृश माणसाला झोप येत नसल्यास रात्री म्हशीचे दूध प्यावे. उत्तम झोप लागते. शेळय़ा कमी पाणी पितात. त्यांचा आहार कडू, तुरट, तिखट असा असतो. त्यांचे हिंडणे-फिरणे खूप. त्यामुळे त्यांचे दूध पचावयास हलके असते. क्षय, दमा, ताप, जुलाब, डोळय़ांचे विकार, रक्तपित्त व मधुमेह विकारांत शेळीचे दूध म्हणजे टॉनिक आहे. तुलनेने मेंढय़ांचे दूध कमी गुणाचे आहे. ते उष्ण असून वात विकारात उपयुक्त आहे. उंटिणीचे दूध जलोदर, पोटफुगी, मूळव्याध, शरीरावरील सूज या विकारात उपयुक्त आहे. शरीरास बळकटी आणण्यास हत्तिणीचे दूध उपयुक्त आहे. घोडी, गाढवी यांचे दूध हातापायांच्या विकारात उपयुक्त आहे. शरीरात खूप रूक्षता असल्यास निरसे न तापविलेले किंवा धारोष्ण दूध प्यावे. पोटात वायू धरण्याची खोड असणाऱ्यांनी दूध तापवून मगच प्यावे. अंगावरचे, स्त्रीचे दूध डोळय़ांच्या वात, पित्त किंवा रक्तदोष विकारांत फार उपयुक्त आहे. डोळय़ांत चिपडे धरणे, चिकटा असणे, उजेड सहन न होणे याकरिता स्त्रीच्या दुधाचे थेंब डोळय़ात सोडावे.

दूध कोणी घेऊ नये? नवीन आलेला ताप, वारंवार जुलाब होण्याची सवय, पोटात खुटखुटणे, कळ मारून मलप्रवृत्ती, अग्निमांद्य, लघवीला अडथळा असणे, लघवी कमी होणे, मूतखडा, लहान बालकांचा दमा, खोकला व कफ विकारात दूध हितकारक नाही. अजीर्ण, आमवात, वृद्ध माणसांचा रात्रीचा खोकला या विकारात दूध वज्र्य करावे. कफ प्रकृती असणाऱ्यांनी किंवा शौचाला खडा होण्याची सवय असणाऱ्यांनी रात्री दूध घेऊ नये. कावीळ किंवा टायफॉइडचा ताप या विकारात औषधांचा गुण येत नसेल तर दूध किंवा दुधाचे पदार्थ लगेच बंद करावे. आराम मिळतो.

ताक इंद्रालासुद्धा हवेहवेसे वाटणारे ताक आजच्या सततच्या वाढत्या महागाईच्या दिवसात अनेक विकारांवर उत्तम औषध आहे. योग्य प्रकारे तापविलेल्या दुधात किंचित कोमट असताना नाममात्र विरजण लावल्यास उत्तम दर्जाचे मधुर चवीचे दही तयार होते. त्या दह्यचे आपल्या गरजेनुसार गुण ताज्या ताकातच आहेत. दही खाण्याचा अतिरेक होऊन मूळव्याध, सूज, अजीर्ण, खाज, कंड, कफ, दाह असे विकार उत्पन्न झाले तर त्यावर ताक हा उत्तम उतारा आहे. ‘ताजे’ किंचित तुरट असलेले ताक सुंठेबरोबर घेतल्यास हे कफावरचे उत्तम औषध आहे. खूप तहान लागणे, शोष या विकारात व उन्हाळा, ऑक्टोबर महिना या काळात सकाळी नियमितपणे ताक प्यावे. पावसाळय़ात सुंठ चूर्ण किंवा मिरेपूड मिसळून ताक प्यावे. लघवी कमी होणे, लघवी लाल होणे, तीडिक मारणे, उपदंश विकार, एड्स विकारात इंद्रियांचा दाह होणे, ओटीपोटात कळ मारणे, पक्काशयात अन्न कुजणे, शौचाला घाण वास मारणे, जंत-कृमी इत्यादी अपान वायूच्या तक्रारीत एक दिवस केवळ ताकावर राहावे. ताकाबरोबर चवीकरिता आले, लसूण, सुंठ, मिरी, जिरे, मीठ वापरावे. वृद्ध माणसांनी ताक सकाळी प्यावे. सायंकाळी पिऊ नये. कारण त्यांना खोकल्याचा त्रास होऊ शकतो. पोटात वायू धरण्याची तक्रार असल्यास ताकाबरोबर हिंग, लसूण, आले, जिरे, हिंग्वाष्टक चूर्ण असे पदार्थ प्रकृतिमानाप्रमाणे वापरावे. स्थूल व्यक्तींनी दुधाऐवजी ताक प्यावे. भरपूर लघवी होऊन वजन कमी व्हायला मदत होते. शरीरातील फाजील सूज, पांथरी, गुल्म (टय़ूमर), विषबाधा विकारात ताक लगेच गुण देते. ताक कोणी पिऊ नये? सर्दी, पडसे, खोकला, नाक चोंदणे, रात्री वारंवार लघवीकरिता उठणाऱ्यांनी किंवा अंथरुणात शू होत असल्यास व दमेकरी व्यक्तींनी ताक घेऊ नये. विशेषत: सायंकाळी व हिवाळय़ात थंड हवेत ताक वज्र्य करावे. ज्यांना मुंग्या येतात, जे कृश आहेत. ज्यांचे रक्त कमी आहे, हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी आहे, ज्यांच्या पोटऱ्या दुखतात, त्यांनी ताक वज्र्य करावे. कान वाहत असल्यास, शौचाला खडा होत असल्यास ताक घेऊ नये.

वैद्य प. य. खडीवाले वैद्य

No comments :

Post a Comment