इस कटाची आमटी हा आमटीचा पारंपारिक प्रकार आहे. पुरणपोळीचे जेवण म्हणजे सोबत कटाची आमटी पाहीजेच.या आमटीला निरनिराळ्या भागात वेगवेगळी नावे आहेत. कुठे येळवणीची आमटी.. तर कुठे सार! तसेच करण्याच्या पध्दतीही वेगवेगळ्या असतात. पण पदार्थ एकच असतो. हरभर्याची डाळ शिजवताना मधे मधे वरचे पाणी काढले जाते व त्या पाण्याची आमटी केली जाते ती कटाची आमटी होय.आजकाल डाळ कुकरमधे डाळ शिजवली जाते. म्हणून डाळीत जास्त, म्हणजे डाळीच्या चौपट पाणी घालतात व गाळून कट काढला जातो. तर अशा आमटीसाठी लागणारे साहित्य व कृती-👇
साहित्य :-
* डाळीचा काढलेला कट ५ वाट्या
* सुके खोबरे एक लहान वाटी, ५० ग्रँम
* लिंबाएवढ्या चिंचेचा काढलेला कोळ
* गूळ लिंबाएवढा
* गरम मसाला १ टीस्पून
* गोडा मसाला २ टीस्पून
* लाल मिरचीपूड २ टीस्पून
* हळद १/२ टीस्पून
* मीठ चवीनुसार
* फोडणीसाठी तेल एक पळीभर
* हींग, मोहरी, जीरे, कढीपत्ता
* कोथिंबीर
कृती :-
प्रथम सुक्या खोबर्याची वाटी डायरेक्ट गँसवर जाळामधे खरपूस भाजून घ्यावी.
आता भाजलेले खोबरे, जीरे, थोडा कढीपत्ता भाजून, कोथिंबीर सर्व मिक्सरमधे वाटून घ्यावे.
आता तेल गरम करून त्यामधे जीरे, मोहरी हींग तडतडवून घ्यावेत. त्यामधे कढीपत्ता, हळद, हींग घालावे व वाटलेला मसाला घालून परतावे. मसाला परतल्यावर त्यामधे लाल मिरचीपूड, गरम मसाला, गोडामसाला घालून परतावे.
सर्वात शेवटी डाळीचा कट, मीठ, गूळ व चिंचेचा कोळ घालून आमटी ५ मिनिट चांगली उकळू द्यावी. शेवटी वरून कोथिंबीर घालावी.
अशी ही खमंग कटाची आमटी मोकळ्या भातासोबत खूप छान लागते. तसेच पुरणपोळी खाताना मधे-मधे भुरकायलाही मस्त लागते. बरेचजण आमटीत पोळी बुडवूनही खातात. कशीही खा पण पुरणपोळी म्हटले की कटाची आमटी पाहीजेच.
टिप्स :
* बरेचवेळा आमटीला कट कमी निघतो अशा वेळी थोडी शिजलेली डाळ घोटून घालावी.
* या आमटीला मसाला वाटताना खोबर्यासोबत हिरवी मिरची,आले, लसूण, कोथिंबीर व जाळावर खोबर्याप्रमाणे आख्खा कांदा भाजून घातला तरी चालतो.छान वेगळी चव येते. परंतु मी देवाला नैवेद्य असल्याने कांदा लसूण नाही घातले.
आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला जरूर द्या. आपल्या प्रतिसादाने नव-नवीन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते.

This comment has been removed by a blog administrator.
ReplyDelete