'अळू' म्हटले की आपल्या डोळ्यासमोर पट्कन अळूच्या खमंग, खरपूस वड्याच येतात व नंतर फारतर अळूची पातळ भाजी. भाजी केली तर अळूच्या देठाचा वापर आपसूकच होतो. कारण देठ भाजीत घातल्याशिवाय भाजी चांगली मिळून येत नाही. मात्र आपण अळूच्या पानांच्या वड्या करताना देठ कापून सरळ टाकून देतो. तर तसे न करता त्या देठांचे भरीत बनवावे. चविला अतिशय उत्कृष्ट लागते व जेवताना पानांत एक डाव्या बाजूला पट्कन होणारा पदार्थ झाला. कसे करायचे साहित्य व कृती-👇
साहित्य :-
* अळूची देठ १५ -२०
* घट्ट दही २ टेस्पून
* मीठ चवीनुसार
* साखर चिमूटभर
* फोडणीसाठी १ टेस्पून तेल, हिंग, मोहरी, जीरे, सांडगी मिरची किंवा हिरवी मिरची
* कोथिंबीर
कृती :-
प्रथम अळूची देठं स्वच्छ धुवून घ्यावीत.नंतर ती हातानेच सोलून घ्यावीत. सहज साल निघते.
आता त्याचे अंदाजे दोन इंचाचे तुकडे करून डाळ-भाताच्या कुकरसोबत वाफायला ठेवून द्यावे.
नंतर कुकर थंड झाल्यावर वाफवलेली देठ बाहेर काढून हाताने कुस्करून घ्यावीत व त्यामधे दही, मीठ, साखर घालावे.
शेवटी गार फोडणी घालावी व कोथिंबीर घालून एकत्र करावे. जेवणात ताटात डाव्या बाजूला वाढावे.
आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment