लाडू आपण एरव्हीही मधल्या वेळी खाण्यासाठी किंवा कोणी आले गेले तर खायला देण्यासाठी सोयीचे होते म्हणून करतो. तसेच दिवाळी आली की खास फराळाच्या ताटातला पदार्थ म्हणून त्याची हक्काची जागा असतेच. यात सुध्दा कोणी रवा-बेसन लाडू करतो तर कोणी खवा घालून करतो. मी ओला नारळ घालून केलेत. कसे ते पहा साहित्य व कृती,
साहीत्य:-
१) बारीक रवा ४ वाट्या
२) साखर ३ वाट्या
३) एका नारळाचे खवून खोबरे
४) वेलची पूड दोन चमचे
५) काजू,बदामाचे काप,बेदाणे आवडीनुसार
६) साजूक तूप १ वाटी
७) गुलकंद २ टेस्पून
कृती:
प्रथम कढई तापत ठेवून त्यामधे तूप घालावे व त्यावर रवा खरपूस गुलाबी रंगावर भाजून घ्यावा.रवा भाजत आल्यावर शेवटी -शेवटी ओले खोबरे घालावे व चार परतण्या देऊन गॅस बंद करावा.
दुसर्या एका जाड बुडाच्या पातेल्यामध्ये साखर घेऊन त्यात साखर बुडेल इतपत पाणी घालावे. पातेले गॅसवर ठेवावे व सतत ढवळावे.साखर विरघळून पाच-दहा मिनीटे ऊकळू द्यावे. एकतारी पाक तयार तयार झाला का पहावे.झाला असेल तर तयार पाकामधे वर भाजलेला रवा,वेलची पूड सुकामेवा व गुलकंद घालावे .नीट हलवावे व मिश्रण आळून येण्यासाठी झाकून ठेवून द्यावे.मधून मधून हलवून बघावे.
साधारण दोन ते तिन तासानी मिश्रण आळून येते.मग त्याचे आपल्या आवडीनुसार हव्या त्या साइजचे लाडू वळावेत.वळताना वर एक-एक बेदाणा लावावा.
छान मऊ व रवाळ लाडू तयार होतात.
या लाडूमधे ओले खोबरे असल्याने आठ-दहा दिवसापेक्शा जास्त दिवस ठेवू नये.लवकर संपवावेत.वास येण्याची शक्यता असते अन्यथा फ्रीजमधे ठेवावेत व खाण्याच्या आधि थोडावेळ बाहेर काढून ठेवावेत.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment