चित्रान्न हा कर्नाटक भागातील भाताचा एक प्रकार आहे. खायला चवदार व करायला एकदम सोपा. कसा करायचा साहीत्य व कृती,
साहीत्य :-
* तांदुळ 1 वाटी,
* 5-6 सुक्या लाल मिरच्या,कढीपत्ता, कोथंबिर, * उडद डाळ 3 चमचे,
* खोवलेले ओले खोबर 2 वाट्या,
* कच्चा मसाला किंवा धना-जिरा पावडर 2 चमचे,
* मीठ, साखर चविनुसार,
* लिंबू अर्धा
* तेल पाव वाटी
कृती :-
प्रथम मीठ घालून मोकळा भात शिजवून घ्यावा. नंतर तो गार होण्यासाठी ताटात पसरून ठेवा.
नंतर फोडणी करून उडद डाळ गुलाबी भाजून घ्या. त्यामधे मिरची व कढीपत्ता घाला.आता वर गार केलेला भात घाला.वरून कच्चा मसाला, साखर व नारळाचा चव घाला व्यवस्थित हलवून एक वाफ आणा.
शेवटी वरून लिंबू पिळा व कोथंबिर घाला. गरमा-गरम वाढा.
टीप :- आदले दिवशी चा शिळा भात राहीला असेल तर, हा भात जास्तच चांगला मोकळा होतो. गार करावा लागत नाही.
No comments :
Post a Comment