बिर्याणी ही एक भाताची,मुघलाई पारंपारिक पाककृती आहे. वेज व नाँनवेज दोन्ही प्रकारामध्ये करता येते. मी वेज बिर्याणी केली आहे. ही लहान -थोर सर्वांच्या आवडीची अशी आहे. साहित्य पाहिले की,वाटते खूप अवघड, किचकट कृती आहे. परंतु तसे अजिबात नाही! एकदम सहज,सोपी व चविष्ट पाककृती आहे.तसेच पौष्टीक व "वन डिश मिल" म्हणून एकदम झकास डिश आहे. क़़शी केली "वेज दम बिर्याणी " साहित्य व कृती, 👇
साहित्य :-
भातासाठी लागणारे-
* बासमती तांदुळ २ वाट्या
* लवंगा २-४
* हिरवी वेलची ४
* मोठी मसाला वेलची २
* तमालपत्रं मध्यम १
* दालचिनी २ इंच
* काळे मिरे ४
* मीठ
* तूप २ टेस्पून
ग्रेवीसाठी साहित्य :-
* फ्लाॅवर १ वाटी
* गाजर १/२ वाटी
* शिमला मिरची १ /२ वाटी
* बीन्स १/२ वाटी
* मटार १ /२ वाटी. या सर्व भाज्या मोठ्या चौकोनी चिरून घ्याव्यात.
* कांदा १ पातळ उभा चिरून
* टोमँटो १ बारीक चिरून
* कोथिंबिर चिरून
* आलं-लसूण पेस्ट २ टीस्पून
* हिरवी मिरची उभी चिरून,बिया काढून २
* कोथिंबिर बारीक चिरून
* गरम मसाला १ टीस्पून
* धना-जिरा पावडर २ टीस्पून
* मिरे ४-५
* लवंगा २-३
* तमालपत्रं १ मध्यम
* हिरवी वेलची २
* मसाला वेलची १
* लाल मिरचीपूड १ टीस्पून
* हळद १/२ टीस्पून
* जीरे १ टीस्पून
* मीठ चविनूसार
* तेल ४ टेस्पून
* फेटलेले दही १ वाटी
शेवटी वाफ म्हणजे दम आणण्यावेळी,
* उभा चिरून तळलेला कांदा अर्धा वाटी
* १०-१५ केशर काड्या पाव वाटी दूधामधे भिजवलेल्या
* कोथिंबिर चिरून
* पुदीना पाने १५-२०
* तूप २ टेस्पून
कृती :-
प्रथम भात मीठ व साहित्यामधे दिलेले सर्व मसाले अखंडच घालून मोकळा व नव्वद टक्कपर्यंतच शिजवून घ्यावा. शिजल्यावर ताटात काढून वरून तूप घालून हलवून गार होण्यासाठी ठेवावा. तूप घातल्याने शितं एकमेकाला न चिकटता सुटी रहातात.
आता ग्रेवीसाठी,पँनमधे तेल गरम करून जीरे तडतडवून घ्यावेत.नंतर त्यावर कांदा, आलं-लसूण पेस्ट, मिरची टाकावी. गुलाबी रंग येईपर्यंत परतावे. नंतर टोमँटो घालून मऊ होईपर्यंत परतावा. थोडे पाणी घालून परतले तरी चालते. नंतर ग्रेवीसाठी दिलेले सर्व मसाले, हळद, तिखट व मीठ घालून परतावे. शेवटी सर्व भाज्या घालून परतावे व थोडे पाणी घालून झाकून भाज्या शिजवाव्यात. भाज्या जास्त शिजवू नयेत. थोडे दाताखाली येणार्या क्रंची रहाव्यात. परत शेवटी दम देताना पण थोड्या शिजतात हे लक्षात घ्यावे.
आता तयार ग्रेवी थोडी थंड झाली की, फेटलेले दही व कोथिंबिर घालून एकसारखे करावे.
आता सर्वात शेवटी वाफ आणायची म्हणजेच "दम" द्यायचा . त्यासाठी एका जड बुङाच्या पसरट भांङ्यामधे तळाला १ टेस्पून तूप घालावे. त्यावर तयार अर्ध्या ग्रेवीचा थर पसरवावा, त्यावर तयार अर्ध्या भाताचा थर पसरवावा. त्यावर केशर दूध अर्धे टाकावे. नंतर कोथिंबिर व पुदीना घालावा.आता राहीलेल्या ग्रेवी व भाताचा असाच दुसरा थर पसरवावा. वरून केशरदूध शिंपडावे. हाताने किंवा चमच्याने सर्व भात थोडा दाबावा. १ टेस्पून तूप कडेने सोडावे व घट्ट झाकण लावून आधी गँसवर तवा ठेवावा व त्यावर भांडे ठेवावे. मंद गँसवर १५-२० मिनिट दणदणित वाफ आणावी.
शेवटी सर्व्हींगच्या वेळी वरून कोथिंबिर व तळलेला कांदा पसरावा व गरमा-गरम द्यावे.
टिप्स :-
* भाज्या व त्यांचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी-जास्त करावे.
* आवडीनुसार तळलेले काजू वरून घालावेत.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment