10 January 2015

चना /छोले मसाला (Chana /Chole Masala)

No comments :

छोले-भटुरे ही पंजाबी लोकांची आवडती व प्रसिध्द डीश आहे त्यातिल छोले कसे बनवायचे आपण पाहू.

साहीत्य :-

1) छोले/हरभरे 1वाटी
2) धना-जिरा पावडर 1tsp
3) गरम मसाला 2 tsp
4) हळद आवशक्यते नुसार
5) मिठ व मिरची पावडर चवीनुसार
6) लाल टोमॅटो एक चिरून
7) कांदा एक  चिरून
8) आले-लसुण मिरची पेस्ट 1tsp
9) कोथिंबिर बारीक चिरून
10) लिंबू (ऐच्छीक)
11) तेल 1 tblsp
12) आमचूर पाडर 1/4 (पाव)tsp 
13) सोडा चिमूटभर
14) एक टीबॅग

कृती :-

       रात्रि छोले धुवन,पुर्ण बुडतील एवढ्या पाण्यात मिजत घालावेत.

दुसरे दिवशी त्यातील जादाचे पाणी काढून टाकावे व सोडा घालून कुकरमधे शिजण्यास ठेवावे.शिजवताना त्यात टीबॅग सोडावी.नसेल तर लहान चमचा चहा पावडर पांढर्या कपड्यात बांधुन पुरचूंडी सोडा.

कुकरची वाफ जिरेपर्यत कांदा व टोमॅटोची पेस्ट तयार करून घ्या.

नंतर पॅन मधे तेल गरम करण्यास ठेवा व हिग जिरे,मोहरी घालून फोडणी करावी व आधि हळद,मिरची पूड नंतर परतत परतत अनुक्रमे कांदा पेस्ट,टोमॅटो पेस्ट,आल,लसूण,मिरची पेस्ट घालून नीट परतावे .

नंतर त्यामधे धना-जिरा पावडर,गरम मसाला,मिठ व आमचूर पावडर घालून परतावे व थोडे पाणी घालून शेवटी या ग्रेव्हीमधे शिजवलेले छोले/हरभरे घालावेत.पाच मिनिट उकळू द्यावे.(ग्रेव्ही दाटच असावी)

आता तयार चना/छोले मसाला बाउल मधे काढावा व वर सजावटी साठी वरून कोथिंबीर ,टोमॅटो चकत्या ठेवावे.आवडत असल्यास सोबत कांदा व लिंबू द्यावे.

गरम फुलके अथवा चपाती सोबत खावे छान लागते.

टीप :- आमचूर नसेल तर अनारदाना वापरावा किंवा लिंबू थोडे पिळावे.

तयार चना मसाला पावडर वापरायची असेल तर गरम मसाला धना जिरा पावडर घालू नये.

No comments :

Post a Comment