14 January 2015

भोगीची मिश्र भाजी (Mix Vegetable)

No comments :

संक्रातीचा आदला दिवस म्हणजे भोगी ! हिवाळ्यात सर्वच भाज्या मुबलक प्रमाणात येतात.त्यामुळे बहुदा असावे किंवा मोसमातल्या सर्व भाज्या एखादे दिवशी तरी आपल्या पोटात जाव्यात म्हणून असावे भोगी दिवशी हमखास मिश्र भाजी बनविण्याची प्रथा पडली आहे.कारण सर्वच भाज्या घरातल्या सगळ्याना आवडतातच असे नाही.मग आपण ठराविकच भाज्या नेहमी करतो व बाकीच्या खाल्ल्याच जात नाहीत.तर आपण आज मिक्स भाजी बनवूया !

साहीत्य:-

1) वांगी मध्यम चार चिरून फोडी
2) ओला हरभरा अर्धी वाटी
3) मटार अर्धी वाटी
4) गाजर तुकडे अर्धी वाटी
5) पापडी शेंग निवडून तुकडे अर्धी वाटी
6) पावट्याचे दाणे अर्धी वाटी
7) कांदा पात
8) लसूण पात
9) तिन ते चार भेंडीचे केलेले तुकडे
10)कांदा एक मोठा
11)चार पाकळ्या लसूण व आले लहान तूकडा
12) कोथंबिर अर्धी वाटी
13)ओले खोबरे अर्धी वाटी
14) भाजून तिळाचे कूट पाव वाटी
15) भाजून शेगदाणा कूट पाव वाटी
16) हिरवी मिरची आवडीनुसार
17) मिठ चवीप्रमाणे
18) हळद
19) मिरची पूड गोडा मसाला दोन लहान चमचे
20) तेल व फोडणी साहीत्य

कृती :-

      प्रथम सर्व भाज्या थोड्याशा तेलावर परतून वाफण्यास झाकून ठेवा.तोपर्यंत कांदा,लसूण,मिरची,आले ,कोथंबिर यांचे वाटण तयार करावे.

आता कढई तापत ठेवून त्यामधे तेल घाला.तापले की चांगली फोडणी करावी.त्यात हळद हींग घाला व वाटण घालुन तेल सुटेपर्यंत परतावे.

त्यात बारीक चिरलेली कांदापात व लसूण पात घालून परतावे.नंतर वाफवलेल्या सर्व भाज्या घालाव्यात.त्यावर तिखट,मीठ,मसाला घाला व नीट हलवा.आता ओले खोबरे,तिळकूट,दाण्याचे कूट घालावे व थोडे पाणी घालून पाच मिनीट शिजू द्यावे. ही भाजी एकदम सूकीपण नसावी व जादा रस्सापण नसावा.अंगाबरोबर रस असावा दाटसर.

आता तयार भाजी बाउल मधे काढावी.गरमा-गरम बाजरीची भाकरी व लोण्या सोबत खाणेस द्यावी.

टीप :-भाज्या उपलब्धते नुसार कमी-अधिक घेतल्या तरी चालतात.एखादी नसली तरी चालते व वर दिल्यापेक्षा एखादी जास्तही चालते.

No comments :

Post a Comment