'सात कप वडी ' हा एक पारंपरिक मिठाईचा पदार्थ आहे. पौष्टीक व झटपट होणारा आहे. पारंपारिक प्रकारामध्ये फक्त एकूण साहित्य सात कप असते. म्हणून सात कप वडी नांव पडले. परंतु मी थोडा बदल करून मिल्क पावडर व सुकामेव्याची पावडर घेऊन टोटल सात पदार्थ घेऊन सात कप मिश्रण केले व थोडी अधिक पौष्टीक करण्याचा प्रयत्न केला व छान यशस्वी झाला. कशी केली साहित्य व कृती -
साहित्य :-
* बेसन पीठ १ कप
* ओलं खोबरं १ कप
* तूप १ कप
* दूध १ कप
* मिल्क पावडर १/२ कप
* ड्रायफ्रूट भरड १/२ कप
* साखर २ कप
कृती :-
प्रथम सर्व साहित्य मापाने मोजून काढून घ्यावे. नंतर नाँनस्टीक पँनमधे डाळीचे पीठ साधारण म्हणजे कच्चेपणा जाण्याइतपत भाजून घ्यावे.
नंतर तूप, दूध, ओलं खोबरं, साखर घालून ढवळत रहावे. साखर विरघळली की ड्रायफ्रूट पावडर व मिल्क पावडर घालावी.
सर्व साहित्य गोळा होईपर्यंत ढवळत रहावे. कडेने तूप सुटून एकत्र गोळा तयार झाला की तूप लावलेल्या ताटात काढावे व हाताने किंवा वाटीने थापावे. आवडत असल्यास वरून बदाम पिस्ता काप लावावेत. मिश्रण थंड झाले की वड्या कापाव्यात.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.
No comments :
Post a Comment