गणपती बाप्पाला आवडणारे "उकडीचे मोदक" खायला सर्वानाच खूप आवडतात. परंतु करायला सर्वाना जमतातच असे नाही. थोडे कौशल्याचे काम आहे. त्यातूनही अनुभवी गृहीणींना हाताने करणे सहज जमते पण कांही नवशिक्या मुलींना हाताने पारी करणे, मोदकाच्या कळ्या करणे नाही जमत. मग पर्याय काय? तर विकत आणून खाणे. किंवा मन मारून न खाता रहाणे. त्यापेक्षा साच्यातून मोदक करता आले तर? खूपच छान ना? चला तर हा वीडियो बघा आणि साच्याने उकडीचे मोदक करा. आणि हो तुम्हाला प्रत्येक कृती कशी केली ते नीट समजावे म्हणून थोडे शिस्तित व हळूवारपणे सर्व कृती केली आहे. प्रत्यक्षात आपले आपण मोदक बनवतो तेव्हा अर्धा ते एक मिनीट इतकाच वेळ लागतो. सोबत उकडीच्या मोदकाच्या संपूर्ण रेसिपीची लिंक देत आहे. 👇👇
http://swadanna.blogspot.in/2014/08/blog-post.html?m=1
http://swadanna.blogspot.in/2014/08/blog-post.html?m=1