नेहमीच मुलांना असे म्हणणे योग्य होणार नाही म्हणून आज आपल्याला किंवा मोठ्याना असे म्हणते.काय होते रोज-रोज सकाळी उठले की, पोळी -भाजी करायचे, वर्कींग असू तर डब्यात न्यायचे,घरातल्याना द्यायचे किवा घरात असू तरी तेच खायचे एकट्यासाठी वेगळे काय करायचे ? परत संध्याकाळी तेच !जाम कंटाळा येतो.पण पोट कुठे कंटाळतेय ? जिभेला पण काही चवदार हवेच असते आणि शरीराला पौष्टीक ! चला तर आपण मस्त थालीपिठ बनवू.कसे ते पहा !
साहीत्य :-
1) किसलेले गाजर
2) किसून सिमला मिरची
3) किसलेला मुळा
4) बारीक चिरून कांदापात
5) एक मध्यम कांदा किसून
6) तिळ एक लहान चमचा
7) ओवा,हींग एक लहान चमचा
8) तिखट,मिठ चवीनुसार
9) थालीपिठाची भाजाणी किंवा घरात असलेली सर्व पिठे मिक्स घ्यावीत
10)धना-जिरा पावडर
11) तेल भाजण्यासाठी
कृती :-
प्रथम सर्व भाज्या एकत्र कराव्यात.नंतर त्यात मावेल इतकेच पिठ घालावे.
आता बाकीचे सर्व साहीत्य घालून मिक्स करावे व गरज वाटली तर थोडा पाण्याचा हात घ्यावा आणि पिठ चांगले मळावे.
नंतर पिठाचा एक चेंडू एवढा गोळा घ्यावा व थंड तव्यावर तेल लावून त्यावरच थापावा.मधे बोटाने भोकं पाडून तेल सोडावे.उलट-सुलट नीट खरपूस भाजावे.
खमंग तयार थालीपीठ लोणी/दही घेऊन खावे.
टीप :- वर सांगितलेल्या सर्व भाज्या व भाज्यांचे प्रमाण उपलब्धते नुसार घ्यावे.
No comments :
Post a Comment