'मोदक 'नांव काढले की खायची इच्छा होते. बाप्पाला आवडतात तसे सर्वानाच खूप आवडतात. पण काय होते कांही वेळा बर्याच जणांना प्रकृतीच्या कारणाने गोड खाता येत नाही. पण म्हणून काय झाले? त्यानी मोदक खायचे नाही का? असे कसे होईल? खायचे ना, पण "शुगर फ्री मोदक" खायचे. कसे करायचे साहित्य व कृती-👇
साहित्य :-
* काळा सीडलेस खजूर २५ बिया
* काजू,बदाम,अक्रोड ची भरड पावडर १ वाटी
* तूप १ टेस्पून
* चांदी वर्ख ऐच्छिक
कृती :-
प्रथम नाँनस्टीक पँनमधे तूप घालावे.गरम झाले की त्यामधे खजूर बिया घालून परतवून घ्याव्यात गोळा तयार झाला की, ड्रायफ्रूट्सची भरड घालावी व एकजीव करावे. गँस बंद करावा.
आता मिश्रण थोडे थंड होऊ द्यावे. नंतर मोदक साचाला तूपाचा हात लावून मिश्रण त्यात भरावे व मोदक करावे . नंतर सजावटीसाठी वरून चांदीचा वर्ख लावावा.
बाप्पाच्या नैवेद्याला झटपट मोदक तयार! नैवेद्य दाखवा व खा पट्कन.
हे मोदक पौष्टीक, शुगर फ्री व झटपट होणारे आहेत. कोणाच्या घरी जाताना सोबत न्यायलाही एकदम सोप्पे. तुम्हीही करून बघा नक्की आवडतील तूम्हालापण.
आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.