शीर म्हणजे दूध व खुरमा म्हणजे सर्व सुका मेवा. रमजान ईद दिवशी आपल्या मुस्लिम बांंधवांच्या घरी हमखास केला जाताे व सर्व मित्र मंडळी, नातेवाईकां सोबत खाल्ला जातो. तर असा पौष्टीक व गोड "शीरखुरमा " चे साहित्य व कृती-👇
साहित्य :-
* दूध १ लिटर
* शेवया १ वाटी
* काजू, बदाम, चारोळी, बेदाणे, अंजीर सर्व मिळून २ वाट्या.
* साखर १ वाटी ( आवडीनुसार कमी-जास्त)
* तूप १/२ वाटी
* वेलचीपूङ
* केशर
कृती:-
प्रथम पँन मधे तूप गरम करून सर्व सुका मेवा तुकडे करून, तांबूस परतावा. तोपर्यंत दुसरिकडे दूध उकळत ठेवावे.
सुका मेवा भाजून झाला की त्याच राहीलेल्या तूपावर शेवया तांबूस परतून घ्या.
आता दूध चांगले उकळून दाट झालेले असेल. त्यात भाजलेल्या शेवया व सुकामेवा, केशर, वेलची घालावे . पांच मिनिट उकळू द्यावे.पाच मिनिटानी गँस बंद करावा.
शेवटी गँस बंद केल्यावर साखर घालावी व ढवळावे. गरम असल्याने साखर विरघळते.
आता गरमा-गरम शीर खुरमा सर्वासोबत फस्त करावा.
टीप :- सुक्या मेव्यातील पिस्ता भाजून वेगळा ठेवावा व ऐनवेळी सर्व्ह करताना घालावा. कारण पिस्ता टिकण्यासाठी खारवतात व त्यातील मीठामुंंळे शीर खुरमा फाटतो.
आपल्या आवडीनुसार सुकामेवा घ्यावा. यात खजूर, खारीक पण घालतात. मी नाही घेतले.
आपल्या प्रतिसादाने नव-नविन पदार्थ करण्यास प्रेरणा मिळते. आपल्या मौल्यवान सुचना व अभिप्राय, आम्हाला ज़रूर द्या.
No comments :
Post a Comment