कारल्याची भाजी म्हटले की सहसा नाक मुरडले जाते. परंतु कारले जरी कडू असले तरी चविला खमंग लागते. व अशा पध्दतीने केले तर कारल्याची भाजी आहे हे सांगावे लागते. कडवडपणा पार निघून जातो. बघा कशी ते साहित्य व कृती-👇
साहित्य :-
* पांढरी कारली पाव किलो
* बेसन पीठ ४ टेस्पून
* दाण्याचे कुट २ टेस्पून
* ओलं खोबरं २ टेस्पून
* गोडा मसाला १ टीस्पून
* लाल मिरचीपूड १ टीस्पून
* मीठ चवीनुसार
* आमचूर पावडर अर्धा टीस्पून
* हळद
* आलं-लसूण हिरवी मिरची पेस्ट १ टीस्पून
* तेल फोडणीसाठी
* हींग चिमूटभर
* मोहरी
* कोथंबिर
कृती :-
प्रथम कारली स्वच्छ धुवून चाकूने किंवा सालकाढण्याने खरडून घ्यावीत.नंतर मधे उभी चीर देऊन आतील बीया काढाव्यात व हळद, मीठाच्या पाण्यात १५ मिनिट टाकून ठेवावीत. तोपर्यंत मसाला तयार करून घ्यावा.
कढईत किंचित तेल घालून त्यावर बेसनपीठ भाजून घ्यावे फक्त पीठाचा कच्चेपणा जावा इतकेच भाजावे.
नंतर भाजलेल्या पीठामधे सर्व मसाला, दाण्याचे कुट, ओले खोबरे घालून मिश्रण तयार करावे.
आता पाण्यात ठेवलेली कारली पाणी निथळून काढून घ्यावीत व त्यामधे तयार मसाला हाताने दाबून भरावा.
नंतर भरलेली कारली चाळणीवर ठेवून वाफवून घ्यावीत.
नंतर बोटाने दाबून कारली मऊ झालीत का तपासून पहावे व नंतर कढईमधे फोडणीसाठी तेल गरम करावे व हींग-मोहरीची फोडणी करून कारली त्यामधे घालून थोडे परतावे. तेल सुटायला लागले की गँस बंद करावा.
तयार भाजी पोळी किंवा भाकरी सोबत खायला द्यावी. सुकी असल्याने डब्यात देण्यासाठी पण सोयीची आहे. आदले दिवशी भरून, वाफवून फ्रिजमधे ठेवावी. दुसरे दिवशी सकाळी पट्कन फोडणी करून परतावी.
आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment