09 January 2015

मेथी मटार मलई ( Methi-Mutter Malai

No comments :
आपल्याला नेहमी एकाच चविची भाजी खाऊन कंटाळा येतो.कधीतरी बदल म्हणून हाॅटेलच्या  चविची भाजी खावी वाटते.पण सगळ्यानी बाहेर जाणे ही शक्य नसते किंव्हा जाण्याचा आपण कंटाळा करतो .अशा वेळी घरच्या-घरी केलेली पण बाहेरच्या चवीची भाजी खायला मिळाली तर काय हरकत आहे ? चला तर आपण आता हाॅटेल स्टाइल मेथी-मटार मलई कसे करायचे पाहू !
साहीत्य :-
१) मेथी जुडी मोठी एक (निवडून व स्वच्छ)
२) मटार दाणे एक वाटी
३) ताजी मलई अर्धी वाटी
४) मोठा कांदा बारीक चिरून एक
५) आलं-लसूण पेस्ट दोन टीस्पून
६) मिरची पावडर एक टीस्पून
७) आमचूर पावडर एक टीस्पून
८) मिठ चविनूसार
९) दालचिनी पावडर अर्धा टीस्पून
१०) तेल चार टेबलस्पून

कृती:-
प्रथम मेथीची पाने नीट बुडतील एवढे पाणी उकळून घ्या व लागलीच थंडगार पाण्यात घालावे.
नंतर एका पॅनमध्ये तेल गरम करावे व त्यात कांदा सोनेरी रंगावर परतावा.नंतर त्यात मेथीची पाने घालून परतावित.

नंतर त्यात आले-लसूण पेस्ट,मिरची पावडर,आमचूर मिठ व दालचिनी पावडर व मटारचे दाणे घालून परतावे व गरज वाटल्यास थोडे पाणी घालून पाच मिनिट शिजू द्यावे.

सर्वात शेवटी मलई घालावी व गरमा-गरम चपाती सोबत सर्व्ह करावे.

टीप :-दालचिनी पावडर मुळे हुबेहूब हाॅटेलच्या भाजी प्रमाणे चव येते.

आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.

No comments :

Post a Comment