मलईचे विविध उपयोग
******************
सकाळी उठल्याउठल्या आपल्याला वाफाळणारा चहा किंवा काॅफी लागते.चहा किंवा काॅफीला खरी खुमारी येते ती दूधामुळे.हेच दूध घेण्यासाठी आपण फ्रिजकडे वळतो.आत ठेवलेल्या दुधावर सायीचा जाड थर जमा झालेला असतो.यालाच मलई असे म्हणतात.याच मलई पासून घरगूती लोणकढी तूप बनते.पण आजकाल हेल्थ काॅन्शिअसनेस वाढला असल्याने बरेच जण स्किम मिल्कच घेतात.या दूधामधील फॅट्स आधिच काढलेले असतात.त्यामुळे त्याला जास्त मलई येत नाही.गाईच्या दुधाला पण जास्त मलई येत नाही.पण म्हशीच्या दूधाला मात्र भरपूर मलई येते.आठवडाभर जर मलई साचविली तर त्यापासून 250 ग्रॅम साजूक तूप मिळते.असे साजूक वापरल्याने जेवणाची लज्जत वाढते व असे साजूप तूप रोज एक चमचा आपल्या शरीराला आवश्यक पण आहे.
मलई जमविण्याची उत्तम पध्दत म्हणजे रोज एका बाउलमध्ये ती काढून फ्रिजमधे ठेवावी.नाहीतर ती लगेच खराब होते.पुरेशी मलई जमा झाली की (चार दीवसाची) त्यात चमचाभर दही/ताक घालावे व घुसळावे.चार-पाच तास तसेच ठेवून द्यावे.सिझन प्रमाणे वेळ कमी-अधिक होतो.
आता घट्ट विरजण लागले असेल ते परत लोणी निघेपर्यंत घुसळा.पांढरेशुभ्र स्वच्छ लोणी मिळते.हे लोणी ब्रेडला लावून ,तसेच गरमा गरम भाकरी/थालीपिठा सोबत अतिशय चवदार लागते.असे घरचे लोणी लहान मुलांची हाडे बळकट होण्यासाठी पण खुप उपयुक्त असते.लोणी काढलेले ताक सुध्दा खूप चवदार आणि उपयोगी असते.ते जेवणात वापरावे.कढी करावी किवा नूसते प्यावे. ढोकळा, उपमा,आमटी इ.गोष्टीतपण वापरता येते.
मलई अनेक पदार्थामध्ये वापरली जाते.
मलई कोफ्ता,मेथी मटार मलई,मेथी मलाई मक्कई अशा भाज्या मलई शिवाय बनूच शकत नाहीत.पदार्थात मलई वापरल्याने त्याचा पोत तर सुधारतोच शिवाय चव ही छान येते. पण रोजच्या जेवणात मलईचा वापर करू नये त्यात फॅट्स भरपूर असतात .मलईमुळे पदार्थातील कॅलरीजही वाढतात.पण बदल म्हणून कधितरी एखादे दिवशी मलई घालून भाजी करायला हरकत नाही.
कुल्फी बनविताना मलई घालावी.म्हणजे कुल्फीचे मिश्रण दाट होते.मावा किवा काॅर्नस्टार्च वापरावे लागत नाही.
मलईमधे एक छोटा कांदा चिरून,टोमॅटो व मिरची बारीक चिरून व चविपुरते मिठ घालून हे मिश्रण ब्रेडला लावा व टोस्ट बनवा.मलई सॅडविच तयार !थंडीत खूप मस्त लागते खायला.
तसेच नुसते ब्रेडला मलई लावून साखर भुरभूरा लहानाना हे सॅडविच आवडेल .
पराठा किवा ठेपल्याची कणिक भिजवताना तेल तूपा ऐवजी मलई वापरा. अतिशय मऊ पराठे बनतात.
अशा प्रकारे विविध प्रकारे मलईचा वापर करता येतो .
No comments :
Post a Comment