सर्वसामान्यपणे घरात नाष्टा म्हटले की,आपण पट्कन होणारे पदार्थ म्हणून कांदापोहे किंवा रव्याच्या उपम्यालाच पसंती देतो. पण नेहमी - नेहमी तेच खायचा कंटाळा येतो. मग त्याच पोह्याचे वडे किंवा भजी केली तर? सर्व साहीत्य थोड्याफार फरकाने तेच, फक्त प्रमाण वेगळे वआकार वेगळा. वेळही काही जास्त लागत नाही. पट्कन होतात. बघा साहीत्य व कृती :-
साहीत्य :-
* पातळ पोहे 2 वाट्या
* चना डाळ पीठ 2 टेस्पून
* तांदुळाचे पीठ 1 टेस्पून
* बारीक चिरून कांदा 1
* आलं-लसूण, हिरवी मिरची पेस्ट
* बारीक चिरून कोथंबिर
* मीठ चविनूसार
* हळद
* धना-जिरा पावडर 2 टीस्पून
* तेल तळण्यासाठी
* पाणी
कृती :-
प्रथम पोहे धुवून चाळणीमधे निथळत ठेवा. तोपर्यत इतर तयारी करावी. कांदा चिरून घेणे,आलं-लसूण मिरची पेस्ट तयार करणे इत्यादी.
आता भिजलेल्या पोह्यामधे वर दिलेले सर्व साहीत्य घालून हाताने एकजिव करून गोळा मळून तयार करा. गरज वाटली तर मळताना पाण्याचा हात घ्यावा.
नंतर तेल तापत ठेवा,व हाताने लहान -लहान चपटे वडे करून गरम तेलात तळा. तूम्ही फोटो मधे दाखवल्या प्रमाणे छोटी-छोटी भजी पण काढू शकता.
तयार खुसखूषीत व गरम कशासोबतही खा किंवा नुसतेही छान लागतात. तूम्हीही करून बघा नक्की आवडतील. मात्र प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.
टीप :- पोहे जाडही घेऊ शकता.फक्त भिजवताना थोडे पाणी वापरावे.
आपल्या प्रतिसादाने नविन गोष्टी करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सूचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
👌👌👌👌👌👌👌
ReplyDelete